
मित्रांनो नवीन वर्ष सुरू झाली की प्रत्येक जण आपल्या घरात नवीन कॅलेंडर लावतो. वास्तुशास्त्रानुसार जर या कॅलेंडर ची दिशा योग्य असेल तर आपल्या घराची बरकत होते तसेच भरभराट होते. याउलट कॅलेंडर जर चुकीच्या दिशेला असेल तर त्या मुळे मात्र आपल्या घराच्या प्रगतीत अनेक प्रकारच्या बाधा येतात. मित्रांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट नवीन वर्ष सुरू होताच जे जुन्या वर्षाचे कॅलेंडर आहे ती आपण लगेचच बदला. जुने कॅलेंडर जुनी दिनदर्शिका आपल्या घरात असणे हे आपल्या घराच्या प्रगतीसाठी हानिकारक मानलं जातं. जुने कॅलेंडर व्यवस्थित गुंडाळून ते कुठेतरी ठेवावे. मात्र ते भिंती वरती दिसू नये याची काळजी घ्यावी.
मित्रांनो नवीन कॅलेंडर खरेदी केल्यानंतर हे कॅलेंडर नेमकं कोणत्या भिंतीवर लावावं असा प्रश्न अनेकांना पडतो. चार मुख्य दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, आणि उत्तर तर या पैकी दक्षिण दिशेला मृत्यूची दिशा असे मानलं जातं. या दिशेला आपले पूर्वज असतात त्याचबरोबर मृत्यूचे देवता यमराज यांचे देखील दिशा दक्षिण आहे. आणि म्हणून नवीन कॅलेंडर खरेदी केल्यानंतर ते आपल्या घराच्या दक्षिणेकडच्या बाजूला चुकुनही लावू नका. मित्रांनो अशी ही मान्यता आहे की दक्षिण दिशेला लावलेलं कॅलेंडर त्या घराचा जो मुख्य करता पुरुष असतो किंव्हा मुख्य करती महिला असते त्या महिलेच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानलं जातं.
जर तुम्ही दक्षिणेकडच्या बाजूला कॅलेंडर लावलं तर त्या मुळे आपलं घरातील कर्ती व्यक्ती वारंवार आजारी पडते. तसेच घरच्या प्रगतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. दक्षिण दिशा हे ठेहराव म्हणजेच थांबण्याची दिशा आहे. त्या दिशेला केलेली कोणतीही कामे थांबू लागते. आणि म्हणून दक्षिण दिशेला कधीच कॅलेंडर लावू नये. मित्रांनो कॅलेंडर असेल किंव्हा घड्याळ असेल या वस्तू प्रगतीच्या सूचक असतात. आणि म्हणून जर आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ नयेत असे वाटत असेल तर दक्षिण दिशा अवश्य टाळा.
मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर आपण तीन दिशेना लावू शकतो उत्तर,पश्चिम आणि पूर्व. प्रत्येक दिशेचे आपआपले वेगळे फायदे आहेत. या तिन्ही दिशेचे काय महत्व आहे ते जाणून घेऊयात. सुरुवात करूयात पूर्व दिशे पासून पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं दिनदर्शिका लावणं अत्यंत शुभ मानले जात. यामुळे करिअर मध्ये प्रगती होते. तुमचं जे काही करियर आहे नोकरी आहे किंव्हा उद्योग धंदा आहे त्यामध्ये प्रचंड प्रगती होते आणि संपूर्ण वर्ष भर नोकरीच्या कोणत्याही समस्या येत नाहीत. या पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे. आणि म्हणून तुम्ही लिडरशिप मध्ये असाल तुम्हाला एखाद्या गोष्टी मध्ये नेतृत्व करायचं आहे तर अश्या वेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं अत्यंत शुभ मानले जात.
दुसरी गोष्ट ज्यांना भरपूर पैसे कमवायचे आहेत, धन कमवायचे आहे अश्या लोकांसाठी उत्तर दिशा अत्यंत शुभ मानली जाते. जर तुम्ही उत्तर दिशेच्या भिंतीच्या बाजूला कॅलेंडर लावलं तर त्या मुळे कुबेर देवता प्रसन्न होतात. कारण कुबेरांची दिशा उत्तर आहे. सोबतच आपल्या घरची आर्थिक स्थिती मजबुत बनते आणि अश्या घरात राहणाऱ्या लोकांना प्रचंड धन लाभाचे योग प्राप्त होतात. थोडक्यात धन प्राप्ती जर करायची असेल भरपूर पैसा जर प्राप्त करायचा असेल तर अश्या वेळी उत्तर दिशा अत्यंत महत्वाची आहे. आणि जर तुम्हाला जॉब मिळत नसेल नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर अश्या वेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं अत्यंत शुभ मानलं जातं.
मित्रांनो जेव्हा तुम्ही पूर्व किंव्हा उत्तर दिशेला कॅलेंडर लावताय तर त्या वेळी कॅलेंडर लावण्यासोबतच आपण एका लाला कपड्यावरती सूर्य देवाचे चित्र काढून ते पण तिथे लावावे. किंव्हा उगवत्या सूर्याचा फोटो जर या ठिकाणी लावला तर त्या मुळे सुद्धा खूप चांगले परिणाम मिळतात. मित्रांनो उत्तर दिशेच्या बाबतीत उत्तर दिशेचा देवता कुबेर आहे. आणि अश्या वेळी प्रचंड धनलाभ जर तुम्हाला करायचा असेल तर या दिशेला कॅलेंडर च्या शेजारी आपण हिरवळ असणारे फोटो असतील ते लावू शकता.
मित्रांनो तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बरोबर समोर तुम्ही चुकुनही त्या ठिकाणी कॅलेंडर दिनदर्शिका लावू नका. हे अत्यंत अशुभ मानलं जातं कारण या मुळे आपल्या दरवाजातून जी काही सकारात्मक ऊर्जा येत असते त्या सकारात्मक उर्जेला हे कॅलेंडर प्रभावित करत. मित्रांनो अजून एक दिशा शुभ आहे ती म्हणजे पश्चिम दिशा. तर ही जी पश्चिम दिशा आहे या पश्चिम दिशेला प्रवाहाची दिशा मानली जाते. या ठिकाणी जी काही ऊर्जा आहे ती विशिष्ट मार्गाने प्रवाहित होत राहते. आणि म्हणून जर तुमच्या कामामध्ये सातत्याने अडथळे येत असतील तर अश्या वेळी महत्वाची कामे पूर्ण व्हायची असतील अश्या वेळी आपण आपल्या घराच्या पश्चिम दिशेला हे कॅलेंडर अवश्य लावा.
मित्रांनो या ठिकाणी कॅलेंडर लावल्याने आपली कामे होतातच मात्र आपली कार्य क्षमता सुद्धा वाढते. काम करण्याची गती वेग वाढतो. पश्चिम दिशेला कॅलेंडर लावताना शक्यतो वायव्य दिशेला शक्य असेल तर लावा. तर मित्रांनो या नवीन वर्षात तुम्ही अश्या प्रकारे कॅलेंडर लावू शकता. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा…
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.