
एका वडापावसाठी या महिलेने आपल्या बाळासाठी जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल!
‘प्रभात’जवळील सिग्नलपाशी एक जर्जर वृद्धा आणि तिची गतिमंद मुलगी नेहमी दिसे. आज दुपारची कातरगोष्ट. सिग्नलपाशी भिक मागत फिरणाऱ्या दोन प्रौढ स्त्रिया मागेपुढे करत होत्या. त्यांच्या पाठीवरच्या झोळीत तान्हुली पोरे होती. त्या स्त्रियांना कोपऱ्यावरच्या वडापाववाल्याने एका कागदाच्या भेंडोळीत वडे बांधून दिले. त्यांना भूक खूप लागली असावी, रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या शिवाजी विद्यालयाच्या कंपाउंड वॉललगतच्या सावलीत त्या दोघी बसल्या.
काही अंतरावर बसलेली वृद्धा त्या दोघींना आशाळभूत नजरेने पाहत होती. त्या दोघींचे मात्र तिच्याकडे लक्ष नव्हते. त्यांचे धुळीत माखलेले, भेगाळलेले अनवाणी पाय त्यांच्या रोजच्या जीवनातील संघर्षांची ग्वाही देत होते. अखेर न राहवून ती वृद्धा जागेवरून उठली, मांडीवर डोकं ठेवून बसलेल्या तिच्या गतिमंद कुमारीकेस तिने तिथेच बाजूस टेकवले आणि ती त्या दोघींच्या दिशेने निघाली. ती त्या दो...