नारळ तेलात हे मिसळून लावा, केस इतके वाढतील कि विंचरताना कंटाळा येईल..

पातळ, गळणार्या केसांना आता बनवा लांब, घनदाट, काळे व ते पण मूळापासून. मी आज एक असा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जो तुमच्या केसांची गळती थांबवेल, केसांची वाढ चांगली होईल. हा नैसर्गिक उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करायचा आहे.

सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत, एलोवीरा. एलोवीराची ताजी पाने व जेल याची गोष्टच निराळी आहे. मार्केट मध्ये हे जेल उपलब्ध आहे पण तुम्ही ताजेच वापरा. एलोवीरा पान कापल्यानंतर १० मिनिटे ते धुवून उभे करून ठेवा म्हणजे त्यातील पिवळा पदार्थ सहजपणे निघून जाईल.

तो थोडा एलर्जीक असतो म्हणून काढून टाकणे जरूरी आहे. नंतर एलोवीरा परत पाण्याने धुवून घेणे. कोरड्या कपड्याने पुसून घ्या. नंतर पानांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. बाजूची काट्याची बाजू काढून टाका. नंतर वरची साल काढून आतून गर काढून घ्यायचा आहे. एलोवीरा सगळ्या प्रकारच्या केसांना उपयोगी आहे.

कोणत्याही वयाची माणसे हा एलोवीरा गर लावू शकतात. एलोवीरा पोषक तत्वांचे भांडार असते व कोणत्याही प्रकारच्या त्वचेला योग्य पोषण देऊ शकते. तेलकट किंवा कोरड्या त्वचेला उपयोगी आहे. पानांचा गर किंवा जेल काढून घेतले आहे. प्रकृतीचे एलोवीरा हे एक वरदान आहे. औषधी गुणधर्म असलेले हे एक निसर्गाचे वरदान आहे.

आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी उपयोगी आहे. एलोवीरा जेल मध्ये विटामीन बी१, बी२, विटामीन बी१२, विटामीन सी असते तसेच यामध्ये विटामीन ई पण असते. कोणत्याही प्रकारचे रसायन त्यात नसते, केमिकल फ्री आहे. नंतर काही कडुंनिंबाची पाने घ्या. पावसाळयात आपल्या केसात कोंडा होऊ शकतो म्हणून कडूनिंब फायदेशीर आहे.

६ ते ७ कडुंनिंबाची पाने या एलोवीरा जेल मध्ये टाका. जंतुसंसर्गामुळे पण केस गळती होऊ शकते. हा हेयर मास्क जर तुम्ही केसांना लावला, तर दोन तोंडे असलेले केसांच्या समस्येपासून सुटका होईल. केसांना जेव्हा चांगले पोषण मिळेल, तेव्हाच केसांची चांगली वाढ होईल, केस गळणे थांबेल.

आता एलोवीरा व कडुंनिंबाची पाने मिक्सरवर वाटून घ्या पाणी घालायची जरूर नाही. १ चमचा नारळ तेल, किंवा तिळाचे तेल त्यात घाला व मिक्सरवर वाटून घ्या. आठवड्यातून एकदा केसांना तेल लावून ठेवा, कोणताही हेयर मास्क केसांना लावा. आता ही पेस्ट तयार झाली आहे. एलोवीरा केसांना नैसर्गिक चमक देतो, मोयश्चराइज करतो, केसांना मुलायम बनवितो.

केस कोरडे झाले तरी गळू लागतात. केसांना तेल लावून नंतर हेयर मास्क अशा पद्धतीने लावा. मूळापासून पूर्ण डोक्याच्या त्वचेवर लावा. नंतर केस साध्या पाण्याने केस धुवा. दुसर्यात दिवशी शॅम्पू करा. ही माहिती आवडली तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *