फक्त २ रुपयाची खडीसाखर, सर्दी खोकला, छातीतील कफ एका रात्रीत गायब…

आज आपण सर्दी, खोकला, कफ यावर रामबाण असा उपाय आपण पाहणार आहोत. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे दालचिनी. दालचिनी ही मसाल्यामधीलचं एक पदार्थ आहे. दालचिनी आपल्या शरीरासाठी खुपच फायदेशीर आहे.

मित्रांनो टोरहो नावाचा एक सर्वात जुना जुहू धर्मातला एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये दालचिनीचा खास उल्लेख करण्यात आलेला आहे. दालचिनीच्या औषधी गुणधर्माचे सविस्तर वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. दालचिनीमध्ये स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, भस्म, कॅल्शियम असते, लोह, फॉस्फरस, सोडीयम, पोटॅशियम, थायमिन, नियासीन, अ, ब, क ही जीवनसत्वे त्याच्यामध्ये असतात.

दुसरा घटक लागणार आहे आलं. मित्रांनो आलं हे खोकला असेल, सर्दी असेल कफ पातळ होऊन बाहेर काढण्यासाठी या आल्याचा चांगल्याप्रकारे वापर केला जातो. आलं हे आपल्या पोटातील वायूचा गॅसचा नाश करण्यासाठी आपण आल्याचे सेवन करतो. तुमच्या स्नायूंमध्ये जर वेदना होत असतील तर त्या भागावर बाहेरून आल्याची पेस्ट लावली तर ते कमी होऊ शकते.

दमा असेल, डांग्या खोकला असेल, क्षयरोगाचा खोकला असेल हे अनेक आजाराच्या खोकल्यांवर हे आलं खुप फायदेशीर आहे. खासकरून सर्दी आणि खोकल्यासाठी हे रामबाणचं आहे, असे म्हटले तर हरकत नाही. त्यामुळे याचा समावेश यामध्ये केलेला आहे. तिसरा घटक आहे ते म्हणजे खडीसाखर. खडीसाखर ही थंड असते. जर आपल्या अंगामध्ये उष्णता वाढली असेल तर खडीसाखरेचे सेवन आपण अवश्य केले पाहीजे. खडीसाखर ही अतिशय फायदेशीर आहे.

मित्रांनो जर तुम्हाला लघवी जळजळ करत असेल तरीसुद्धा खडीसाखरेचे सेवन केलेलं अतिशय चांगले असते किंवा तुमचे पाय जळजळ करत असतील, हात भगभग करत असतील त्याच्यावर सुद्धा रामबाण उपाय म्हणून आपण खडीसाखरेकडे पाहू शकतो. खडीसाखर ही आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे.

या तिन्ही घटकांचा समावेश करून आपल्याला सर्दी, खोकला, कफ यासाठीचा उपाय करायचा आहे. या उपायासाठी सुरुवातीला आपल्याला एक कप पाणी लागणार आहे. या एक कप पाण्यामध्ये एक छोटासा खडीसाखरेचा खडा टाकायचा आहे किंवा याची पावडर करून टाकू शकता. यानंतर दुसरा घटक लागणार आहे दालचिनी.

दालचिनी ही आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. पण ती कमी प्रमाणामध्ये, अति प्रमाणामध्ये त्याचे सेवन अजिबात करू नये. कारण कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केले तर त्याचा साईड इफेक्ट हा ठरलेलाच असतो. दालचिनी टाकल्यानंतर त्यामध्ये आलं टाकायचे आहे. आलं कापून त्याचे छोटे दोन चार तुकडे टाकू शकता.

आता या मिश्रणाला उकळवून घ्यायचं आहे. तर हा अर्धा कप होईपर्यंत उकळून घ्यायचे आणि हे जर तुम्ही घेतले तर तुमचा कफ असेल, सर्दी असेल निघून जाण्यास मदत होते. थोडे कोमटचं घेऊ शकता. जसं की आपण गरम पाणी करून पितो तसं प्यायचे आहे. सर्दी, खोकला, कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा उपाय आहे. तर याचा नक्कीच वापर करुन पाहा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *