वर्षातून हे फळ 1 वेळ खा, आयुष्यभर मुतखडा होणार नाही, कितीही मोठा मुतखडा तुकडे तुकडे होईल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत की जे लवकर बरे होत नाहीत. अश्या या आजारांचा त्रास खूप भयंकर असतो. त्यातीलच एक आजर म्हणजे मुखडा किंव्हा किडनी स्टोन. सध्याचा आहार, चुकीच्या सवयी, क्षारयुक्त पाण्याच्या जास्त वापर करणे, आपले शरीरास जेवढे पाणी लागते तेवढं पाणी आपल्या शरीरास न घेणे अश्या कारणामुळे बऱ्याच व्यक्तींना मुतखडा पाहायला मिळतो.

मुतखडा हा लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पाहायला मिळतो. जेव्हा याचा त्रास व्हायला लागतो तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. जर आपल्याला ऑपरेशन न करता किडनी स्टोन जर बाहेर काढायचा असेल तर सर्वप्रथम काही आयुर्वेदिक उपाय तुम्ही करा. नंतर जर या आयुर्वेदिक उपायांचा फरक नाही पडला तुम्ही दवाखान्यात जा.

असंख्य व्यक्तींचा आयुर्वेदिक उपायाने मुतखडा पडलेला आहे. आजचा असाच आयुर्वेदिक उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या उपायने मुतखडा पडतोच, परंतु मुतखडा आयुष्यभर न होण्यासाठी तुम्ही हा उपाय वर्ष्यातून एकदा एक वेळेस करायचा आहे. या उपायासाठी कोणते फळ लागणार आहेत? ते घ्यायचं कसे? या साठी ही माहिती संपूर्ण पहा…

अश्या या उपायला सुरवात करण्यापूर्वी सर्वाना एक गोष्ट माहीत असली पाहिजे की मुतखडा झालेल्या व्यक्तीला त्रास खूप भयंकर असतो. हा त्रास कमी करण्यासाठी सर्वप्रथम हा उपाय तुम्ही घरी करू शकता. अर्धा कप कोमट पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा तूप टाका. त्या व्यक्तीस प्यायला द्या. 10 मिनिटांमध्ये कसलाही सुळ थांबतो. सोबतच ज्या व्यक्तीस मूळव्याध आहे आणि मुतखडा ही आहे.

अश्या वेळेस त्या व्यक्तीने मुतखड्याचा उपाय ना करता सुरवातीला मुळव्याधचा उपाय करा. मूळव्याध ठीक झाल्याच्या नंतर मुतखड्याचा उपाय करा. अस केल्याने त्रास आपल्याला जास्त होत नाही. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला गळलिंबू हे फळ घ्यायचे आहे.

महाराष्ट्रामध्ये याला अनेक नावाने संभोधले जाते गळलिंबू, नळलिंबू, शिवलिंबू असे अनेक नावे आहे. तुमच्या कडे जर याचे नाव वेगळे असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. या उपायासाठी मित्रांनो हेच फळ का वापरायचं तर हे फळ जे आहे त्याची चव जी आहे आंबट, गोड, तुरट आणि कडवट असते. या फळाची जी साल आहे ती भूक वाढवणारी असते.

या फळाचा रस पित्तनाशक, संधिवात, कॅप या रोगांवर अत्यंत फायदेशीर ठरतो. या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C, सायट्रिक आम्ल, असते. म्हणून आजच्या उपायासाठी हे फळ वापरायचे आहे. हे फळ स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर या फळाचा पुढचा भाग आणि मागचा भाग कापून घ्यायचा आहे. मित्रांनो आत हे फळ तीन भागात कापायचे आहे कारण तीन दिवस हे एक फळ आपल्याला वापरायचे आहे.

असे हे कापे कापल्यानंतर या मधील ज्या बिया आहेत तुम्ही काढून तश्याच ठेऊ शकता. या बिया वाळवून जर त्याची पावडर बनवली आणि सकाळी उठल्यानंतर 5 ग्राम गरम पाण्याबरोबर जर घेतली तर लघवी संबंधी जळजळ होणे, लघवीच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या कमी होण्यास मदत होते. अश्या या बिया काढल्याच्या नंतर त्यातील जो गर आहे तो फक्त आपल्याला घ्यायचा आहे.

वरची साल आपल्याला काढून टाकायची आहे. या गराचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये टाकायचे आहेत. मिक्सरमध्ये याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे. बारीक करून घेतल्यानंतर त्याची पेस्ट तयात होईल. ही पेस्ट सकाळी उठल्याबरोबर तुम्ही डायरेक्ट ही खाऊ शकता. तसेच हा बारीक केलेला जो गर आहे त्याचा कापडाच्या साहाय्याने रस काढून घ्यायचा आहे आणि हा रस सकाळी अनुशापोटी प्यायचा आहे.

हे पिल्यास साधारण अर्धा तास काहीही खायचं नाही. हा उपाय केल्यानंतर कसलाही मुतखडा पडेल. मोठ्या मुतखड्याला थोडा वेळ लागू शकतो. असा हा उपाय केल्याच्या नंतर लक्षात ठेवा पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. याने किडनी पूर्ण स्वच्छ होईल आणि किडनी मध्ये असणारी जो घाण आहे ती पूर्ण बाहेर पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *