
जर तुम्हाला सतत थकवा, अशक्तपणा, जाणवत असेल, हाडे किंवा डोळे दुखत असतील तर हा साधा सोपा घरगुती उपाय तुम्ही नक्की आजमावून पहा. हे करण्यासाठी आधी तुम्हाला मखाना घ्यायचा आहे. कोणत्याही किरण मालाच्या दुकानात किंवा ड्राय फ्रुटच्या दुकानात हा मखना सहजपणे तुम्हाला मिळू शकतो. मखाना हे केल्शियम, मेग्नेशियम आणि झिंक याचा एक मोठा स्त्रोत आहे आणि यातून तुम्हाला भरपूर उर्जा मिळते.
यांत एन्टी एजिंग तत्वे असतात ज्यामुळे तुमच्या शरीरात म्हातारपणा लवकर येत नाही आणि तुम्ही चिरतरुण राहू शकता. याने तुमचे पचन सुधारते आणि खाल्लेले अन्न पचल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहाते. यात केल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने याच्या नियमित सेवनाने तुमची हाडे मजबूत राहातील तसेच सांधेदुखी आणि दातदुखीपासून तुम्ही स्वतःचे रक्षण करू शकता.
मखाना खाल्ल्याने तुमच्या शरीरातील शुगर नियंत्रणात राहाते आणि म्हणून जर तुम्हाला मधुमेह असेल तर याचे सेवन तुम्हाला जरूर केले पाहिजे. याच्या सेवनाने तुम्ही तणावमुक्त राहाल आणि तुम्हाला शांत झोप लागेल. तुमच्या डोळ्यांचे आरोग्य याने चांगले राहील आणि चष्मा असेल तर तो निघून जाईल.
एक मोठी वाटी मखाना घ्या. आख्खे मखाना नको असतील तर तुम्ही त्याची पावडरसुद्धा घेऊ शकता. नंतर थोडी खसखस घ्या. याला इंग्रजीत पॉपी सीड्स असे म्हणतात. यात मोठ्या प्रमाणावर केल्शियम थायमिन असते ज्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते आणि थकवा जाणवत नाही.
यात मिश्रणात चव येण्यासाठी साधी साखर वापरण्यापेक्षा गुळ किंवा खडीसाखर वापरा ज्याने या मिश्रणाला उत्तम चव येईल. गुळात मोठ्या प्रमाणात आयर्न असते ज्याने तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील, खडीसाखरेच्या वापराने तुमच्या शरीरात थंडावा येईल आणि उष्णता कमी होईल. याने पोटाचे विकार सुद्धा दूर होतील.
आधी खलबत्त्यात खडीसाखर कुटून बारीक करून घ्या. एक कप दुध घ्या. दुध गायीचे असल्यास अधिक चांगले. तुमचे वजन जास्त असल्यास गायीचे दुध तुमच्यासाठी उत्तम आहे. एका भांड्यात थोडे तूप घाला. तूप गरम झाल्यावर दोन चमचे खसखस यात घाला. थोडे परतून घ्या. खसखसचा रंग थोडा बदलल्यावर त्यात दुध घाला आणि पाच ते सात मिनिटे शिजवा. त्यानंतर त्यात मखाने घाला आणि ढवळून घ्या. ह्याचे सेवन गरम गरमच करा. याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा भरपूर वाढेल.
हे मिश्रण सलग पंधरा दिवस घेऊन पहा तुम्हाला लगेच फरक जाणवायला लागेल. ह्याचे सेवन शक्यतो रात्री करा कारण खसखसीने तुम्हाला झोप लागेल. हा उपाय करा आणि नवीन स्फूर्ती मिळवा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद. व्हिडिओ पाहून हि कृती करू शकता… https://youtu.be/kyrgLYzIK34