खाज, खरूज, नायटा यापासून २ दिवसात तुमची सुटका करेल हा उपाय

नमस्कार

मित्रांनो, जर खाज, खरूज, नायटा याला मूळापासून नष्ट करायचे असेल, तुम्ही त्यापासून
त्रासले असाल, खूप क्रीम वापरुन बघितली असतील पण उपयोग झाला नसेल, तर एकदा माझ्या सांगण्यावरून हा घरगुती उपाय नक्की करून बघा, जुन्यात जुना नायटा, खरूज नाहीशी होईल. मी इथे घेतले आहे कारले.

तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की कारले कडू असते पण ते आपल्या त्वचारोगाला ठीक करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. खासकरून खाज, नायटा खरूज यावर गुणकारी आहे. तुम्हाला काय करायचे आहे, कारल्याचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्या गोल काचर्‍या करून घ्या. त्याची आपल्याला मिक्सरवर पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

मित्रांनो, हा एक आयुर्वेदीक उपाय आहे जो मी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. तुम्ही बाजारातील क्रीम आणून, महागडी औषधे आणून खूप पैसे खर्च केले असतील पण तुम्हाला त्याचा एवढा फायदा झाला नसेल, किंवा झाला असेल तरी परत नायटा होत असेल तर हा उपाय जरूर करून बघा. हा उपाय मूळापासून हा त्वचारोग नाहीसा करेल.

खूप कमी वेळात हा घरगुती उपाय तुम्हाला परिणाम देईल. तुम्हाला माहीत आहे की कारले किती गुणकारी आहे. छोटे छोटे पुरळ येऊन जर खाज, खरूज होत असेल, त्यात पू झाला असेल, तर हा उपाय नक्की करून बघा. एकदा हा उपाय काही दिवस करून बघा. १ चमचा पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. १ मोठा चमचा कारले पेस्ट तुम्हाला घ्यायची आहे.

जंतुसंसर्गाचे सगळ्यात मोठे कारण काय आहे तर जिथे आपल्याला जास्त घाम येतो, जिथे आपल्या शरीराला हवा लागत नाही, मांड्यांमध्ये, जांघांमध्ये होऊ शकते. दुसरी वस्तु आहे कापुर. आपण पूजेला जो वापरतो तो कापुर घ्यायचा आहे. बरोबर नारळ तेल घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला फक्त छोटा तुकडा कारले, कापुर २ ते ३ वड्या व थोडेसे १ चमचा नारळ तेल घ्यायचे आहे.

नारळ तेलात भरपूर प्रमाणात विटामीन ई असते, तसेच त्यामध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. कापुरामध्ये पण अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्यामध्ये त्वचारोग लवकर ठीक करण्याची क्षमता असते. कापुराची पाऊडर बनवायची आहे. एकदम आयुर्वेदिक असा हा उपाय आहे. कापुर मऊ असल्याने पाऊडर लगेच होते.

आपल्या शरीराची स्वछता ठेवणे खूपच जरूरी आहे. घरातील लोकांना पण त्याचा संसर्ग होऊ शकतो म्हणून स्वछता ठेवणे खूप गरजेचे आहे. स्नान झाल्यावर अंग कोरडे करा. आता कारल्याच्या पेस्ट मध्ये नारळ तेल, कापुर पाऊडर घाला. पेस्ट मिसळून घ्या.

आता जिथे तुम्हाला खाज, खरूज, नायटा झाला आहे तिथे ती पेस्ट लावा, जिथे तुम्हाला जंतुसंसर्ग झाला आहे, जिथे खाज येते आहे, हलके मालीश करून लावा. खूपच स्वस्त असा हा उपाय आहे. १०० टक्के परिणाम देणारा हा उपाय आहे.

रात्रभर पण हा लावून तुम्ही ठेवू शकता व नंतर कोमट पाण्याने तिथे धुवून घ्या. आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *