आठवड्यातून एकदा लावा केस इतके वाढतील की, जमिनीवर लोळू लागतील…

आठवड्यातून एकदा लावा, केस इतके लांब होतील, की ते कापावे लागतील. वेगाने होणारी केसांची वाढ उपाय मी आज तुमच्यासाठी घरगुती उपाय घेऊन आले आहे, ज्यामुळे तुमचे केस मुलायम, चमकदार होतील. त्याचबरोबर केसांची लांबी खूप वाढेल. दोन तोंडे येणार्‍या केसांची समस्या नाहीशी होईल.

तुम्ही बघितले असेल, की केसांची जी खालची टोके असतात, म्हणजे शेवटचे टोकाकडील केस याला कितीतरी वेळा दोन तोंडे असतात, या त्रासापासून सुटका होईल. मी इथे घेतले आहे, व्हॅसलिन. व्हॅसलिन केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. काही दिवस तुम्ही हा उपाय करून बघितला, तर तुम्ही बघाल तुमचे केस इतके लांब वाढतील, केसांचे गळणे थांबेल, दोन तोंडे येणार्‍या केसांपासून तुम्हाला सुटका मिळेल.

आपल्या केसांच्या गळण्याचे मुख्य कारण आहे सुके व रुक्ष केस. व्हॅसलिन आपल्या केसांना हायड्रेट करते, नरीष करते, व चमकदार बनविते. त्याचबरोबर, वेगाने केसांची वाढ होण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. एक चमचा नारळ तेल त्यात मिसळा. दोन्ही वस्तु चांगल्या प्रमाणात मिक्स करा.

आपल्या घरात या दोन वस्तु सहज उपलब्ध असतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय करून बघा. एका महिन्यात तुम्हाला केसांमधील फरक कळेल. जर मिक्स होत नसेल, तर गरम पाण्यात वाटी ठेवून त्यात या दोन वस्तु ठेवा सहज मिसळल्या जातील. नंतर त्यात तिसरी वस्तु तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे एलोवेरा जेल.

तुम्ही वाटल्यास फ्रेश ज्यूस घेऊ शकता, जर घरात एलोवेराचे झाड असेल तर. 2 चमचे एलोवेरा जेल घ्यायचे आहे. एलोवीरा आपल्या केसांसाठी वरदान आहे. केसांची गळती थांबते, कोंडा असेल तर तो नाहीसा होतो. आपल्या केसांना पोषक तत्व देते एलोवीरा जेल. केस मूळापासून मजबूत होतात. केसांची लांबी जास्त असेल तर हे दुप्पट प्रमाणात घ्या.

हा उपाय तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे व व्यवस्थित केसांना मालीश करायचे आहे. म्हणजे ह्याचा पूर्ण फायदा मिळेल. हे उपाय रात्रीच करायचा आहे, त्यामुळे रात्रभर केसांच्या मुळाशी लावल्यामुळे त्याचा चांगला फायदा मिळेल. नारळ तेल तर खूप जुन्या काळापासून आपण वापरतो आहोत.

केसांची जेवढी जास्त चांगली काळजी घ्याल तेवढे केस चांगले राहातील. केसांच्या टोकाकडे लावायला विसरू नका. ह्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. हा हेयर पॅक आपल्या केसांच्या मुळाशी कसे लावायचा ते मी दाखविते. मुलगा, मुली कोणीही याचा वापर करू शकतात.

कमी वयात केस गळतात त्यापासून सुटका होईल. माझी मुलगी पण केसांची चांगली काळजी घेते. १०० टक्के याचा फायदा होतो. माझी ही माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *