
हिंदू धर्मात जेवण कोणतेही मंगलकार्य असेल तेव्हा त्याची सुरुवात कपाळावर टिळक लावूनच केली जाते. पूजा किंवा कोणतेही सणवार ह्यांमध्ये टिळा लावणे अनिवार्य असते. हे शुभ मानले जाते. आता टिळा लावताना त्यावर थोडे तांदूळही लावले जातात. तुम्हाला हे माहिती आहे का कि असे तांदूळ का लावले जातात ? काय आहे त्यामागचे कारण ?आज आम्ही तुम्हाला त्यामागचे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही करणे सांगणार आहोत. तुम्ही हे जाणून घेतल्यावर नेहमी टिळा लावायला लागाल.
वैज्ञानिक कारण
टिळा लावताना डोक्याला शांती आणि शीतलता मिळते. वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास तांदूळ हे शुद्धतेचे प्रतिक असतात. याने सकारात्मक उर्जा आपल्याला मिळते. म्हणून शुभ कार्यात याचा वापर आवर्जून केला जातो. धार्मिक महत्त्व : शास्त्राच्या दृष्टीने तांदूळ हे एक शुद्ध अन्न मानले जाते. आणि म्हणूनच आपण संकोच न करता हे कोणत्याही देवाला देऊ शकतो. याला ‘अक्षता’ असेही म्हटले जाते. याचा अर्थ कधीही क्षय न होणारे. म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी याचा वापर खासकरून केला जातो.लक्ष्मीला तांदूळ आवडतात असे म्हणतात आणि म्हणून जेव्हा सगळे भोग बनतात तेव्हा त्यात तांदळाची खीर बनवली जाते.
तांदळाशिवाय अपूर्ण आहे पूजा, कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेत तांदूळ असायला हवेत ज्याशिवाय ती पूजा अपूर्ण असते. हे तांदूळ शुद्धतेचे प्रतिक असतात आणि म्हणून माथ्यावर टिळा लावताना त्यावर थोडे तांदूळ लावले जातात. नकारात्मक उर्जा नाहीशी होते. तांदूळ सकारात्मक उर्जेसाठी ओळखले जातात. यांमुळे आजूबाजूची नकारात्मक उर्जा नाहीशी होऊन सकारात्मक उर्जा पसरते. हेच कारण आहे त्यासाठी कुंकू टिळकाबरोबर तांदूळ दाण्याचा वापर केला जातो. हे लावताना अशी आशा केली जाते कि टिळकाच्यावर तांदूळ लावल्याने ते आजूबाजूची नकारात्मक उर्जा नाहीशी करतात. असे केल्याने जे टिळा लावत असतील त्यांच्यातील स्नेहही वाढतो.
आता तुम्हाला समजलेच असेल कि टिळा लावल्यावर तांदूळ लावल्याचे महत्व समजले असेलच. आम्ही आशा करतो कि तुम्ही नेहमी टिळा लावताना न विसरताना तांदळाचा वापर कराल. तुमच्या घरातील कोणत्याही कार्यात असेच करा म्हणजे सकारात्मक उर्जा निर्माण होईल. तुमचे काम कोणतेही विघ्न न येता नीट पार पडेल.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.