
मोरपंख दिसायला जेवढे सुंदर असतात तेवढेच उपयोगीही ठरतात. श्रीकृष्णच्या मुकुटापासून ते मंदिरात दृष्ट काढण्यापर्यंत मोरपंखाचं उपयोग विविध ठिकाणी होतो. मोरपंखची खास गोष्ट म्हणजे हे कधीच खराब होत नाहीत. यामध्ये असलेल्या विविध रंगांमुळे हे सूर्यपासून निघालेल्या प्रत्येक उर्जेला ग्रहण करून निगेटिव्हिटी दूर करतात. वास्तू आणि तंत्र शास्त्रामध्ये मोरपंखाचे खास महत्त्व सांगण्यात आले आहे.
हिंदू धर्मात मोराची गणना एक शुभ पक्षी म्हणून केली जाते. हेच कारण आहे, की या मोराच्या मोरपिसाला पण अत्यंत शुभ आणि भाग्यशाली मानले जाते. याचे एक कारण असे सुद्धा आहे, की मोर हा भगवान शिव यांचा पुत्र कार्तिकेय याचे वाहन आहे. म्हणूनच, मागच्या काही दशकांपासून लोक मोरपीस आपल्या घरात ठेवत आले आहेत. असे मानले जाते, की मोरपीस घरात ठेवल्यामुळे घरातिल सुख, शांति आणि समृद्धि यामध्ये वृद्धि होते.
भगवान श्रीकृष्ण यांनीसुद्धा आपल्या मुकूटात मोरपीस वापरले होते. तसेच, बर्याच ऋषि मुनींच्या आश्रमात मोर फिरत असत. त्यामुळे तेथील वातावरणात सकारात्मक ऊर्जेची वाढ होत असे. आज आम्ही तुम्हाला आपल्याजवळ मोरपीस ठेवण्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत. त्याचबरोबर मोरपिसासंबंधित काही मनोरंजक गोष्टींवर चर्चा करणार आहोत.
जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा अधिक असेल, तर हे मोरपीस तुमच्यासाठी फायदेशीर गोष्ट आहे. मोरपीस घरातील नकारात्मक उर्जेला नाहीसे करण्याचे काम करते. हे घरात ठेवल्यामुळे घरात कायम सकारात्मक म्हणजेच पॉजिटिव एनर्जी राहते. मनात चांगले विचार येतात व कामातील लक्ष वाढते. परिवारात भांडणे वादविवाद कमी होतात. त्यामुळे घरात एक शांत आणि चांगले वातावरण राहाते. घराच्या दक्षिण-पश्चिम बहगत मोरपंख ठेवल्याने घरात नेहमी बरकत राहते.
सनातन धर्मात मोराचा संबंध धनाची लक्ष्मी देवी आणि विद्येची देवी सरस्वती यांच्याशी जोडला गेला आहे. असे म्हटले जाते, की मोरपीसाला जर घरातील तिजोरीत किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवले गेले तर घरात धनाची कमतरता दिसत नाही. घरात समृद्धि राहाते. तर मोरपीस जर पुस्तकात किंवा स्टडी टेबलवर ठेवले, तर बुद्धीला चालना मिळते. माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर सदैव राहील.
मोरपीस शुभ संकेताचे प्रतीक असते. हिंदू धर्मात याला शुभ संकेताबरोबर जोडलेले बघितले गेले आहे. असे म्हटले आहे, कि जर मोरपिसाला घरात बासुरी बरोबर ठेवले, तर घरात प्रेमाची कधीच काही कमतरता पडत नाही. सगळे लोक मिळून मिसळून राहातात. तसेच, कुठे प्रवासाला जात असाल, तर मोरपीस जवळ ठेवा, तुमची यात्रा सुखमय होईल. मोरपंख घरात अशा ठिकाणी ठेवावा, ज्यामुळे तो सहजपणे दिसेल. या उपायाने नकारात्मक दूर होऊ शकते.
हिंदू धर्मात वास्तूला खूप महत्व दिले गेले आहे. असे म्हणतात, कि जर घरात वास्तुदोष असेल, तर दरिद्रता, अशान्ति आणि नकारात्मक ऊर्जा घरात येते. अशा वेळी मोरपीसाचा वापर लाभकारी असतो. हे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी ओळखले जाते. जर तुमच्या घरात वास्तु दोष असेल, तर मोरपीस ठेवल्यामुळे तो दूर होतो.
मोरपिसाला पूजेच्या जागी ठेवल्यामुळे व रोज त्याची पुजा केल्यामुळे, घराची प्रगति होते. जर घरात कृष्ण किंवा बालगोपालाची मूर्ति असेल, तर त्यांच्या मुकुटात मोरपीस लावू शकतो. त्यामुळे तुमचा फायदाच फायदा होईल.. मोरपंख नेहमी सोबत ठेवल्यास अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.