
दातांची काळजी घेतली पाहिजे हे आपण सर्व मानतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न सुध्दा करतो. सकाळ संध्याकाळ चांगल्या टूथपेस्टने दात स्वच्छ करतो इत्यादी. पण तरीही कधी कधी एवढे करून दातांना कीड लागतेच आणि त्यानंतर जर दात दुखायला लागल्यावर ज्या वेदना होतात त्या असह्य असतात. हे तुम्ही स्वता अनुभवले असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला तरी अनुभवताना पाहिले असेल. यावर उपाय मग आपल्याकडे डेंटिस्तकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. डेंटिस्त तुम्हाला दात काढण्याचा सल्ला देतो किंवा रूटकॅनल करण्याचा महागडा सल्ला देतो.
दातांमध्ये कीड लागल्यानंतर आपला दात प्रचंड दुखायला लागतो, व ती कीड जर नसापर्यंत पोहोचली तर आपल्याला अन्न खाणे पिणे अशक्य होऊन जाते. खूप खर्च देखील करावा लागतो. म्हणून यावरती अतिशय स्वस्त आणि सोपा असा हा उपाय व दातांतील कीड पडून जाईल. असा सहज करता येणार उपाय, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हा उपाय केल्याने आपल्या दातांतील कीड निघून जाते व दात दुखणे लगेच कमी होते. अश्या आयुर्वेदिक वनस्पती बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. व त्या वनस्पती चे नाव आहे उंबराची पाने. सर्वत्र उपलब्ध होईल अशी ही वनस्पती आहे, व या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने अतिशय उपयुक्त असे हे पान आहे.
आपल्याला जर विंचू चावला असेल तर ही पाने थोडीशी चावून त्या जागेवर लावल्याने विंचूचे विष उतरते व त्याच बरोबर अन्नामधून जरी विष बाधा झाली असेल तर याची दोन ते तीन पाने चावून खाल्ली तर त्या विषेचा प्रभाव कमी होऊन जातो. इतकी ही महत्वाची आयुर्वेदिक वनस्पती आहे.
त्याच बरोबर दात दुखत असेल तर त्या पानांबरोबर थोडासा कापूर देखील घ्या, तुम्हाला माहीतच आहे की, दात दुखत असेल तर कापूर लावल्याने देखील दात दुःखी तात्काळ थांबते, परंतु काही जणांची अशी शंका असते की, जर आपण कापूर दातांमध्ये धरला तर दात फुटला जातो, तर असे काही होणार नाही कारण आपण यामध्ये उंबराची पाने मिक्स करणार आहोत. हे दोन्ही एकत्र मिक्स केल्यामुळे आपल्या दातांना कोणताही साईट इफेक्ट् होणार नाही.
दाताला काहीही होणार नाही, फक्त तुमच्या दातांमध्ये जी कीड आहे तात्काळ मरेल आणि तुमचा दात ठणकने लगेच बंद होईल. हा उपाय करण्यासाठी दोन छोटी पाने घ्या, व तू स्वच्छ पाण्याने धुवून त्या दोन पानांमध्ये एक कापूर घेऊन ते कुटून घ्या.
ते कुटून घेतलेले पान किडलेल्या व ठणकत असलेल्या दातांमध्ये दाबून धरा, असे 3 दिवस दररोज केल्याने दातांमधील कीड निघून जाईल व किडलेल्या दातामध्ये हे कुटलेले पान धरल्यानंतर तोंडामध्ये जी लाळ निर्माण होते ती लाळ बाहेर टाकून द्यावी, असे दररोज तीन ते चार दिवस केल्यास दात दुखणे पूर्णपणे बंद होऊन जाईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.