
नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. तंबाखू, दारू, गुटखा, सि गा रे ट हे सोडण्यासाठीचे उपाय आपण आज पाहणार आहोत. पहिला उपाय पाहणार आहे तो म्हणजे अदरक आणि लिंबूचा. यासाठी आपल्याला अदरकाचे छोटे छोटे तुकडे लागणार आहेत. त्यानंतर अर्धा लिंबू कापून घ्या. यानंतर या लिंबाचा रस त्या तुकड्यांवर टाकायचा आहे आणि हे तुकडे उन्हामध्ये वाळत घालायचे आहे. ते पूर्ण वाळल्यानंतर ते खिशात ठेवायचे आहेत.
जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला आठवण येईल जसे गुटखा खाण्याची, दारू पिण्याची किंवा सि गा रे ट ओढणे तेव्हा हा एक तुकडा चघळून खायचा आहे. याचा रस शोषून घ्यायचा. ज्या व्यक्तींना दारू, सि गा रे ट, गुटखा याची जी सवय असते यामध्ये सल्फर असते सल्फर आपल्याला याची जी ओढ लागलेली असते ती ओढ संपवण्याचे काम हा उपाय करतो. दारू पिणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्या शरीरात फॉस्फरस कमी होतं.
दुसरा उपाय असा आहे की ज्या व्यक्तीला दा रू, तंबाखू, सि गा रे ट सोडायची आहे त्या व्यक्तींनी एक अर्धा लिंबू घ्या. त्यामध्ये साधारणतः दहा ते बारा लवंगा रोवून ठेवा. साधारणतः अर्धा तास त्या लवंगा रोवून ठेवा. त्यानंतर त्या उन्हात वाळत घाला. जेव्हा जेव्हा दा रू पिण्याची आठवण येईल त्याचप्रमाणे तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा या वाळलेल्या लवंगा आहेत त्यातील एक लवंग खायची आहे.
दारू पिणे, तंबाखू खाणे किंवा सि गा रे ट ओढणे हे जर सोडायचं असेल तर सर्वात महत्वाचे त्या व्यक्तीची इच्छा असावी लागते. त्या व्यक्तीची खरच इच्छा असेल तर दारू, तंबाखू, सिगारेट सुटू शकेल. पण ज्या व्यक्तीची इच्छा सोडायचीच नाही किंवा त्याची मानसिकताच नाही तर त्याला सोडणं अवघड आहे. यासाठी काय करा तर कुटुंबात जास्त वेळ द्या. त्याला दा रू ची , तंबाखूची आठवण येणार नाही यासाठी त्याला कामात गुंतवून ठेवा.
तिसरा उपाय तुम्ही अदरकाचा रस बनवा. एक चमचा मध आणि एक चमचा अदरक रस. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे तीन वेळा त्या व्यक्तीला द्या. यामुळे दा रू जे पितात त्याची घृणा तयार होते. म्हणजेच त्याला दारू नकोशी वाटते. सफरचंद खायला द्यायचे. ते सफरचंद उकडायच आणि सकाळ, दुपारआणि संध्याकाळ खायला द्यायचं. यामुळे आंटी अल्कोहोलीक तत्व शरीरात तयार होतात आणि दारू सोडण्यास मदत होते.
सि गा रे ट सोडायचे आहे त्याने दालचिनी पावडर घ्यायच. एक चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा मध एकत्र करायचा आणि सकाळी आणि संध्याकाळी त्या व्यक्तीला द्यायचा. यामुळे सि गा रे ट सोडण्यास मदत होते. सि गा रे ट किंवा ड्र ग्स अ ड्डी क्ट जे लोक आहेत त्यांना ते घेतल्याशिवाय करमत नाही. हे न करमनं कशामुळे असते तर सल्फरची जी शरीरात कमतरता होते त्यामुळे होत.
त्यामुळे ही कमतरता भरून काढण्याचे काम हे घटक करतात. तसेच कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसभरात एकदा दिला तर तंबाखू सोडण्यास निश्चित मदत होते. ज्याप्रमाणे अदरकाचे तुकडे आहेत जसे लिंबात भिजून आपण चावायला देणार आहेत त्याचप्रमाणे हळदीचे तुकडे वापरून आपण हा प्रयोग करू शकतो. एखाद्या व्यक्तीला गाजराचा रस सकाळ संध्याकाळ असा दोन वेळेस दिला तर त्याची दारू पिण्याची इच्छा कमी होते.
हे जे उपाय आपण पाहिले हे दारू सुटेपर्यंत करायचे आहेत. हळूहळू दारू सुटून जाईल. यात त्या व्यक्तीची इच्छाशक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. इच्छाशक्ती वाढवण्यासाठी त्या व्यक्तीला सकाळी सकाळी बागेत किंवा मोकळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जा आणि पाच मिनिटे प्राणायम करायला लावा. यामुळे त्या व्यक्तीची हिम्मत वाढते आणि इच्छाशक्ती वाढण्यास मदत होते. धन्यवाद…