जेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा पदार्थ खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल ! अपचन, पोटाची चरबी, गॅस 100%बंद

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. बऱ्याच व्यक्तींना पोट साफ न होणे, अपचन, करपट ढेकर येणे, मूळव्याध वजन वाढणे, नेहमी थकवा असणे, वारंवार गॅस होणे, लघवी साफ न होणे, तोंडाचा वास येणे, या व इतर सर्व समस्या कमी करण्यासाठी घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासून आज आपण उपाय बनवणार आहोत.

मित्रांनो सर्व आजाराचे मूळ हे पोट असते. पोटाचे विकार वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद अस सांगतो की 90% आजार हे अपचनामुळे होतात. हेच अपचन मुळापासून जाण्यासाठी आपण आज उपाय करणार आहे. चला तर या उपायालासुरुवात करूया.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ‘सेंधव मीठ’. सेंधव मीठ हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असत. त्यातल्या त्यात अपचनाचा संबंधित सर्व समस्या कमी करण्यासाठी खुपच उपयोगी आहे. या मध्ये भरपूर प्रमाणात झिंक, लोह मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटक असतात. ज्याद्वारे शरीरातील ब्लड प्रेशर स्थिर ठेऊन शरीरातील इलेट्रो लाइट च संतुलन साधल जात.

तसेच ट्रेस, ताणतणाव, भूक न लागणे तसेच या मीठाच्या वापराने चरबी कमी होते. म्हणून या उपायासाठी एक चमचा सेंधव मीठ लागणार आहे. एका प्लेट मध्ये आपल्याला हे सेंधव मीठ घ्यायचे आहे. पुढचा पदार्थ घ्यायचा आहे ‘पाणी’. सेंधव मिठामध्ये एक चमचा पाणी टाकायचे आहे. त्यानंतर हे दोन्ही घटक एकजीव करायचे आहेत.

पुढचा पदार्थ लागणार आहे ‘ओवा’. पोटाच्या विकारावर ओवा खूप रामबाण आहे. या मध्ये असणारे घटक छातीमध्ये जमा असणारा कॅप, छातीत व पोटात होणारी जळजळ, गॅसेस, आमल्पित कमी करण्यासाठी, तसेच हार्मोन्स बेलेन्स होण्यासाठी हा ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो. म्हणून या उपायासाठी 2 चमचे ओवा घ्यायचा आहे.

हा ओवा आपल्याला सेंधव मीठ आणि पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करायचा आहे. पुढचा पदार्थ लागणार आहे ‘बडीशोप’. बडीशोप पोटाच्या विकारासाठी खूप उपयुक्त असतो. तसेच शरीरातील चरबी कमी करण्यासाठी बडीशोप अत्यंत लाभदायक असते. म्हणून या उपायासाठी दोन चमचे बडीशोप घ्यायची आहे. असे ही तीनही पदार्थ चांगल्याप्रकारे मिक्स करायचे आहेत.

हे चांगल्याप्रकारे एकजीव झाल्यानंतर हे मिश्रण तव्यावर्ती टाकायचे आहे. हे मिश्रण चांगल्याप्रकारे भाजून घ्यायचे आहे. चांगल्याप्रकारे भाजून घेतल्यानंतर हे मिश्रण काढून घ्यायचे आहे. हे मिश्रण गरम असतांनाच काचेच्या बाटलीत भरून ठेवायचे आहे.

हे जे तयार झालेलं चूर्ण आहे हे काचेच्या बाटलीत ठेवल्यानंतर हे चूर्ण जेवण केल्यानंतर याचा फक्त एक चमचा घ्यायचा आहे. दररोज संध्याकाळी घ्या. सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होण्यास खूप लाभ होतो. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *