
तुम्ही जर दुसऱ्यांकडून ह्या पाच गोष्टी घेऊन येत असाल तर त्याबरोबरच तुम्ही घरात बर्बादीही आणत आहात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि आनंदासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो. आपण केलेल्या छोट्या-छोट्या चुका आपल्या जीवनात दुःख आणि वास्तुशात्रानुसार केलेली कामे आयुष्यात चांगली परिस्थिती आणतात. आज आपण अशा लोकांबद्दल बोलणार आहोत जे नेहमी दुसऱ्यांकडून वस्तू मागून वापरतात किंवा दुसर्यांना आपल्या वस्तू वापरण्यास देतात.
पहिली वस्तू आहे पेन. शक्यतो दुसऱ्याचे पेन वापरायला घेऊ नका. जर तुमच्याकडे पेन नसेल आणि तुम्ही कोणाकडून लिहिण्यासाठी घेतलेत तर ते लगेच परत करा. पेन घेणे किंवा देणे चुकीचे नाहीये पण ते परत न देणे वास्तूशात्रानुसार चुकीचे आहे. दुसऱ्या व्यक्तीने वापरलेले पेन स्वतःजवळ ठेवल्याने पैशाची कमतरता येऊ शकते. जर चुकून दुसऱ्याचे पेन तुमच्याकडे राहिले असेल तर ते पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन द्या. किंवा गरीब विद्यार्थ्याला वापरण्यास द्या.
दुसरी वस्तू आहे रुमाल. दुसऱ्या व्यक्तीच्या रुमालाच्या वापरामुळे तुमच्या दोघात भांडण होईल असे म्हणतात. दुसर्यांचा रुमाल किंवा टिश्यू चा वापर केल्याने त्यांच्यातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडेल. वास्तूशात्रानुसार अनेक वेळा हि चूक केल्याने तुम्हाला तब्येतीच्या तक्रारी उदभवू शकतात.
तिसरी गोष्ट, असे म्हणतात कि कधीही दुसऱ्याच्या अंथरुणाचा वापर करू नये. असे केल्याने तुमच्या आयुष्यावर वाईट प्रभाव, पैशांची कमतरता तसेच घरात वास्तुदोष उत्पन्न होऊ शकतात. जर कधीही कोणी तुमच्याकडे अंथरुण मागायला आले तर त्यांना तुमचे वापरलेले अंथरूण अजिबात देऊ नका. आणि तुम्हीही कोणाचे वापरलेले अंथरूण वापरू नका. दुसऱ्याच्या अंथरुणावर झोपल्याने त्याच्या नकारात्मक शक्तींचा तुमच्यावर प्रभाव पडू शकतो.
घड्याळाची देवाणघेवाण. मनगटावर बांधायचे घड्याळ तुमच्या चांगल्यावाईट गोष्टींगोष्टींसाठी जबाबदार असते. तुम्ही दुसऱ्याचे घड्याळ मागून घालत असाल तर असे होऊ शकते कि त्या माणसाचा वाईट काळ सुरु असेल आणि त्याचा तुमच्यावरही प्रभाव पडेल. तुमचे घड्याळ कोणाला देत असाल आणि तुमचा चांगला काळ सुरु असेल तर तो त्या माणसाकडे जाईल. त्यामुळे कधीही कोणाचे घड्याळ घालू नये आणि आपलेही कोणाला देऊ नये.
आपल्या शक्तीनुसारच खर्च करावा. त्यामुळे तुम्हाला कधीही कोणाकडे पैसे मागावे लागणार नाहीत. जर कधी पैसे उसने घ्यावे लागले तर ते लवकरात लवकर परत करा. असे न केल्यास तुम्ही जीवनात कधीही पुढे जाऊ शकणार नाही. वास्तूशात्रानुसार दुसऱ्यांचे कपडे वापरल्यामुळे त्यांची नकारात्मक शक्ती तुमच्यात प्रवेश करेल. कोणी तुम्हाला आनंदाने नवीन कपडे देत असेल तर त्यामुळे तुमचे भाग्य उजळेल. वास्तूशात्रानुसार मागून घेतलेलया वापरलेल्या कपड्यांमुळे तुम्हाला अशुभ बातमी मिळू शकते. या सगळ्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांकडून घेऊ नका व दुसर्यांना देऊही नका.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…