
जर तुमची हाडे दुखत असतील, सांधे, कंबर किंवा टाचा दुखत असतील तर काळजी करू नका, आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय सांगणार आहोत ज्याच्यासाठी तुम्हाला फक्त ३ रुपये खर्च करायचे आहेत. कितीही जुने दुखणे या सोप्या उपायाने तुम्ही घालवू शकता. इतकेच नाही तर चेहऱ्यावरील काळे डाग सोप्या पद्धतीने तुम्ही या उपायाने घालवू शकता. तर चला मग पाहूया हा कोणता सोपा उपाय आहे जो अत्यंत गुणकारी आहे आणि जो फक्त तीन रुपयात तुम्ही करू शकता.
यासाठी तुम्हाला जायफळ घ्यायचे आहे. जायफळाचे आयुर्वेदात खूप महत्व सांगितले आहे. वात, पित्त आणि कफ तिन्हीमध्ये याचा उपयोग होतो. अनेक आयुर्वेदिक औषधात याचा वापर केलेला दिसतो. याची पावडर सुधा मिळते पण तुम्ही ही पावडर घरात सुद्धा बनवू शकता. याचा उपयोग सर्दी खोकल्यासाठी सुद्धा केला जातो. थंडीत तर याचा वापर आपण जरूर केला पाहिजे. याने तूमची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढीला लागते.
जायफळ पावडर घेऊन थोडे अक्खे जायफळ उगाळून घ्या. उगाळून घेताना त्यात थोडे पाणी तसेच थोडे दुध त्यात घाला. ह्याचा लेपही तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता जेणेकरून तुमची त्वचा उजळून निघेल. तुम्हाला जिथे दुखत असेल त्या भागावर हे लेप नियमितपणे लावल्याने तुमचे दुखणे मुळापासून बंद होईल. हा उपाय नक्की करून पहा.
आता तुम्हाला एक मोठा चमचा राई तेल घेऊन त्यात एक लहान चमचा जायफळ पावडर घ्या. एका कढल्यात हे मिश्रण घेऊन ते तापवा. मंद आचेवर शिजवल्याने जायफळाचे सगळे सार या तेलात उतरेल. याने तुमच्या दुखर्या भागाचा मसाज तुम्हाला करायचा आहे. हा मसाज हळू हळू करायचा आहे. नियमित हा उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.
हे तेल तयार करून तुम्ही बाटलीत भरून ठेव शकता म्हणजे तुम्हाला नियमित मसाज करता येईल. थंडीत जर तुमच्या पायांना भेगा पडत असतील तर टाचांवर हा लेप लावल्याने खूप आराम पडेल. जर तुम्हाला खूप सर्दी होत असेल तर दुधाबरोबर जायफळ सेवन करा.
जर तुम्हाला दुध चालत नसेल तर याचे सेवन तुम्ही कोमट पाण्याबरोबर करू शकता. दुधाबरोबर सेवन करताना त्या दुधाची चव चांगली होण्यासाठी तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता. साखर घातली नाही तरी चालेल. यात तुम्ही गुळसुद्धा घालू शकता. जर साखर किंवा गुळ घातले नाही तरी या मिश्रणाला चव चांगली असते.
आम्ही सांगितलेला हा घरगुती उपाय तुम्हाला आवडला असल्यास आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.