घरच्याघरी बनवा कांद्याचे तेल, पांढरे केस मुळापासून काळे होऊन, गळती होईल कमी…

लांब, घनदाट व सुंदर केस सगळ्यांनाच आवडतात. लहान वयात आपण कितीतरी वेळा आपल्या केसांवर काही अशा वस्तूंचा वापर करतो ज्यामुळे आपले केस कमजोर होऊ लागतात, ज्यामुळे केस तुटू लागतात किंवा गळू लागतात. केसांच्या गळण्याची अनेक कारणे आहेत, जसे की केसांची योग्य काळजी न घेणे, केसांना कलर करणे, केसांवर वेगवेगळी क्रीम लावणे व केसांना जरूर असलेले पोषण न मिळणे.

अशी कितीतरी कारणे आहेत ज्यामुळे आपले केस लांब होत नाहीत व ते वेगाने गळतात. कितीतरी वेळा आपण बाजारात उपलब्ध असलेली अधिक हेयर ब्युटि प्रसाधने वापरतो, जी केमिकल युक्त म्हणजेच त्यामध्ये रसायने असतात, तसेच ही महाग असतात. त्यांच्या वापरामुळे आपल्या केसांना खूप नुकसान होते. त्यामुळे आपले केस गळू लागतात, केसांची वाढ थांबते.

तर आज मी तुमच्या ह्या समस्येवर उपाय घेऊन आले आहे. ज्याच्या उपयोगामुळे तुमच्या केसांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही किंवा तुमचा कोणताही खर्च होणार नाही. या उपायामुळे तुमचे केस वेगाने वाढतील व केस गळतीची समस्या समाप्त होईल. ती वस्तु आहे कांदा. कांदा आपल्या केसांची वाढ होण्यासाठी अत्यंत फायदेमंद आहे.

आपण ह्या उपायामध्ये केसांसाठी कांद्याचा उपयोग करणार आहोत. हा एक रामबाण उपाय आहे. कांद्यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट व सल्फर असते जे केसांच्या वाढीसाठी मदत करते. यासाठी तुम्हाला एका कांद्याचा रस काढून घ्यायचा आहे. कांदा सोलून एकतर किसून घ्या किंवा तुकडे करून मिक्सरवर रस काढा. तुम्हाला हा रस गाळून घ्यायचा आहे.

एका कांद्याचा रस केसांसाठी पुरेसा आहे. आता जाणून घेऊया की हा कांद्याचा रस केसांवर कशा प्रकारे लावायचा आहे. केसांच्या मुळाशी हा कांद्याचा रस तुम्हाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे व मसाज करायचा आहे. ५ ते १० मिनिटे केसांच्या मुळाशी कांद्याचा रस लावून मालीश करायचे आहे. १५ ते २० मिनिटे ते तसेच केसांवर ठेवायचे आहे व नंतर कोणत्याही शॅम्पूच्या मदतीने आपले केस स्वछ धुवायचे आहेत.

हा उपाय रात्री केला तर जास्त उत्तम आहे. त्यामुळे केसात हा रस चांगला मुरेल व केस गळती थांबेल. तुम्हाला टक्कल पडले असेल तर हा कांद्याचा रस उपयोगी आहे. आठवड्यातून एकदा हा उपाय तुम्ही करू शकता. पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या खाण्याकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही पौष्टिक आहार घेणे जरूरी आहे. त्यामुळे केसांना जरूरी पोषण मिळेल.

आपल्या आहारात असे पदार्थ समाविष्ट करा, ज्यामध्ये आर्यन, झिंक, विटामीन ए व विटामीन सी जास्त प्रमाणात असेल. तसेच तुम्हाला रोज जास्तीत जास्त पाणी पिणे जरूरी आहे. हा उपाय केल्याने तुमची केस गळती थांबेल व केस लांब व्हायला मदत होईल. माझी

ही माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *