Sunday, November 27
Shadow

8 वर्षांपासून होत नव्हते मूल, मग या देवीच्या मंदिराचा प्रसाद घेतल्याने झाली पुत्रप्राप्ती…

प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा आनंद मिळावा अशी इच्छा असते, आणि ही इच्छा असणे साहजिकच आहे…!कारण तो आनंद, ते सुख जगातील सर्व सुखांमध्ये सर्वोच्च आहे. पण दुर्दैवाने काही महिलांची इच्छा असूनही त्यांना आई होण्याचे सुख मिळत नाही, त्यांना मुलबाळ होत नाही. मग अशा परिस्थितीत या महिला अपत्य प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे उपाय करतात असा एकही पर्याय सोडत नाहीत ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्त होईल, मग यामध्ये ते पती पत्नी अनेक डॉक्टरांच्या गाठी भेटी घेतात, औषध उपचार करतात व कधी कधी तर ते अनेक प्रकारच्या टेस्ट देखील करतात परंतु तरी देखील त्यांच्या नशिबी शेवटी निराशाच येते. इतके पैसे खर्च करून देखील त्यांना ते सुख तो आनंद विकत घेता येत नाही…! म्हणून आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अपत्य प्राप्ती होऊ शकते, व असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी हा उपाय केल्याने त्यांना मुले झाली आहेत.

वास्तविक, या उपायांतर्गत तुम्हाला एका चमत्कारिक मंदिरात जाऊन तिथला प्रसाद खावा लागेल. दक्षिण भारतातील तामिळनाडूमधील विल्लुपुरम येथे असलेले इंदुंबन मंदिर निपुत्रिक महिलांना अपत्य देण्यासाठी ओळखले जाते. या मंदिरात दुर्गा मातेची मूर्ती असून तिची रोज पूजा केली जाते. जी महिला इथे येऊन दुर्गा मातेचा आशीर्वाद घेते व तेथील विशेष प्रसाद खाते तिला काही महिन्यांतच मूल होते. या मंदिराबद्दल असे देखील म्हंटले जाते की जी महिला या मंदिरात येऊन दुर्गा मातेचा प्रसाद खाते तिला अपत्य प्राप्ती होतेच..

या मंदिरात येणाऱ्या महिलांना प्रसाद म्हणून एक विशेष फळ दिले जाते. व ते फळ घेण्यापूर्वी त्या महिलेने तिच्याकडून नैवेद्य म्हणून दुर्गा मातेला एक फळ अर्पण करावे लागते. ते फळ अर्पण केल्यानंतर तेथील पुजारी त्या फळाऐवजी दुसरे फळ प्रसाद म्हणून देतात. असे सांगण्यात आले आहे की हे फळ खाल्ल्यानंतर स्त्रीला अपत्य सुख प्राप्त होते. खरे तर हे फळ लिंबू आहे, व ते फळ लिंबू असल्यामुळे लवकर खराब न होता ते जास्त काळ टिकते.

तसेच या लिंबूमध्ये साक्षात माँ दुर्गाचा आशीर्वाद असतो, जे खाल्ल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. इतकेच न्हवे तर या मंदिरात तुम्ही मनापासून जी कोणती इच्छा मागाल ती पूर्ण होते. येथील लोक असे सांगतात की, जर एखादी व्यक्ती वाईट संगतीमुळे चुकीच्या मार्गावर जात असेल किंवा गेली असेल तर त्याला या मंदिरात आणून दुर्गा माता जवळ माथा टेकल्यावर ती व्यक्ती चांगल्या मार्गावर येते.

Leave a Reply

Your email address will not be published.