जर तुमच्या घरात मुंग्या आहेत तर समजून जा तुमच्यासोबत होणार आहे काही असे !

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपण मुंग्यांना अगदी शूद्र व लहान जीव समजतो. आपण चालत असताना जर मुंग्या दृष्टीस पडल्या तर आपण त्यांना न बघितल्यासारखे करतो व पुढे निघून जातो. परंतु मुंग्या खूप कष्टाळू व हुशार आहेत हे आपल्याला माहीतच नसते. वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे की मुंग्या त्याच्या वजनापेक्षा शंभर पट वजन उचलू शकतात. तसेच त्या एक जुटीने काम करतात. एकमेकींशी संवाद साधतात. त्यांच्या घरामध्ये पुढील भविष्याचा विचार करून गुंडार घर तयार केलेले असते. त्यात ते खाण्याची सामुग्री एकत्र करून ठेवतात व बिकट परिस्थितीत ते उदरनिर्वाह करतात. त्यांचे ऐकमेकींचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग असते.

मुंग्या एकजूट होऊन डोंगरालाही फोडण्याची ताकद ठेवतात. मुंग्या आसपासचे बारीक बारीक किटं, किडे मारून पडले असतील तर त्यांना खाऊन वातावरण स्वच्छ करण्याचे काम करतात. मुंग्यांमुळेच आपल्याला धन येण्याचे आणि धन जाण्याचे संकेत मिळतात. रोजच्या जीवनात आपल्याबरोबर कितीतरी लहान मोठ्या गोष्टी घडत असतात. परंतु आपण त्यांच्यावर लक्ष देत नाही. आपल्याला या गोष्टींद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्या ते लक्षातच येत नाही. मुंग्यांना आपण एक छोटासा जीव मानतो. आपण त्यांना जास्त महत्त्व देत नाही. आपल्या आसपास कितीतरी मुंग्या असतात परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु नीट लक्ष दिले तर मुंग्या खूप मेहनती व एकट्याने राहणारे जीव आहेत. या विश्वात मुंग्यांच्या अनेक जाती बघितल्या जातात. परंतु आपण शक्यतो लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या याच दोन प्रकारच्या मुंग्यांना आपण ओळखतो.

मुंग्या आपल्या वजनाच्या शंभर पट वजन उचलू शकतात. इतकी त्यांच्यामध्ये क्षमता असते. लाल मुंग्यांना अशुभ तर काळ्या मुंग्यांना शुभ मानले जाते. परंतु या दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना फार पूर्वीपासून जेवण म्हणून पिठ टाकण्याची परंपरा चालत आली आहे. मुंग्यांना पिठामध्ये साखर घालून ते भोजन म्हणून दिल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात. हजारो मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपल्याला सहस्त्र भोजनाचे पुण्य मिळते व त्या हजारो मुंग्या आपल्याप्रती कृतज्ञ होतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. त्यांच्या आशीर्वादाचा परिणाम म्हणून आपल्या प्रत्येक संकटापासून संरक्षण होते.

जे चिमण्यांना दाणे टाकतात व मुंग्यांना पिठसाखर खायला देतात ते परमब्रह्मची प्राप्ती करतात. मुंग्यांना दररोज साखर खायला दिल्यास आपली कर्जापासून मुक्तता होते. म्हणून दररोज अंघोळ झाल्यानंतर चहा पिण्यापूर्वी मुंग्यांना साखर टाकावी व नंतरच चहा घ्यावा. हा रोजचा नियमच करून घ्यावा. जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्या सरळ रेषेत चालत असतील तर समजून जा तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल.

काळ्या मुंग्या अचानक घरात दिसल्यास एक शुभसंकेत समजला जातो. काळ्या मुंग्या आपल्याबरोबर सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. काळ्या मुंग्यांच्या घरात येण्याने देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते. या मुंग्यांना कधीही मारू नये. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना घरात तसेच राहू द्यावे. तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे. एक छोटासा गुळाचा तुकडा घेऊन खडूसारखे त्या गुळाच्या तुकड्याने घराच्या बाहेर एक रेष ओढायची आहे. गुळाच्या वासाने आपोआप मुंग्या तेथे जातील व घरातून बाहेर निघतील. जर यावेळी तुम्ही एक लाल कापड अंथरून देवी लक्ष्मीचे नाव घेता घेता हे कार्य केले तर देवी लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल व तुम्हाला शुभफळ मिळेल.

मित्रांनो घरामध्ये लाल मुंग्या येण्याने नकारात्मकता येते. त्या आपल्यासाठी अशुभ फळ व संकेत घेऊन येतात. लाल मुंग्याचा घरात येण्याचा अर्थ तुम्ही कर्जबाजारी होण्याची ही सुरवात आहे. तुमच्या व्यापारात नुकसान हाऊ शकते. यामुळे घरात अशांतता निर्माण होत व सुखसमृद्धी घटायला सुरुवात होते. अचानक घरात कोणी आजारी देखील पडू शकते. परंतु या मुंग्यांना देखील विषारी औषधांनी मारायचे नसते.

तर पिठात थोडी साखर मिसळून ते एक कापडात बांधून ते गाठोडे दाराबाहेर ठेऊन द्यावे. यामुळे त्या गाठोड्याकडे या मुंग्या आकर्षित होतील व घरातून बाहेर जातील. लाल मुंग्या घरात असणे आपल्यासाठी अशुभ असते. परंतु काळ्या मुंग्या शुभ असल्यामुळे तुम्हाला त्यांना पीठ व साखर खाऊ घालायचे आहे. म्हणजे तुम्हाला सहस्त्र भोजनाचे पुण्य मिळेल. काळ्या मुंग्यांना रोज साखर टाकल्याने आपले कर्जही फिटते व कर्ज घ्यावे लागत नाही. म्हणून अंघोळ झाली की लगेचच चिमूटभर साखर दाराबाहेर जरूर टाकावी. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *