शरीरावर या 10 जागी तिळ असणे आहेत धनाचे महासंकेत योग !

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत शरीरावर असणाऱ्या बारीक बारीक तिळाबद्धल. जोतिषशास्त्रनुसार शरीराच्या काही भागांवर तिळ असणे खूप शुभ व लाभदायक असते. मानवी शरीरात नैसर्गिकरित्या विविध ठिकाणी तिळ असतात. काही व्यक्तींना हे तिळ आवडतात, तर काही व्यक्ती यावर दुर्लक्ष करतात. तिळ आवडणे किंव्हा ना आवडणे हा ज्याचा त्याचा भाग झाला, परंतु तिळ शरीराच्या कोणत्या भागावर आहे याचे जास्त महत्व असते. तसे तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेल्या तिळाच्या महत्वाचे वर्णन शास्त्रांमध्ये केलेले आहे. परंतु त्या पैकी 10 भाग असे आहेत जिथे तिळ असणे खूप शुभ असते. चला तर पाहुयात ती 10 स्थाने…जिथे शास्त्रानुसार तीळ असणे खूप शुभ असते.

शरीरावरील सर्वात पहिले शुभ स्थान म्हणजे हनुवटीवर तिळ असणे. हनुवटी म्हणजे ओठांखाली दाडीचा भाग. ज्यांच्या हनुवटीवर तिळ असते असे व्यक्ती खूप लकी असतात. अश्या व्यक्तींची सर्व कार्य व कामे पटापट यशस्वी होतात. अश्या व्यक्तींची आर्थिक स्थिती ही खूप मजबुत असते. जर पुरुषांच्या हनुवटीवर तिळ असेल तर असा व्यक्ती पैसे कमविण्यासाठी नेहमी आतुर असतो. ज्या स्त्रियांच्या हनुवटीवर तिळ असतो त्या स्त्रियांना इतर स्त्रियांपेक्षा सजने, नटने-मुरडणे, आवडते. हनुवटीवर तिळ असण्याऱ्या व्यक्तीला कमी कष्टात जास्त फायदा होतो. कमीत कमी प्रयत्नांमध्ये हे लोक उंच शिखर गाठतात.

शास्त्रानुसार नाकावर तिळ असणे ही शुभ असते. ज्या व्यक्तींच्या नाकावर तिळ असतो ते व्यक्ती स्वच्छ मनाचे, स्वाभिमानी व स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवणार असतात आणि स्वतःच्या मनाच्या बळावरच हे मोठे होतात. ज्या व्यक्तींच्या नाकारावर तिळ असतो अश्या व्यक्तींना नक्की यश व सफलता मिळते. शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या नाकावर तिळ असतो अश्या व्यक्तींना वयाच्या 32 वर्ष्यानंतर प्रगती व यश येण्यास सुरुवात येते. मेहनती पेक्षा हे लोक बोलबच्चन असतात. त्यांच्या बोलण्याच्या हुषारीमुळेच जास्त धन कमवतात. हे व्यक्ती नोकरदार असो किंव्हा व्यवसायिक हे जीवनात यशस्वीच होतात.

शास्त्रानुसार व्यक्तीच्या पाठीवर तिळ असणे ही शुभ असते. ज्यांच्या पाठीवर तिळ असतो अश्या व्यक्तींना फिरायला खूप आवडते. ह्या व्यक्ती नेहमी आनंदी असतात, व इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतात. ह्या व्यक्ती आपल्या कुटुंबाची देखील खूप काळजी घेतात. खूप कमी वयात या व्यक्ती मोठ्या पदावर पोहचतात. शास्त्रानुसार तळ हातावर तिळ असणे ही खूप शुभ असते. पुरुषांच्या उजव्या तळहातावर व त्रियांच्या डाव्या तळहातावर तिळ असणे खूपच शुभ असते. असे व्यक्ती भौतिक सुखाचा सर्व आनंद घेतात. जीवनातील मोठमोठी कार्य हे अगदी सहज करून टाकतात.

शास्त्रानुसार पायाच्या अंगठ्यावर तिळ असणे ही फार शुभ असते. ज्या व्यक्तींच्या पायाच्या अंगठ्यावर तिळ असतो अश्या व्यक्तींना समाजात मान, सन्मान, प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळते. हे व्यक्ती नेहमी हसत मुख राहतात. त्याशिवाय फिरायला सुद्धा या व्यक्तींना खूप आवडते. असे व्यक्ती जो पैसा कमवतात तो पैसा ते आरामात, मस्ती मध्ये उधळून टाकतात. ज्या स्त्रियांच्या पायाच्या अंगठ्यावर तिळ असतो अश्या महिला आपले राहणीमान, आपले दिसणे या वर खूप पैसे खर्च करतात.

शास्त्रानुसार बिंबिवर तिळ असणे ही खूप शुभ असते. शास्त्रानुसार पोटाच्या इतर ठिकाणी तिळ असणे अशुभ मानले जाते. बिंबिच्या वरच्या भागावर तिळ असलेल्या व्यक्ती खाण्यापिण्याचे शौकीन असतात. किंव्हा बिंबिच्या मध्ये किंव्हा बिंबिच्या आसपास जर तिळ असेल तर त्या व्यक्तीला भरपूर धनसंपतीची प्राप्ती होते. असे लोक जीवनात मोठमोठी पदे मिळवतात,व धन धान्याने परिपूर्ण राहतात. ज्या व्यक्तींच्या बिंबिच्या खालच्या बाजूला तिळ असते अश्या व्यक्तींनाही शास्त्रानुसार शुभ मानले जाते.

शास्त्रानुसार तर्जनीवर म्हणजे अंगठ्याच्या शेजारी असणाऱ्या बोटावरही तिळ असणे शुभ असते. पुरुषांच्या उजव्या तर्जनीवर व स्त्रियांच्या डाव्या तर्जनीवर तिळ असणे शुभ असते. ज्या व्यक्तींच्या तर्जनीवर तिळ असतो असे व्यक्ती जीवनात परिपूर्ण यश मिळवतात. आपल्या कर्माच्या आधारावर हे लोक भरपूर धन मिळवतात,व जीवनात भौतिक सुखाची प्राप्ती करतात. अश्या लोकांची शत्रू व गुप्त शत्रू ही खूप असतात. या लोकांना कितीतरी वेळा शत्रूंचा सामना करावा लागतो.

तसेच शास्त्रानुसार दोन्ही भुवयाच्या मधी तिळ असणे ही खूप शुभ असते. ज्या व्यक्तींच्या दोन्ही भुवयाच्या मधी तिळ असतो अश्या व्यक्तींचा विवाह न अडथळा येता पूर्ण होतो. विवाह नंतर यांचे जीवन खूपच आनंददायी व सुखकर जाते. हे व्यक्ती आपल्या स्वतःच्या हिमतीवर विश्व निर्माण करतात. यांचे भाग्य नेहमी याचे साथ देते.तर मित्रांनो हे आहेत ते शरीरातील काही भाग जिथे तिळ असणे फारच शुभ असते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *