घड्याळ आणि कॅलेंडर ‘असे’ लावा – पैसा येऊ लागेल… घड्याळ कोणत्या दिशेला असावे…

आपल्या घरातील सगळ्याच वस्तू या एक प्रकारची उर्जा निर्माण करत असतात, सकारात्मक किंवा नकारात्मक. वस्तू जर योग्य दिशेला लावल्या गेल्या नाहीत तर त्याचा परीणाम थेट तुमच्या जीवनावर होतो.वास्तुशास्त्राप्रमाणे जर तुम्ही योग्य दिशेला योग्य वस्तू ठेवल्यात तर त्याचा परिणाम नक्कीच सकारात्मक होतो. आणि ज्याने तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे मानसिक आरोग्य उत्तम राहाते.

घड्याळ आपल्या सगळ्यांच्या घरात असतेच. गेलेल्या आणि येणाऱ्या काळाची सूचना हे घड्याळ आपल्याला करत असते. सगळ्यांचाच काळ सारखा नसतो. काळाचे चक्र हे अव्याहत चालू असते आणि जे कोणासाठी थांबत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी अशा असतात ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो पण त्या खरंच खूप महत्वाच्या असतात.

आज आपण घड्याळाच्या दिशेबाबत बोलणार आहोत. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत कि कशा प्रकारे योग्य दिशेला लावलेले घड्याळ तुम्हाला आयुष्याचा योग्य मार्ग दाखवू शकते. त्याशिवाय आज आम्ही तुम्हाला कलेंडरच्या योग्य दिशेबाबत सांगणार आहोत. घड्याळाचे अनेक आकार असतात. काही गोल, अंडाकृती, चौकोनी तर काही विविध आकाराची घड्याळेसुद्धा पाहायला मिळतात. पण वास्तुशास्त्राप्रमाणे घड्याळ हे गोल किंवा अंडाकृती आकाराचे असणे कधीही चांगले असते.

हल्ली वेगवेगळ्या डिझाईन किंवा प्रकारची घड्याळे पाहायला मिळतात. बरेचदा त्यात एखादा व्यक्तीचा किंवा देवाचा फोटो असतो. पण असे घड्याळ वापरणे टाळले पाहिजे. याने तुमच्या घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. घड्याळावर देवाचा फोटो असणे अशुभ मानले जाते म्हणून देवाचे फोटो असलेले घड्याळ वापरणे टाळा. गोल किंवा अंडाकृती घड्याळ हे चांगले असते कारण गोल आकार पृथ्वीच्या आकाराला प्रतिबिंबित करतो.

घड्याळ नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. जसे आपण स्वतःला स्वच्छ ठेवतो तसेच घड्याळ स्वच्छ ठेवा, त्यावरची धूळ झटकत राहा म्हणजे तुमचे नशीब उजळून निघेल. घरात तुटलेले किंवा बंद घड्याळ कधीही ठेवू नये असे करणे हे अशुभ मानले गेले आहे. घड्याळ बिघडले असेल तर ते लगेच दुरुस्त करा किंवा बदलून टाका.

घड्याळाची दिशा खूप महत्वाची आहे. घड्याळ जर दक्षिण दिशेला लावले असेल तर त्याची जागा बदल कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे असे मानले जाते. बाकीच्या कोणत्याही दिशांना तुम्ही घड्याळ लावू शकता. तसेच घराच्या मुख्य दाराच्या वर कधीही घड्याळ लावू नये. असे करणे चांगले मानले जात नाही. याने तुमची वेळ खराब येऊ शकते. केलेंडर सुद्धा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा.

या गोष्टी ध्यानात ठेवा आणि तुम्हाला तुमच्या जीवनावरील होणारा फरक लगेच जाणवून येईल. टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *