कोणत्या पायात काळा दोरा बांधल्यास होतात धनवान आणि भाग्यवान…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहिलं असेल की अनेक जण त्यांच्या पायांमध्ये काळा धागा बांधतात. या पाठीमागे कोणतं कारण असावं? अनेक जण फॅशन म्हणून काळा धागा आपल्या पायांमध्ये बांधतात, गळ्यामध्ये बांधतात, तर काही जण धार्मिक प्रवृत्तीने हा धागा बांधत असतात. मित्रांनो अश्या प्रकारे काळा धागा बांधण्याचे कोणकोणते फायदे असतात? तर आपण आज जाऊन घेणार आहोत.

आपण हा धागा कोणत्या पायात बांधवा? स्त्रियांनी तो कोणत्या पायात बांधवा आणि पुरुषांसाठी कोणत्या पायात बांधणे योग्य आहे. या पाठीमागे काही वैज्ञानिक कारण आहे का? या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर आपलं शरीर हे पंचभुतांनी बनलेलं आहे. ज्याला आपण पंचतत्व असेही म्हणतो. अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वापासून आपलं शरीर निर्माण झालेल आहे. आपल्या शरीराला संचलित करण्याचं काम, आपल्या शरीराला ऊर्जा पुरवण्याच काम ही पंचमहाभूते करत असतात.

मात्र एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला नजर लावते त्यावेळी मात्र या पंचमहाभूतापासून मिळणाऱ्या उर्जेमध्ये अडथळे येतात. आणि मग आपलं शरीर व्यवस्थित कार्य करत नाही. आपण आजारी पडतो, आपलं होणार काम अडवलं जात. कामामध्ये अडथळे येऊ लागतात. आपण खूप मेहनत करतो मात्र त्या मध्ये यश मिळत नाही. घरामध्ये पैसे कमी पडू लागतात. आणि म्हणून यासाठीच हा काळा धागा आपल्याला अत्यंत महत्वाची मदत करतो.

मित्रांनो तुम्ही जर गळ्यामध्ये काळा धागा बांधला तर तुमची नजर लागण्यापासून संरक्षण होऊ शकत. या गळ्यातील धाग्यामध्ये तुम्ही एखाद लॉकेट सुद्धा लावू शकता. अगदी प्राचीन काळापासून काळ्या रंगाचा उपयोग हा नजरेपासून वाचवण्यासाठी करण्यात आलेला आहे. म्हणूनच आपण पाहिलं असेल की छोट्या मुलांना कपाळावर असेल, गालावरती असेल यावरती काळा टिका लावला जातो. आणि हाच टिका लहान मुलांचे नजरेपासून संवरक्षण करतो.

मित्रांनो जर तुम्हाला वारंवार पोट दुखीचा त्रास असेल तर लक्षात घ्या नाभी ज्या वेळी सरकते त्या वेळी अश्या प्रकारची पोट दुःखी निर्माण होते. जर तुम्ही दोन्ही पायांच्या अंगठ्याना काळा धागा बांधला तर लक्षात घ्या तुमचा पोट दुखीचा त्रास हा बंद होतो. मित्रांनो हा धागा कोणी बांधावा व कसा बांधवा? स्त्रियांनी किंव्हा मुलींनी त्यांच्या डाव्या पायामध्ये हा काळा धागा नक्की बांधावा. अस केल्याने त्यांची नजर लागण्यापासून संवरक्षण तर होतच, मात्र त्याच बरोबरीने अनेक फायदे सुद्धा होतात.

जर तुम्ही दिवसभर उभे राहून काम करत असाल तर तुमचे पाय नक्कीच दुखत असतील. तर या पाय दुःखी पासून सुटका हवी असेल तर महिलांनी किंव्हा मुलींनी डाव्या पायामध्ये हा काळा धागा बांधवा. पुरुषांसाठी उजव्या पायात काळा धागा बांधणे हे अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो वास्तुशास्त्र, जोतिषशास्त्र अस मानत मंगळवारचा दिवस हा आपल्या पायामध्ये काळा धागा बांधण्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानला जातो. याच कारण अस आहे की मंगळवार हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो.

धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपल्या जीवनामध्ये धनाची, पैश्याची कमतरता कधीच राहत नाही. आणि म्हणून आपण मंगळावार च्या दिवशी पुरुषांनी उजव्या पायामध्ये काळा धागा धारण करावा. आणि महिलांनी डाव्या पायामध्ये काळा धागा धारण करावा. यांमुळे आपल्या धन संपतीमध्ये वाढ होते. पैसे येण्याचे नवनवीन मार्ग निर्माण होतात.

अजूनएक फायदा असा की ज्यांना शनी ची साडीसाती आहे किंव्हा ज्यांना वारंवार शनिदोष निर्माण होतो अश्या लोकांना हा धागा अत्यंत महत्वाच काम करतो. प्रत्येक शनिदोषापासून वाचवण्याच काम हा काळा धागा करत असतो. तर मित्रांनो आपल्या शरीराचे संचलन चांगले होण्यासाठी नक्की काळा धागा नक्की धारण करावा…

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *