दातातील कीड 5 मिनिटात बाहेर, दाढ दुखी साठी घरगुती उपाय, डॉ तोडकर उपाय…

मित्रांनो दात हा आपल्या शरीराचा असा अवयव आहे कि जो आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. मात्र आपण त्याच्याकडे पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. दात व्यवस्थित न घासल्यामुळे व जेवणानंतर व्यवस्थित चूळ न भरल्यामुळे आपल्याला दातांचे अनेक प्रकारचे आजार होत असतात.

दातांच्या मध्ये अन्नाचे कण अडकल्यामुळे बऱ्याच वेळेला आपले दात किडतात, त्याचबरोबर दाढे मध्ये सुद्धा अन्नचे कण अडकुन दाढीसुद्धा किडायला चालू होतात. कालांतराने त्याच दुखणे एवढे वाढते की आपल्याला दात, दाढ कडून टाकावी लागते. एकदा दात किंवा दाढ दुखायला लागली की त्याच दुखणे इतके असाह्य असते की आपले कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, आणि आपल्याला त्यावर हायर अँटिबायोटिक घेणे गरजेचे असते. नाहीतर हे दुखणं थांबताच नाही.

काही वेळेला दातांच्या मध्ये पु होतो आणि त्यांच्यामधून ही आपल्याला वेदना जाणवतात. मित्रांनो ह्या समस्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. आपल्या घरगुती पध्दतीने एक साधा आणि सोपा उपाय मी तुमच्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. ह्या उपाय तुम्ही केला तर तुमचा किडलेला दात किंवा तुमची किडलेली दाढ ज्या ठिकाणी असेल तर त्या मधून कीड ही आपोआप बाहेर पडेल. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही ऍलोपॅथिक औषधाची गरज पडणार नाही.

या साधा आणि सोप्या उपायांसाठी आपल्याला घरामध्येच मिळणाऱ्या तीन घटकांची आवश्यकता आहे. या उपायांसाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे “तुळशीचं पान” आपल्या घराच्या परिसरामध्ये तुळस ही सहज उपलब्ध होत असते. तुळस ही शरीराला थंडावा देते. त्याचबरोबर तुळशीमध्ये असणारे जे अंडी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत, त्यामुळे दात दुखीवर किंवा दाढ दुखी वर हा एक चांगला उपाय आहे.

त्याचबरोबर आपण दुसरा जो पदार्थ वापरणार आहे, तो म्हणजे “लवंग”आपल्या स्वयंपाक घरामध्ये लवंग सहज उपलब्ध असते. कारण तो एक महत्वाचा असा मसाल्याचा पदार्थ आहे. त्यानंतर तिसरा जो आपण पदार्थ घेतलेला आहे तो म्हणजे ‘हळद’ आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असते. हळद ही अँटी सेप्टीक म्हणून काम करते.

त्यामुळे दाढ दुखीवर व दातांच्या मध्ये झालेली जी कीड आहे त्या किडीवरती हळद हा एक चांगला उपाय आहे. आपल्याला काय करायचं आहे तर सर्व प्रथम आपण लवंगा ह्या एका खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या आहेत. पाच ते सहा लवंगा एकत्र आपल्याला या ठिकाणी कुटून घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचा आहे.

एक वेळ उपाय करताना आपल्याला एका तुळशीच्या पानांचा वापर करायचा आहे. या तुळशीच्या पानांमध्ये आपण कुटून घेतलेली लवंग आहे, त्याची एक चिमटभर पूड घ्यायची आहे, ही पूड ह्या पानांवर ठेवायची आहे. या नंतर एक चिमूटभर हळदीचा वापर ह्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. ही हळद देखील आपल्याला ह्या पानांवर टाकायची आहे. ह्या ठिकाणी तुळशीचं पान, लवंगाची पूड आणि हळद यांचे जे मिश्रण आहे त्याची आपल्याला एक गोळी तयार करायची आहे.

अश्या पद्धतीने ही जी तयार झालेली गोळी आहे, ती ज्या ठिकाणी तुमची दाढ दुखत आहे किंवा दातांच्या मध्ये ज्या ठिकाणी कीड लागली आहे किंवा दाढ किडलेला असेल तर त्या ठिकाणी ही गोळी पाच ते दहा मिनिटे तुम्हाला दाताखाली किंवा दाढेखाली दाबून ठेवायची आहे. याच्यामुळे काय होणार आहे तर तुळशीच्या पानाचे जे थंडक देण्याचे जे गुणधर्म आहेत त्यामुळे त्या ठिकाणच्या वेदना कमी होणार आहेत.

हे जे मिश्रण आहे हे तुम्ही चावून गिळू शकता, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे. तुळस , लवंग , आणि हळद आपण नेहमीच्या वापरामध्ये वापरत असतो आणि त्यामुळे हे मिश्रण तुम्ही चावून सुद्धा खाऊ शकता. असाच जर उपाय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा केला तर तुमची जी दात दुखी आहे किंवा दाढे मधील जी कीड आहे ती कीड लगेच बाहेर येणार आहे.
हा उपाय अतिशय गुणकारी आहे. आयुर्वेदिक आहे, याला कोणताही साईड इफेक्ट नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय दोन ते तीन वेळा करू शकता.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *