रात्री जर तुळशीची पाने उशी खाली ठेवले तर काय होईल !

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्व दिले आहे. तुळशीचे जितके धार्मिक महत्व आहे तितकेच वैज्ञानिक गुण आहेत. तुळशीचे इतके फा य दे व गुण आहेत हे जाणून प्रत्यके जण दारात कुंडी ठेवताना दिसतो. आपल्या धर्मग्रंथामध्ये तुळशीचे खूप उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे आपले कितीतरी रोगांपासून आपण सुटका मिळवू शकतो. आपल्या धर्म ग्रंथांमध्ये कितीतरी असे उपाय सांगितले आहेत ज्यांना करून आपण आपल्या जीवनातील कितीतरी बाधांपासून सुटका मिळवू शकतो. तुळशीतून सकारात्मक ऊर्जा येत असते. आणि तुळशीच्या आसपास असणाऱ्या लोकांना ही ऊर्जा मिळत असते.

म्हणून दररोज सकाळी अंघोळी नंतर तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करावे. व “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करता करता तुळशीला पाच, सात, अकरा, एकवीस, एकशेआठ, आपल्या जेवढ्या शक्य होतील तितक्या प्रदक्षिणा घालाव्या. या मुळे तुळशीमधून निघणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. असे म्हणतात आपल्या घरात जर काही अनिष्ट घटना घडणार असेल तर तुळस माता ते संकट स्वतःवर घेते व आपला बचाव करते. आपण खूप देखभाल करूनही तुळस कोमेजून जात असेल तर समजावे की आपल्यावर किंव्हा आपल्या कुटुंबातील कोणा व्यक्तीवर बुध ग्रहाची छाया आहे. म्हणूनच तुळस वेळोवेळी कोमेजून जाते. अश्या वेळी ती तुळस काढून तिचे विसर्जन करावे. आणि दुसरी तुळस आणून लावावी.

तुळशीच्या पानांचे फार मोठे महत्व आहे. म्हणूनच तुळशीची फक्त चार पाने रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेऊन झोपावे किंव्हा जवळ घेऊन झोपावे. हा उपाय आपल्याला सलग 43 दिवस करायचा आहे. या उपायाचे काय फा य दे आहेत ते आपण जाणून घेणारच आहोत. परंतू त्यापूर्वी आपण जाणून घेऊयात याचे धार्मिक फा य दे..
जर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप लागत नसेल तर या पानांमधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शांत झोप लागते. वाईट स्वप्न पडत नाहीत. जर आपल्याला भीती वाटत असेल, एखाद्या गोष्टीचे दडपण असेल, तर ती भीती आणि दडपणही नष्ट होते. तसेच आपले दुर्भाग्य, स्वभाग्यात बदलते.

जर आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश हवे असेल तर तुळशीच्या मुळापासूनही आपण एक उपाय करू शकतो. त्या साठी तुळशीच्या मुळाला अभिमंत्रित करून घरी आणावे. व ती मुळी गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुवावी. नंतर ती मुळी एका पिवळ्या कापडात बांधून व पिवळ्या दोऱ्याने आपल्या उजव्या हातात गुरुवारी बांधावी. ही मुळी अभिमंत्रित करतांना “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा अखंड जप करावा. या उपयामुळे आपल्या जीवनातील आर्थिक व भौतिक समस्या असतील तर त्या दूर होतील. सर्व कार्य सुरळीत व विणा अडथळ्यांची पूर्ण होतील.

जर आपल्याला दृष्ट लागली असेल, आपली तबियत आपल्याला साथ देत नसेल, व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, नोकरी व्यवसायाला दृष्ट लागली असेल, असे वाटत असेल तर घरातील कोणत्याही सदस्याला सात काळी मिरी व सात तुळशीची पाने घेऊन आपल्या अंगावरून सात वेळा उतरवायला सांगावे. हा उतारा करतांना ओमचा अखंड जप करावा. त्या नंतर हे काळी मिरीचे दाणे बाहेर टाकावेत. तुळशीची पाने खाऊन घ्यावीत.

मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस तुळस लावावी. या उपयामुळे घरातीळ धनामध्ये वाढ होते. पैसे वाढतात. घराच्या दोन्ही बाजूस तुळस लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होतो. नकारात्मक ऊर्जा कुठल्या कुठे पळून जाते. सकाळ संध्याकाळी तुळशीच्या पुढे तुपाचा दिवा जरूर लावावा. या मुळे आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपा होते.
जर घरात नेहमी भांडणे व वादविवाद होत असतील तर आपल्या स्वयंपाक घरातील खिडकीत तुळशीची कुंडी ठेवावी. या मुळे आपल्या घरात नेहमी प्रेम बनून राहील.

दररोज सकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी कमीत कमी पाच मिनिटे तर तुळशीपुढे उभे रहावे. तिचे पूजन व नामस्मरण करावे. लहान मुलांना दररोज तुळशीचे पाने खायला दिल्यास त्यांची बुद्धिमत्ता तीव्र होते. मित्रांनो हे उपाय करून आपल्या जीवनातील सर्व नाकारत्मक गोष्टी घालवून आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करू शकतो. तर हा उपाय तुम्ही नक्की करा…

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *