1 रुपयाची तुरटी, शेतातील व घरातील #उंदीर, घुस कायमचा पळून लावा…

अनेक लोक उंदीर मारण्यासाठी औषधे वापरतात परंतु औषधांचा वापर कुटुंबातील लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो म्हणून औषधाविना घरगुती वस्तू उंदीर पळवण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घ्या: मित्रांनो तुमच्या घरामध्ये वारंवार उंदीर येत असतील. उंदीर खूप सारा उपद्रव करत असेल. धान्य, कपडे यांचे नुकसान करत असेल.

आपल्या शेतामधून आलेलं धान्य जे साठवून ठेवतो किंवा वर्षभर पुरेल इतकं धान्य आपल्या घरी ठेवतो. या धान्याला जर जास्त उंदीर लागले असतील किंवा या धान्याचे उंदीर नुकसान करत असतील. तर यासाठी आपण एक तुरटीचा तुकडा लागणार आहे. हा जो तुरटीचा खडा आहे आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्या मदतीने या तुरटीचे एकदम बारीक चूर्ण करायचे आहे. हे जे तयार होणार बारीक चूर्ण आहे ते आपल्याला वापरायचे आहे.

या चूर्णाच्या मदतीने ज्या ठिकाणी उंदीर वारंवार येतात किंवा आपल्या शेतामध्ये उंदीर पाहायला मिळतो. उंदराचे जे बीळ आहे किंवा घुस ज्या ठिकाणी येते. ते जे बीळ आहे. नुकतेच आपल्याला समजते की उंदराने ज्या ठिकाणी पोखरलेलं आहे. जिथे ते बीळ आहे. तिथे अशावेळी आपल्याला एक सोपा उपाय करायचा आहे. या उपायासाठी हे जे चूर्ण केलेलं आहे ते वापरायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे तर हे जे चूर्ण आहे ते त्या बिळात टाकायचे आहे किंवा आपल्या ज्या ठिकाणी उंदीर सतत येतो किंवा आपले धान्य ज्या ठिकाणी आहे तिथे टाकायचे आहे.

या तुरटीच्या वासाने मित्रांनो या तुरटीचा इफेक्ट असा आहे की याचा वास सतत जर घेतला तर नाकात आणि गळ्यात सूज येते. हे माणसांच्या बाबतीत त्याचप्रमाणे या उंदरांना देखील हाच नियम लागू पडतो. म्हणून ज्या ठिकाणी चूर्ण किंवा तुरटीचा खडा ठेवला आहे त्याठिकाणी उंदीर पाहायला मिळत नाही. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच रिजल्ट मिळेल…

तुम्ही कांद्याचा देखील वापर करू शकता, कांदा : उंदीर कांद्याचा तीक्ष्ण वास सहन करू शकत नाही. उंदीर फिरत असेल त्या ठिकाणी कांद्याचे लहान-लहान तुकडे ठेवावे. या वासामुळे उंदीर पळ काढेल. पुदीना उंदरांच्या मध्ये भीती निर्माण करते. पुदीन्याची पाने किंवा फुले उंदीरांच्या बिळामध्ये टाकावी किंवा जर घरात उंदीर असतील तर घरात जेथे जेथे उंदरांचा वावर असतो तेथे पुदीना टाकावा याच्या वासामुळे उंदीर घराबाहेर पळून जातील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *