
नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. छान चवीचे पदार्थ खायला सर्वानाच खूप आवडतात. पण खाऊन झाल्यावर खळखळून चूळ भरणे, गुळण्या करणे, सकाळप्रमाणेच रात्री झोपतानाही ब्रशने दात घासणे या साध्या गोष्टींचा मात्र अनेकांना आळस असतो. रोज अशा लहान लहान बाबींची काळजी घेतली तर दाताच्या समस्या उद्भवणारच नाहीत. मित्रांनो दातांना कीड लागणे ही एक अशी समस्या आहे जी वेळेनुसार वाढत जाते आणि पुढे जाऊन दात दुःखी व दात काढण्यापर्यंत ही वाढतच राहते.
जेव्हा सुरुवातीला कीड लागते तेव्हा केवळ एक काळा डाग असतो.जर याकडे योग्य वेळी लक्ष नाही दिले तर ती कीड वाढत जाऊन शेवटी दातावरच जो इण्यामल जो थर आहे तो पातळ होतो आणि मधील भागाला कीड लागते. दातां मधील भागाला जेव्हा कीड लागते तेव्हा इन्फेकॅशन ज्यास्त वाढते आणि इन्फेकॅशन जास्त वाढले तर दात काढणे हा एकच पर्याय राहतो. आपल्यावर ही वेळ येऊ नये म्हणून आपण लक्ष देणे गरजेचे आहे.
तरीही काही घरगुती उपाय करून आपण दाताला लागणारी कीड हळूहळू कमी करू शकतो आणि पूर्ण पणे मुळापासून कमी करू शकतो. आपण जे घरगुती उपाय पाहणार आहोत हे उपाय तेव्हाचे आहेत जेव्हा डॉक्टर या पृथ्वीतलावर नव्हते. पूर्वीच्या काळी डॉक्टर नव्हते तेव्हा ही लोक छोटे छोटे आयुर्वेदिक उपाय करून लोक कीड काढत होते.
मित्रांनो दाताला कीड लागणे याचे मुख्य कारण आहे दातांवरील बॅक्टरीया, किटाणू किंव्हा छोटे जिवाणू. ते इतके लहान असतात की ते आपण आपल्या डोळ्यांनी सहज पाहू शकत नाही. जेव्हा आपण दातांची काळजी घेत नाही तोंडाची काळजी घेत नाही तेव्हा हे किटाणू तयार होतात. आणि आपल्या दातांना कीड लागते. मित्रांनो आपल्या दातांवरील किटाणूणा दोन गोष्टी आवडतात एक म्हणजे साखर आणि कार्बोहायड्रेट जसे मैदा चे पदार्थ असतात.
जेव्हा आपण या वस्तू पासून बनलेल्या वस्तूंचे सेवन करतो तेव्हा थोडतील किटाणूणा अन्न चांगले मिळते. आणि हे पदार्थ खाऊन ते एक रसायन सोडतात. तर रसायन कोणतं तर “लॅक्टिक ऍसिड”. आणि हेच ऍसिड आपल्या दातांवरील जो थर आहे जी सुरक्षा परक आहे ते कमी करण्यासाठी मदत करत.
हे सुरक्षा परक वितळत आणि किड निर्माण होऊ लागते. म्हणून म्हणतात ज्यास्त गोड खाल्ले तर दात किडतात. म्हणून ज्यास्त गोड खाऊ नये. जसे साखरे मुळे दातांवरील कीड वाढते तसेच असे काही पदार्थ आहेत ज्या मुळे आपली कीड पूर्ण पणे बरी होऊ शकते. चला तर पाहू अश्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा उपयोग करून आपण दातांवरील कीड कमी करू शकतो.
पहिला पदार्थ आपण वापरणार आहे तो म्हणजे लवंग. आणि दुसरा जो घटक त्यामध्ये लागणार आहे तीळ. दातातील कीड काढणे लवंग अत्यंत महत्वाची आहे. लवंग मध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटीसेफ्टीक, तसेच अँटीफंगल गुण असतात. याने जे जिवाणू आहेत ते कमी होतात. आपण 4 ते 5 लवंग घेऊन त्या वाटायच्या आहेत. व त्यात अर्धा चमचा तीळ वाटून त्यात मिक्स करून याची गोळी बनवून दातांवर धरायची आहे. ही गोळी दिवसभरात दोन ते तीन वेळा धरायची आहे. तुम्हाला पाचव्या दिवशी याचा चांगला परिणाम दिसून येईल. साधारणपणे ही गोळी 15 ते 20 मिनिटे धरून नंतर थुंकून द्यायची आहे.
यापेक्षा सोपा उपाय म्हणजे तीळ तेल आणि लवंग तेल समप्रमाणात घ्यायचे आहे. ते चांगले मिक्स करायचे आहे आणि त्यामध्ये कापसाचा एक गोळा करून त्या मिश्रणात बुडवून तो गोळा दातांवर धरायचा आहे. याने दातांवरील कीड मरते दात सुद्धा आतून स्वच्छ होतात. हा झाला साधा उपाय हा उपाय तुम्हाला पाच ते सात दिवस करायचा आहे. हा उपाय आपल्याला जेवणानंतर चांगल्या प्रकारे चूळ भरून नंतर हा उपाय करायचा आहे.तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या दातांची कीड नक्की निघून जाईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.