
तुम्हाला माहीत असेल की “तांदूळ” हे एका धान्याच्या बी ला म्हणतात. भारतात मात्र शिजलेल्या तांदूळाला “भात” म्हणतात. भात खाणे तसे सर्वांनाच पसंत असते आणि सर्व लोक तो खूपच आवडीने खातात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, हाच तांदूळ तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतो., ज्याबद्दल तुम्ही कधी विचारच केला नसेल. नेहमीच लोक भाताचे सेवन हे छान स्वादिष्ट अशा पक्वानांच्या बरोबर करतात. त्याचप्रमाणे, जेवणाच्या ताटात जर भात नसेल, तर जेवण अपूर्ण वाटते. पण जर जेवणात भात असेल, तर मात्र असे वाटते, की छान आता पोट नक्की भरणार. तुम्हाला कदाचित माहीत असेल, की तांदूळ दोन प्रकारचे असतात. एक पांढरा आणि दूसरा पिवळ्या रंगाचा असतो, ज्याला “ब्राऊन राइस” म्हणतात.
पांढरा तांदूळ शरीरास नुकसानकारक असतो. आता तुम्ही असा विचार करीत असाल, की असे तर हे दोन तांदुळच आहेत, तर मग यांच्या रंगात हा फरक कसला असतो. काही लोकांना कदाचित याबद्दल माहिती असेल. परंतु, तुमच्या माहितीसाठी सांगतो, की पांढर्या तांदुळावरचे टरफल काढून टाकले जाते. ज्याला साधारण भाषेत “पॉलिश” तांदूळ म्हणतात. त्याच्या उलट, पिवळ्या तांदुळावरील टरफल काढले जात नाही., कारण याला प्रथम हलके शिजवले जाते, ज्यामुळे त्याचे टरफल कडक होते.
तांदुळामुळे लठ्ठपणा: तांदुळाशिवाय दुसरे कोणतेही धान्य जरूरीपेक्षा जास्त सेवन केल्यामुळे लठ्ठपणा वाढण्याच्या शक्यता वाढतात. भारतात लोकांना असे वाटते की तुम्ही तांदूळ खाल्लेत तर लठ्ठ व्हाल, पण तांदुळात फैटची मात्रा खूप कमी असते, मग तांदूळ लठ्ठपणा कसा वाढवू शकतो? यामध्ये कार्बोहाईड्रेटची मात्रा खूप असते, तुम्ही जर जरुरीपेक्षा जास्त तांदूळ किंवा भात खाल्लात, आणि व्यायाम केला नाहीत, तर मात्र लठ्ठपणा तुम्ही टाळू शकत नाही.
सफेद तांदुळात विटामीन सी ची मात्रा अजिबात नसते. ज्यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात. मधुमेह झालेल्या लोकांसाठी भात नुकसान करणारा आहे. त्यामुळे अशा लोकांनी भाताचे सेवन करू नये. अस्थमा झालेल्या लोकांनी भात खाऊ नये. भातात ग्लुकोजची मात्रा खूप असते. त्यामुळे मधुमेही लोकांनी याचे सेवन करू नये. अस्थमाच्या लोकांना पण भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. म्हणून असा रुग्णांनी भातापासून दूर राहावे.
भातामुळे काही फायदेही आहेत. तुम्हाला डायरिया झाला असेल तर पांढरा भात खाणं खूप प्रभावी आहे. पांढऱ्या भातामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. भातानं मेटॅबोलिझम चांगलं राहतं. त्यानं शरीराला उर्जा मिळते. भातात फायबरचे गुण असतात ज्यामुळे पोटोतील गॅसचे प्रमाण कमी होते. आळस निर्माण करते: भाताचे किंवा तांदुळाचे सेवन केल्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढू लागते. ज्यामुळे झोप जास्त येते व आपल्या शरीरात आळस निर्माण होतो. जे लोक जेवणानंतर कामे करतात, त्यांनी तांदुळचे म्हणजेच भाताचे सेवन करणे बंद केले पाहिजे.
जर तुमच्या पोटात अल्सरची समस्या असेल तर शिळा भात उपयुक्त ठरतो. त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा शिळा भात खाणे गरजेचे आहे. यामुळे लवकर आराम मिळतो. पांढऱ्या भाताला पर्यायही आहे. तो म्हणजे ब्राऊन भात. तो जास्त आरोग्यदायी असतो. ब्राऊन भातामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. ब्राऊन भातामुळे त्वचा मुलायम राहते. तांदळाची पेजही शरीरासाठी चांगली असते.
त्यामुळे रोजच्या जेवणात पांढऱ्या भाताचं प्रमाण कमी करून ब्राऊन भात खा. म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.