Breaking News

घरात पूर्वजांचे फोटो या दिशेला लावले असतील तर ताबडतोब हटवा नाहीतर…

नमस्कार मित्रांनो, अनेकांच्या मनात हा प्रश्न नेहमी पडलेला असतो की आपल्या पूर्वजांचे फोटो आपल्या घरात लावावे का..? पूर्वज म्हणजे काय आपले जे आजी आजोबा होते पंजीपणजोबा होते किंव्हा, त्यांच्या पूर्वीची पिढी जे आपल्यात आज नाहीत. त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर त्यांचे फोटो आपल्या घरात असावेत का? आणि जर घरात लावायचेच असतील तर मग ते कोणत्या दिशेला लावावेत जेणेकरून घरावरती शुभ परिणाम घडतील. अनेकांच्या मनात हा सुद्धा प्रश्न येतो की देवघरात जर पूर्वजांचे फोटो लावले तर चालतील का? तर सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज वास्तुशास्त्रानुसार पाहणार आहोत.चला तर मग सुरुवात करूयात..

मित्रांनो पहिला प्रश्न म्हणजे पूर्वजांचे फोटो घरात लावावेत का?  याच उत्तर अगदी स्पष्ट आहे.होय,पूर्वजांचे फोटो आपल्या वाडवडीलांचे फोटो आपल्या घरामध्ये अवश्य असावेत.का असावेत? वास्तुशास्त्र अस मानत की आपल्या पूर्वजांचे आपल्या वाडवडीलांचे फोटो जर आपल्या घरात असतील तर या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो.आपल्या येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होतो.त्यांच्या आशीर्वादाणे कुटुंबाची भरभराट होते.उन्नती होते प्रगती होते.मित्रांनो आपल्या पूर्वजांनी आपल्या घरासाठी खूप मोठं योगदान दिलेलं असत.

मित्रांनो दुसरा प्रश्न असा आहे की फोटो तर लावायचे आहेत पण ते कुठे लावायचे? काही जण म्हणतात देवघरात आम्ही आमच्या पूर्वजांचे फोटो लावलेले आहेत.ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.जरी आपले पूर्वज महान होते,त्यांनी खूप मोठी कामगीरी करून दाखवली आहे.आपल्या घरासाठी त्यांचं मोठं योगदान आहे.ते सन्मानिय आहेत.मात्र त्यांची बरोबरी ही आपल्या देवतांशी होऊ शकत नाही.जा देवीदेवतांची आपण पूजा करत आहोत,त्यांच्या शेजारी म्हणजे देवघरामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे फोटो चुकूनही लावू नका. त्यामुळे आपल्या देवघराच पावित्र्य नष्ट होत.जी आपल्या देवघरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते तिचा नाश होतो.आणि परिणामी याचा त्रास आपल्यालाच होतो असे नाही. तर आपल्या पिढीला पिढीला सुद्धा याचा त्रास होतो.आणि आपली प्रगतीही थांबते.आपले हे जे पूर्वज आहेत ते पितृ लोकांमध्ये राहत असतात.त्यांना या गोष्टी चा त्रास होतो.आणि म्हणून आपल्या देवघरात आपण चुकूनही हे फोटो लावू नयेत.

दुसरी गोष्ट म्हणजे किचन. मित्रांनो आपण आपल्या किचनमध्ये सुद्धा आपल्या पूर्वजांचे फोटो लावू नयेत. तिसरी जी जागा आहे ती म्हणजे आपल्या घरातील बेडरूम..होय बेडरूममध्ये सुद्धा चुकूनही पूर्वजांचे फोटो लावू नका.फोटो लावल्यास वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.अनेक अडचणी येतात.पतीपत्नी च्या प्रेमामध्ये कमतरता येते.ह्या ज्या आम्ही तुम्हाला जागा सांगितल्या येथे फोटो लावल्याने अपशकुन घडतात.वारंवार घरावरती संकटे येतात.तर या तीन चार जागा आपण टाळायच्या आहेत.

आता प्रश्न असा आहे की कोणत्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचे फोटो लावणे अत्यंत शुभदायी ठरेल..आपल्याला जर या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील.सकारात्मक ऊर्जा घरात हवी असेल तर त्या साठी सर्वात चांगली जागा आहे ती म्हणजे उत्तर दिशा..आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशेवर भिंत आहे त्या ठिकाणी आपण आपल्या पूर्वजांचे फोटो नक्की लावावेत.त्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळतातच,पण त्याचबरोबर कुटुंबाची सुद्धा भरभराट होते.जर तुम्हाला उत्तर दिशेला फोटो लावणे शक्य नसेल तर दुसरी शुभ दिशा आहे पूर्व दिशा..जा दिशेने सूर्य उगवतो त्या दिशेला सुद्धा आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावू शकतो.

जर तुम्हाला पूर्वेला सुद्धा शक्य नसेल तर उत्तर आणि पूर्व मधील जी दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा तर या ईशान्य दिशे वर सुद्धा आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावू शकता.वास्तुशास्त्रानुसार ते मान्य आहे. मात्र यात एक अडचण अशी येते की जर तुमचे देवघर जर ईशान्य दिशेला असेल तर तुम्ही फोटो हा पूर्व दिशेला लावावेत.पश्चिम जी दिशा आहे ज्या ठिकाणी सूर्य मावळतो तर या ठिकाणी सुद्धा पूर्वजांचे फोटो लावू नये..का लावायचे नाहीत? वास्तुशास्त्र अस मनात पश्चिम दिशेला पूर्वजांचे फोटो लावल्याने आपल्या घरात ताणतणाव वाढतो,आणि सर्वात महत्वाची गोष्ट धन हानी होते.पैसा कमी कमी होतो पैसा खर्च जास्त होतो.तर चुकूनही पश्चिम दिशेला फोटो लावू नये.पश्चिम दिशेपेक्षा वाईट दिशा आहे दक्षिण दिशा.. जर तुम्ही दक्षिण दिशेला फोटो लावले तर घरात भयंकर प्रमाणात गरिबी येते दारिद्र्य येते.तर आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती समजली असेल.तर हा लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा…

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *