बस मध्ये रोज भेटणाऱ्या प्रियसीसोबत जे घडते ते पाहून धक्काच बसेल…
प्लीज, परत ये ना एकदा, हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा… तो बसची वाट बघत उभा असतो. बस आल्यावर बसमध्ये चढतो आणि टिकीट काढतो. बस चालू झाली आणि तो आठवणीच्या प्रवाहात मागे वाहू लागला. त्यावेळी तो ऑफिसला जायचा. रोजचा त्याचा प्रवास बसने व्हायचा. तेव्हा ती हि त्याचवेळेची बस पकडायची. अशीच रोजची त्यांची झालेली ओळख मैत्रीच्या रुपात हळूहळू खुलत होती. अशाच एका वेळीस ती थोडी उदास वाटली. त्याने तिला विचारलं… “काय गं काय झालं आज अशी उदास का वाटतेस तू?” ती म्हणाली, काही नाही रे उद्या सकाळी आम्ही ५, ६ दिवसांसाठी गावी लग्नाला जाणार आहोत.. त्याने तिला विचारलेले कि तू उदास का वाटतेस पण हे ऐकून तो स्वत: पण उदास झाला होता.
पण त्याला आनंदही झाला होता कि ती आपल्यासाठी उदास झाली आहे. तो तिला म्हणाला, “अगं मगं उदास होण्याचे काय कारण आहे त्यात?” ती म्हणाली, अरे मी ५, ६ दिवसांसाठी जाणार आहे आणि आता आपण ५, ६ दिवस…. असं...