हे ९ संकेत सांगतात तुमची किडनी हळू हळू खराब होत आहे…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्या शरीरात तसे सगळेच अवयव काम करत असतात, पण हृदय नंतर न थांबता काम करणारा अवयव आहे तो म्हणजे किडनी. आपली किडनी ही 24 तास काम करत असते. आपल्या शरीरात पाणी किती असावे याचे संपूर्ण नियोजन ही किडनी करत असते. त्याचप्रमाणे आपण खात असणाऱ्या सर्वच पदार्थामध्ये अनेक प्रकारचे विषारी घटक असतात. ते रक्तात जातात आणि ते रक्तात न जाऊ देण्याचं काम ही किडनी करत असते. मित्रानो तुमची किडनी खराब होण्याचे ही नऊ लक्षणे आहेत.

मित्रानो सकाळी झोपेतून उठल्यानंतर झोपेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करत असतो. आपण अशा वेळी शारीरिक ताकदीचा पुरेपूर वापर करून घेत असतो. पण बऱ्याचदा आपण आपल्या शरीराकडून येणाऱ्या सिगनल्सकडे दुर्लक्ष करतो. यातले बरेचशे शरीरातील एखाद्या अवयवाचे बिघाडीचे असतात. पण आपण असच त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो तर गंभीर शारीरिक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो.

बऱ्याचदा हे सिग्नल्स किडणीसारख्या अवयवाकडून पाठवले जातात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने काही गंभीर परीणाम शरीरावर होत असतात. तर आज आपण अशा नऊ समस्याबाबत जाणून घेणार आहोत. पहिली समस्या आहे अपरात्री जाग येणे, झोप न येणे. शरीरातील अनावश्यक घटक मूत्राशयामार्गे किडनीच्या मदतीने शरीराबाहेर काढले जातात. परंतु जेव्हा किडन्या व्यवस्थित काम करत नसतात तेव्हा अनावश्यक आणि अपायकारक घटक शरीरात जसेच्या तसे राहतात.

रक्तातील त्यांचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे रक्त दूषित होत जाते. याचा सरळ परिणाम झोपेवर होत असतो. अपरात्री जाग येणे, झोप न येणे हे किडनीचे कार्य व्यवस्थित सुरू नसल्याचे सिगनल आहे. दुसरी समस्या आहे तांबड्या रक्तपेशींची संख्या कमी होणे. जर किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर शरीरातील लाल रक्तपेशींवर सरळ परिणाम होत असतो. लाल रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करत असतात. जर त्यांची संख्या कमी असेल तर ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. यामुळे मांसपेशी आणि मेंदूच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होतो.

तिसरी समस्या आहे चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे, पट्टे येणे. किडनीच्या विकारामुळे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका देखील निर्माण होत असतो. जर 20 ते 25% किडनीचे कार्य व्यवस्थित होत नसेल तर ही परिस्थिती उद्धभवते. चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे, झोपताना थकवा जाणवणे याची ही लक्षणे आहेत.

चौथे लक्षण आहे शरीरातील पाणी कमी होणे. जेव्हा किडनी शरीरातील आवश्यक गोष्टी अनावश्यक घटकांचा ताळमेळ साधू शकत नाही तेव्हा शरीरातील पाणी कमी होत जाते, शरीर कोरडे पडते. शरीरातील पाणी कमी झाल्याने हाडांचे आजार उद्भवतात. जास्त पाणी प्यायल्याने ह्या आजारांवर सहज मात करता येऊ शकते. पण पुढे उद्भवणारी धोक्याची परिस्थिती टाळली जाऊ शकते. मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

पाचवे लक्षण आहे तोंडाची दुर्गंधी येणे, तोंडाचा वास येणे. किडनी जर व्यवस्थितपणे काम करत नसेल तर अनावश्यक टाकाऊ पदार्थ शरीरात राहतात. त्यामुळे जेवेच्या चवीवर परिणाम होतो, तोंडाचा वास येतो, वजन प्रचंड कमी होत जाते. विषारी पदार्थ रक्तात साचल्यामुळे ते दूषित होते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा परिणाम होतो. असे काही लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. सहावे लक्षण आहे श्वास घेण्याची क्षमता कमी होणे. श्वास घेण्याची क्षमता कमी होणे देखील किडनी विकाराचे लक्षण आहे. शरीरात असलेले ऍक्सेस फ्लूड त्याला कारणीभूत असते.

सातवे लक्षण आहे अंगाला जास्त घाम येणे. खुप जास्त वेळ एखाद्या ठिकाणी बसल्यावर तळव्याला घाम येणे हे सुद्धा किडनीच्या फेल होण्याचे लक्षण आहे. किडनी अनावश्यक द्रव्य काढून फेकण्याची क्षमता कमकुवत असल्यामुळे असे होत असते. बऱ्याचदा खालच्या अंगाला घाम येण्याचा विकार नसामधील शक्तीमुळे होत असतो. हृदय विकार आणि यकृताचे विकार देखील याला तितकेच कारणीभूत असतात.

आठवे लक्षण आहे पाठदुखी आणि पायदुखी. यातील विकार हा मूळदा कंबरेच्या अथवा बरगडी खालच्या भागात होत असतो. यामुळे विषारी पदार्थ शरीराच्या वेगवेगळ्या भागात साचतात आणि आम्ल तयार करत असतात. त्याने पुढे जाऊन हे विकार उद्भवतात.

नववे लक्षण आहे लघवीचा त्रास होणे. लघवीचा त्रास होणे, ताप येणे, पाठ दुखणे ही किडनी निकामी होण्याची लक्षणे आहेत. जास्तीत जास्त पेनकिलर्स घेतल्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. यापैकी कुठली लक्षणे तुमच्यात दिसत असेल तर तुम्ही अवश्य डॉक्टरकडे गेले पाहिजे. त्यांचा वेळोवेळी सल्ला घेतला पाहिजे. त्यामुळे आपली किडनी फेल होण्याचा धोका टळतो.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *