कष्ट करून कोणी श्रीमंत होत नाही, त्यासाठी हे ५ नियम नेहमी लक्षात ठेवा !

मित्रांनो या जगात प्रत्येक व्यक्तीमध्ये श्रीमंत होण्याची क्षमता आहे. पण या जगामध्ये ठराविक लोकांकडेच अमाप संपत्ती आहे आणि बाकींच्या लोकांच्या आयुष्यात नुसता संघर्ष असतो. श्रीमंत लोकांना असे कोणते नियम माहीत असतात जेणेकरून त्यांच्या घरात पैशांचा पाऊस पडतो. आपण त्यापैकी पाच असे नियम बघणार आहे जे श्रीमंत लोकं दैनंदिन आपल्या आयुष्यामध्ये अमलात आणतात. प्रत्येक नियम आयुष्य बदलणारा आहे.

पहिला नियम, श्रीमंत लोकांना सगळीकडे भरभराट दिसते. गरीब लोकांना सगळीकडे कमतरता दिसते. श्रीमंत लोकांची मानसिकता भरभराटीची असते. ते एका निसर्गनियमाचे एकदम काटेकोरपणे पालन करतात. तो म्हणजे जसा विचार तसा जीवनाला आकार. सर्वांना माहिती असते आपण ज्याप्रमाणे विचार करू त्याप्रमाणे आपल्याकडून कृती घडणार आहेत. त्यांना माहिती असते कोणतेही गोष्ट दोन वेळा निर्माण होते. एकदा मनामध्ये आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात. त्यामुळे ते अठ्ठहासाणे भरभराटीचा विचार करतात. त्यांच्यामते या जगामध्ये सर्वकाही आहे. मग तो पैसा असेल, वेळ असेल किंवा संधी असेल. त्यांना सगळीकडे भरभराट दिसते. मनामध्ये भरभराट असल्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात सुद्धा भरभराट होते.

दुसरा नियम, श्रीमंत लोकांना नेहमी संधी दिसते. गरीब लोकांना नेहमी समस्या दिसतात. एक नामांकित बुटांची कंपनी असते. या कंपनीला आफ्रिकेच्या एका मोठ्या शहरामध्ये शाखा उघडायची असते. त्या कंपनीतला बॉस आपल्या दोन कर्मचाऱ्यांना एक काम सांगतो. तुम्ही आफ्रिकेच्या या शहरामध्ये जाऊन या आणि मला सांगा या शहरात आपल्या कंपनीची शाखा उघडली तर आपल्याला फायदा होईल का? दोघे कर्मचारी सांगितल्याप्रमाणे आफ्रिकेच्या शहरात जाऊन येतात. पहिला कर्मचारी आपल्या बॉसला रिपोर्ट द्यायला येतो. बॉस त्याला विचारतो तुला काय वाटते. आपल्या बुटांना त्या शहरामध्ये काही स्कोप आहे का? पहिला कर्मचारी उत्तरतो, बॉस त्या शहरामध्ये कोणचं बूट घालत नाही. त्यामुळे आपण जर त्या शहरामध्ये शाखा उघडली तर आपले खूप मोठे नुकसान होईल. बॉस सगळं नीट ऐकून घेतो आणि म्हणतो ठीक आहे. तुझ्या सहकार्याला पाठवून दे.

आता दुसरा कर्मचारी येतो. बॉस त्याला सुद्धा तोच प्रश्न विचारतो. तुला काय वाटते, आपल्या बुटांना त्या शहरामध्ये काही स्कोप आहे का? तेव्हा दुसरा कर्मचारी उत्तरतो, बॉस त्या शहरामध्ये कोनच बूट घालत नाही. त्यामुळे मला वाटते त्या शहरामध्ये आपल्याला खूप मोठा स्कोप आहे. आपण जर त्यांना बुटाचे महत्त्व पटवू शकलो तर आपल्या कंपनीचा खूप फायदा होऊ शकतो. मित्रांनो इथे तुम्ही पाहिले तर दोन्ही कर्मचारी एकाच ठिकाणी जाऊन आले होते. पण तिथे एकाला समस्या दिसली आणि दुसऱ्याला संधी.

तिसरा नियम, श्रीमंत लोक झटपट यशाच्या मागे लागत नाही. गरीब लोकांना सर्वकाही झटपट पाहिजे असते. वॉरेन बफेट म्हणतात, वास्तवता ही आहे की तुम्ही कितीही हुशार असाल किंवा मेहनती असाल काही गोष्टी आयुष्यात मिळायला वेळ लागतो, त्यामध्ये श्रीमंती सुद्धा येते. श्रीमंत लोक कधीच झटपट पैसा, झटपट यश अशा गोष्टींच्या मागे लागत नाही, त्यांच्यामध्ये संयम असतो. त्यामुळे ते जे काही करतात, मग त्यामध्ये व्यवसाय असेल, पैशांची गुंतवणूक असेल किंवा ते करत असलेली मेहनत असेल. त्यांना माहीती असते परिणाम यायला थोडा कालावधी लागेल. त्यामुळे ते सातत्याने प्रयत्न करत राहतात. त्यांचा शॉर्टकटवर विश्वास नसतो.

चौथा नियम, श्रीमंत लोक आपल्या संगतीला खूप महत्त्व देतात. जिथं गरीब लोकांना संगतीचे महत्त्व माहीत नसते. मित्रांनो असे म्हणतात, तुमचे नेटवर्क तुमचा नेटवर्थ (net worth) ठरवते. श्रीमंत लोक अठ्ठहासाने अशा लोकांच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात, जे श्रीमंत तर असतातच, शिवाय ज्यांच्याकडे ध्येय असतात, जे नेहमी उज्वल भविष्याविषयी बोलत असतात. ज्यावेळी आपण अशा ध्येयवेड्या लोकांबरोबर राहायला सुरवात करतो, आपला दृष्टिकोन बदलतो. आपणसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित होतो. इथे संगत फक्त माणसांची म्हणत नाही, संगत चांगल्या पुस्तकांची असू शकते. चांगल्या प्रेरणादायी व्हिडिओची असू शकते.

पाचवा नियम, श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात, गरीब लोक पैशांसाठी काम करतात. मित्रांनो या जगात जास्त लोक पैशांसाठी काम करतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यावर झालेले संस्कार. आपल्याला हेच शिकवले जाते, चांगले शिक्षण घ्यायचे, एखादा चांगला जॉब करायचा आणि रिटायर्ड होईपर्यंत पैशांची बचत करायची वगैरे वगैरे. या पद्धतीमध्ये काहीच चूक नाही. पण ह्या मार्गाने तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही.

रिच डॅड पुअर डॅड चे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात या पद्धतीमध्ये समस्या ही आहे की तुम्ही जोपर्यंत काम कराल तोपर्यंतच तुम्हाला पैसे मिळत राहतील. तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला जास्त काम करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. जे शरीरासाठी चांगले नाही. श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात, ते आर्थिक शिक्षण घेतात, गुंतवणूकीचे ज्ञान संपादन करतात आणि मग ते आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवणूक करतात जिथे त्यांना सातत्याने परतावा मिळत राहतो. धन्यवाद…

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *