जेव्हा जमतील तेव्हा याचे ४ दाणे खा, प्रचंड वाढलेले पित्त 2 दिवसात संपूर्णपणे कमी, मणक्यातील गॅप, अशक्तपणा घालावा…

मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना किंवा साधारणतः सध्या शहरी जीवनात तसेच ग्रामीण जीवनात पित्ताची समस्या अत्यंत बिघडत चालली आहे आणि प्रत्येकाला पित्ताच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती, मानसिक शारीरिक विकास, चक्कर येणे, पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता, गुढघेदुखी, सांधेदुखी, थोडं वय झालं की चालायला अडचण अशा बऱ्याच समस्या आपल्याला भेडसावत आहेत.

यावरती आपण एक चांगला उपाय पाहणार आहे. यासाठी आपल्याला चारोळी लागणार आहे. ही चारोळी प्रत्येकाच्या घरी असते. हिंदीमध्ये हिला चिरोंजी असे म्हटले जाते आणि गावठी भाषेमध्ये चारं असे म्हटले जाते. चाराच्या ह्या बिया म्हणजेच चारोळी या जेव्हा आपण बासुंदी खातो तेव्हा हमखास पाहायला मिळतात. या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

या बिया इतक्या ताकदवर आहेत की आपले रोग सहज मिटवतात. त्यात पित्ताची समस्या आहे ती सहज कमी होते. या चारोळी मध्ये कॅलरीज प्रमाण कमी असते. प्रोटीन, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B त्याचप्रमाणे नियासीन, फायबर मुभलक प्रमाणात असतात. याचबरोबर चारोळीत लोह, कॅल्शियम, फॉस्फरस हे घटक खुप प्रमाणात असतात. म्हणून याचा आपल्या शरीराला अत्यंत उपयोग होतो.

ज्या व्यक्तींना शारीरिक कमजोरी आहे त्या व्यक्तींनी रोज सकाळी आणि संध्याकाळी दुधामध्ये थंड किंवा गरम कोणतेही दूध वापरू शकता, त्यामध्ये चारोळी टाकून खाल्ल्या तरी चालतील. जर चारोळी मिळाली नाही तर चारोळीची पावडरही वापरु शकतात. एखाद्याला सर्दी झाली असेल किंवा खोकला झाला असेल तर त्यांनी संध्याकाळी दुधामध्ये टाकून खायची आहे.

डोकेदुखी, एखाद्याला चक्कर येणे किंवा अशक्तपणा मुळे बऱ्याच जणांचे हातपाय दुखतात, सांधेदुखी होते. तर या सांधेदुखी साठी ही चारोळी अत्यंत उपयोगी आहे. पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता असते, मग अशा वेळेस मुल होण्यास अडचण येते ही कमतरता भरून काढण्यासाठी ही चारोळी आपण दुधात एक चमचा पावडर टाकून रोज संध्याकाळी जेवणानंतर घेतले तर चांगले. लगेच तुम्हाला याचा रिजल्ट मिळेल.

यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टरीयल गुण असतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पडतात किंवा वय दिसायला लागते, ते वय यामुळे दिसणे कमी होऊन जाते. मित्रांनो चारोळीची पावडर व कोरफड जेल म्हणजेच कोरफडीचा गर एकत्र केला व चेहऱ्याला लावला तर चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स म्हणजे मुरूम तो कमी होण्यास मदत होते.

ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींनी जर चारोळीचा वापर आपल्या आहारात केला तर त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक असा उपाय म्हणजे पित्त. ज्या व्यक्तींना पित्त आहे त्या व्यक्तींनी रोज सकाळी या चारोळीचे दाणे उपाशीपोटी न दुधात टाकता तसेच खायचे आहेत. साधारणतः पाच ते दहाच दाणे खावेत. तर तुमचे पित्त हळूहळू कमी होते.

पित्तासाठी एक गोष्ट अजून अशी की तुम्ही वेळेवर जेवण करा. त्यामुळे देखील पित्त नियंत्रित होण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी जेव्हा एखादी स्त्री बाळांतीन बनते म्हणजे एका मुलाला जन्म देते त्यानंतर आईला ही चारोळीचे दाणे दिले जायचे. का? तर तीची रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून. एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर सूज आली असेल तर या चारोळीचे तेल काढायचे आणि तेल त्यावरती मॉलिश करायचे.

अजून एक महत्त्वाची आहे की बऱ्याच लोकांना मुलं खुप हुशार हवेत म्हणजे हुशार व्हावे असे वाटत असते. हुशार होण्यासाठी या चारोळीचा उपयोग खुप चांगल्या प्रकारे करू शकता. या चारोळीचा नियमित मुलांच्या आहारात वापर केला किंवा सेवन करायला लावले तर मुलांचा बौद्धिक विकास तसेच शारीरिक विकास चांगल्या प्रकारे होतो आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

स्मरणशक्ती साठी तुम्ही एक चमचा मध व चारोळीचे दाणे एकत्र करून त्यांना दिले तर स्मरणशक्ती चांगली वाढते. मित्रांनो ही चारोळी आपल्याला अत्यंत उपयोगी आहे आणि आयुर्वेदात या चारोळीला खुप चांगले मानले गेले आहे. म्हणून हे जे दाणे आहेत ते जगातील शक्तीशाली दाणे आहेत, असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *