चाणक्यनिती- अशा ३ माणसांची मदत कधीही करू नका

चाणक्यनिती हा चाणक्यद्वारा रचित एक नितीग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवन सुखमय आणि सफल बनवण्यासाठी काही उपयोगी सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय हा मानवी समाजाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहारी शिक्षण घेणे आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते.आचार्य चाणक्यनी आपल्या नितीमूल्यांद्वारे चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या गादीवर बसवले. जाणून घेऊया चाण्यक्यांची काही महत्वपूर्ण नितीमूल्ये जी तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही टप्यावर उपयोगी पडतील.

आचार्य चाणक्य म्हणतात, की या ३ लोकांची मदत कधीही करू नका. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल ती कोण ३ लोक आहेत, ज्याची आपण कधीही मदत करायची नाही, तर त्यामुळे आपले नुकसानच होईल, तर विडियोला लाइक करायला विसरू नका. चाणक्याचे अनमोल वचन आम्ही तुम्हाला या विडियोद्वारे सांगणार आहोत. आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते, की आपण गरजू लोकांची मदत करावी. मग ती मदत धनाच्या रूपात असुदे किंवा आपल्या उपस्थितीची असुदे.

दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. आपल्या समाजात कोणाची मदत करणे हे चांगल्या संस्काराचे लक्षण आहे. हे खरे आहे, की आपण मदत करायच्या आधी जास्त विचार करत नाही. जर आपल्याला वाटले, की कोणाला मदत हवी आहे, तर आपण लगेच तयार असतो. मदत करण्याआधी त्या व्यक्तीच्या व्यक्तीत्वाबद्दल आपण जास्त जाणून घ्यायला उत्सुक नसतो. आचार्य चाणक्यांची या बाबतीत वेगळीच मते आहेत.

चंद्रगुप्ताला महाराज चंद्रगुप्त मौर्य तसेच प्राचीन भारताचे महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्यनि जीवनाच्या कितीतरी नियमांवऱ विचार मांडले आहेत. त्यांनी आपल्या जीवनात विविध अध्यनाने व्यक्तीच्या चारित्र्याविषयी विचार प्रस्तुत केले आहेत. व्यक्तीचे विचार आणि कल्पना व्यवस्थित समजून घेऊन आचार्य चाणक्यनि आपल्या श्लोकाद्वारे लोकांना हे समजावले, की केव्हा, कुठे व कसा आपल्याला लोकांकडून धोका होऊ शकतो. कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, ह्या श्लोकांद्वारे कळू शकते.

चाणक्यची ही नितीमूल्ये जगभरात प्रसिद्ध आहेत. ह्या नितींमधील एक निती लोकांची मदत करण्याविषयी आहे. आचार्य चाणक्यानुसार आपण लोकांची मदत जरूर केली पाहिजे. पण असे ३ लोक आहेत, ज्यांची मदत कधीही करू नये. हे लोक कितीही अडचणीत असुदेत, परंतु, यांची मदत कधीही करू नका. चला तुम्हाला त्या ३ लोकांबद्दल सांगतो, ज्यांची मदत करणे नुकसानकारक आहे.

१. आचार्य चाणक्य म्हणतात, कोणत्याही स्त्रीला संकटात बघणे व तिच्या मदतीला जाणे हे स्वाभाविक आहे. पण चाणक्यच्या मते, प्रत्येक स्त्री मदतीच्या लायकीची नसते. ज्या स्त्रिया आपल्या चुकीमुळे संकटात सापडतात, ज्यांचे काम वाईट कामे करणे आहे, अशा स्त्रीची मदत करणे व्यर्थ आहे. अशा स्त्रीची मदत करताना तुम्ही संकटात सापडू शकता.

२. उदास होणे हा स्वभावाचा एक भाग आहे, जो परिस्थितिनुरूप उत्पन्न होतो. परंतु, ते लोक जे कायम उदास राहातात, त्यांच्याबद्दल काय बोलणार. चाणक्याच्या मते उदास राहाणार्या लोकांपासून जेवढे जमेल तेवढे दूर राहा. तुम्ही त्यांची मदत केलीत तरी ते खुश होणार नाहीत. त्यांचे कामच आहे कायम उदास राहाणे. हे नकारात्मक प्रवृतीचे लोक असतात.

३. मूर्ख व्यक्तीची मदत कधीही करू नका. चाणक्यांच्या मते, मूर्ख व्यक्तीची मदत करणारा स्वत: मूर्ख असतो. शेवटी त्याचा मूर्खपणा त्याला परत त्याच जागी घेऊन येतो. त्यांना सल्ला देणे मूर्खपणा आहे.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *