घराशेजारी आढळणारी आयुर्वेदातील चमत्कारी वनस्पती, शरीरातील 11 आजार पूर्णपणे गायब, कसलीही डोकेदुखी 1 मिनिटात गायब…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. असा एकही व्यक्ती नसेल ज्याने ही वनस्पती पाहिलेली नाही. अगदी सर्वांच्या घराशेजारी असणारी ही वनस्पती आहे. परंतु इतकी कमालीची आयुर्वेदिक वनस्पती आहे की या वनस्पतीने सततची होणारी सर्दी, शिंका येणाची समस्या आहे किंवा ऍलर्जी येण्याची समस्या आहे, तसेच कसल्याही प्रकारची डोकेदुखी असेल तर ती एक मिनिटांमध्ये थांबवणारी ही वनस्पती आहे. त्याचबरोबर सांधेदुखी, खोकला अशा अनेक आजारांवर ही उपयुक्त वनस्पती आहे.

परंतु इतकी चमत्कारिक वनस्पतीचे फायदे माहीत नसल्यामुळे वापरले जात नाहीत. म्हणून प्रत्येक आजारासाठी ही वनस्पतीचा कसा वापर करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. या वनस्पतीच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट आणि जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे ही कमालीची आयुर्वेदिक वनस्पती आहे. ही वनस्पती आहे घाणेरी वनस्पती. याला विविध भागामध्ये विविध नावे आहेत. काही भागामध्ये गंतुर, काही भागामध्ये बुगडी, टनटनी अशी अनेक प्रकारची नावं आहेत.

बऱ्याच लोकांना सतत डोकेदुखी, अर्धशिशी किंवा मायग्रेन्सची समस्या असते आणि गोळ्या घेऊन देखील ती बरी होत नाही. तेव्हा घाणेरी या वनस्पतीचा वापर करणे खुप फायदेशीर ठरते. डोके दुखू लागताच दोन तीन पाने घ्यायची आहेत. ती हातावर चुरघळायची आहेत आणि त्याचा वास पाच सहा वेळेस घ्यायचा आहे. कसल्याही प्रकारची डोकेदुखी तात्काळ लगेच बंद होऊन जाते. या वासाने मनावरचा ताण सुद्धा कमी होतो. करून पाहा, अगदी घराशेजारी आणि फुकट ही वनस्पती आहे.

पण आपण उपाय करत नाही आणि डोकेदुखीसाठी बाम लावणे, पेनकिलर खाणे अशा प्रकारचे महागडे आणि शरीराला घातक असलेले उपाय करत असतो. तेव्हा हा अगदी घराशेजारचा उपाय डोकं दुखू लागताच तुम्ही या वनस्पतीच्या पानाचा वास घ्या आणि डोकेदुखीची सतत होणारी समस्या आहे ती कायमस्वरूपी निघून जाईल. आता बऱ्याच लोकांना ऍलर्जीची समस्या असते. सतत सर्दी होणे, शिंका येणे, खोकला येणे अशा वेळेस ही वनस्पती यावर रामबाण ठरते.

घाणेरीची तीन चार मध्यम पाने घ्यायची. फार जुनी आणि फार कवळी पण घ्यायची नाही. ही पाने धुवून दोन कप पाण्यामध्ये टाकायची आहेत. त्या पाण्याला उकळू द्यायचे आहे. ही पाने तसही आपण खाऊ शकत नाही. कारण ही खरबरीत असतात आणि त्यामुळे जिभेला जखमा होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला काढा बनवायचा आहे. आपण जे पाणी उकळायला ठेवले आहे ते त्याचा रंग लाल होईपर्यंत ते उकळायचे आहे. त्यामध्ये चवीसाठी थोडंस मीठ टाकू शकता.

त्यानंतर हे गाळून घ्यायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपण चहा पितो किंवा कोमट झाल्यानंतर घेऊ शकता. हे एक कप औषध कुठल्याही वेळेला सलग पाच दिवस घ्यायचे आहे. सर्दी, शिंका येण्याची समस्या कमी होईल जाईल. याप्रमाणे काढा घेतला तर रक्तीमुळव्याध असेल, मुळव्याधीतुन रक्त पडत असेल तर अशा वेळेस रक्त पडणं बंद करण्यासाठी तात्काळ या वनस्पतीचा काढा खुप गुणकारी ठरतो.

या वनस्पतीच्या पानाचा वरील प्रमाणे काढा बनवायचा आहे आणि सकाळी उपाशीपोटी असं तीन दिवस घ्यायचे आहे. रक्त पडणं तुमचं पूर्णपणे बंद होऊन जाईल. सांधेदुखीसाठी याची पाने फार उपयुक्त आहेत. या पानाचा कुटून पेस्ट तयार करायचा आहे. हा पेस्ट हलका गरम करून घ्यायचा आणि हा पेस्ट गुढघेदुखीवर किंवा जो सांधा दुखतो त्यावर कपड्याच्या साहाय्याने बांधायचा आहे. सांधेदुखी पूर्णपणे निघून जाते. चार पाच दिवस हा उपाय करावा लागतो.

ही जी घाणेरीची पाने आहेत या पानांचा रस जुन्या जुन्या आणि बऱ्या न होणाऱ्या जखमेसाठी खुप उपयुक्त असतो. याने जुनी जुनी जखम बरी होते. याची पाने सुखवुन धान्यांमध्ये ठेवली तर धान्याला कीड लागत नाही. इतकी ही जबरदस्त वनस्पती आहे.

डोकेदुखीसाठी तर या वनस्पतीचा अवश्य वापर करा. कधीही डोकेदुखी साठी पेनकिलर खाऊ नका. तुम्ही या वनस्पतीचा वापर करून पाहा. तुमची ही समस्या निघून जाईल. तर ही सहजरित्या अगदी घराच्या कडेला उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे. याचा वापर करा. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *