
नमस्कार मित्रांनो. परत एकदा तुमचे स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही नवीन शिकायचे असेल, तर आमच्या पेजला जरूर लाईक करा. आपल्या हिंदूधर्मामध्ये नेहमी असे बघितले गेले आहे, की मूल जन्माला आले, की घरातील वडीलधारी माणसे त्याला काळी तिट, काळा धागा किंवा त्याची नजर काढणे अशी कामे अवश्य करतात. पण तुम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का, हयामागचे रहस्य काय आहे?
आपण काळाबरोबर पुढे जात आहोत. जुने रीतिरिवाज, धर्मकार्य आणि मान्यता हे विसरत चाललो आहोत, ज्याचा प्रभाव आपल्या संस्कृतीवर बघावयास मिळतो. आज आपण ज्या समाजाकडे चाललो आहोत, त्यात कपट, लालची वृती, क्रोध, ईर्षा, यासारख्या भावना लोकांमध्ये जास्त प्रचलित आहेत. अशावेळी, आपल्या पूर्वजांनी सुचवलेले काही अचूक उपाय आपल्या उपयोगी पडतात.
याच गोष्टी लक्षात ठेवून, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, काळ्या धाग्याच्या संबंधित असे काही उपाय ज्यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल. जर तुम्हाला पण हे जाणवत असेल, की वाईट नजर तुमच्या मार्गात अडथळा बनत आहे किंवा तुमच्या परिवारात सुख शांतिला कोणाची नजर लागत आहे., तर हे उपाय जरूर करून बघा. चला तर मग तुम्हाला काळ्या धाग्यासंबंधी काही उपाय सांगत आहोत. त्यापूर्वी लाइक आणि शेअर करायला विसरू नका.
सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, काळा रंग हा नकारात्मक उर्जेला संपवून टाकतो. म्हणून वाईट नजरेपासुन वाचण्यासाठी काळी तिट, काळा कपडा आणि काळ्या रंगाच्या वस्तूंचा उपयोग केला जातो. काळा धागा त्या सगळ्यात खूपच परिणामकारक व लाभदायी असतो. जर तुमच्या घरात क्लेश वाढत आहे, उगाच भांडणे वाढत आहेत, तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी शनिमहाराजांच्या मंदिरात जाऊन १ मिटर काळा धागा घेऊन त्याला १०८ गाठी मारा.
प्रत्येक गाठ मारताना “ओम शनिश्चराय नम:” हा जप करा. जवळ मंदिर नसेल, तर घरात हा उपाय करू शकता. हा धागा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ बांधून ठेवा. त्यामुळे घरात वाईट नजर व नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. दूसरा उपाय- तुमच्या घरातील सदस्यांची तब्येत वारंवार खराब होत असेल, त्यांना त्रास भोगावा लागत असेल, तर काळा धागा एक दिवस मंदिरात घेऊन जा. त्याला थोडासा शेंदूर लावा व दुसर्या दिवशी सकाळी स्वछ होऊन त्या धाग्याला त्या सदस्याच्या पायाला बांधा, त्यामुळे वाईट नजर पडणार नाही व नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
तिसरा उपाय म्हणजे गर्भवती महिलेला नेहमी लवकर नजर लागते. काही वेळेस तिच्या येणार्या बाळावर त्याचा वाईट प्रभाव पडतो. काळा धागा गर्भवती महिलेच्या इतका मोजून घ्या व तिच्यावरून तो ३ वेळा ओवाळून पिंपळाच्या झाडाखाली किंवा नदीत प्रवाही करून टाका. हा उपाय मूल होईपर्यंत करा. त्यामुळे वाईट नजरेपासुन तिची मुक्तता होईल. काळ्या धाग्यात रुद्राक्ष बांधून ते बाजूबंद म्हणून बांधू शकता. काळा धागा नंतर पाण्यात सोडून द्या नाहीतर काही लोक त्याचा काळी जादू करण्यासाठी उपयोग करू शकतात.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…