2 दिवसात कसलाही गुडघेदुखी, सांदेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी कमी करा…

बदलत्या जीवनशैलीचा बऱ्याच व्यक्तींच्या शरीरावरती परिणाम होऊन काही व्यक्तींचे खुप वजन वाढले. काही व्यक्तींना खुप बसूनच कामे करावी लागतात. तर काही व्यक्तींना खुप कष्टाचे कामे करावे लागतात. याचा जास्त परिणाम शरीरावरती झाला आणि गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास सुरू झाला.

यामध्ये व्यायामांचा अभाव आणि योग्य आहार न घेतल्यामुळे हे आजार जास्त वाढायला लागले. असे हे वाढलेले आजार कमी करण्यासाठी घरगुती, घरच्या घरी एकदम आयुर्वेदीक प्रभावी उपाय, या उपायाने तुमचा कसलाही आजार कमीच होणार असे हे उपाय आहेत. चला तर मग या उपायाला सुरुवात करूया.

या उपायातील पहिला उपाय म्हणजे ज्या ही व्यक्तीचे पोट साफ होते अशा व्यक्तीचे गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी असे आजार लवकर कमी होतात. म्हणूनच आपला पहिला उपाय आहे दरदिवस संध्याकाळी कोणतीही भाकरी खावी. ज्वारी असेल, बाजरीची असेल याची भाकर खावी. परंतु या भाकरीमध्ये तुम्हाला अर्धा चमचा एरंडेल तेल घालून ही भाकर सलग पंधरा दिवस खायची आहे.

याने कसल्याही प्रकारचे पोट ह्याने सकाळी उठल्याबरोबर साफ होते. काळजी घ्यायची की दर दिवशी सांध्याकाळ ही भाकर खायची. दुसरा उपाय आहे, सकाळी उठल्यावर दोन चमचे खारीक पूड, तीन कप दुधामध्ये घ्यायची किंवा तुम्ही जास्त पण घेऊ शकता. ते आटून घ्यायचे, दोन कप शिल्लक राहिपर्यंत. ते सकाळी उठल्याबरोबर प्या. चहा कमी प्या.

तरचं तुमची गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी लवकर आटोक्यात येईल. शरीराला सर्वात जास्त कॅल्शियमची आवश्यकता असते. यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम आहे. पुढचा आपला उपाय आहे. या उपायामध्ये सकाळी उठल्याबरोबर एक चमचा पांढरे तीळ खायचे आहे. चावून चावून हे पांढरे तीळ खायचे आहेत आणि यावरती आपल्याला कोमट पाणी प्यायचे आहे.

गुडघेदुखी साठी हा एकदम प्रभावी उपाय आहे. जर जास्तच गुडघेदुखी असेल तर याच तीळतेल घ्यायचे. सकाळी एक चमचा तीळ तेल प्यायचे आणि संध्याकाळी एक चमचा प्यायचे. परंतु हे तीळतेल पिल्याच्या नंतर आपल्याला एक ग्लास कोमट पाणी प्यायचेच. यानेही तुमची सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्यातील गॅप भरून येण्यास लवकर मदत होते आणि हा त्रास याने कमी होतो. पुढचा उपाय आहे, तुम्हाला अर्जुन सादडा या वनस्पतीची साल घ्यायची आहे.

ही साल 10 ते 15 ग्रॅम घ्यायची आणि तीन कप पाण्यामध्ये टाकायची आणि ते आटून आपल्याला एक कप शिल्लक राहिल असं ठेवायचं. हे कप शिल्लक राहिलेलं सकाळी उठल्यावर अनुशापोटी सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळेस प्यायचे. या अर्जुन सादडा मध्ये सर्वात जास्त कॅल्शियम आहे. याने खूप फरक पडतो. या कॅल्शियमचा परिणाम आपले हाडे मजबूत होण्यासाठी होतात.

पुढचा उपाय आहे, बऱ्याच जणांची गुडघे सूजतात, बऱ्याच जणांचे साधे सुजतात अशावरती आपल्याला लावणारा हा उपाय आहे. यासाठी निर्गुडी या वनस्पतीचा पाला लागणार आहे. हा निर्गुडीचा पाला आणायचा, शिजवायचा. शिजवल्यानंतर ज्यावेळेस ते कोमट होईल, सहन होईल असं ते आपल्या ज्या ठिकाणी गुडघा सुजलाय त्या ठिकाणी लेप करायचा आणि कपडा बांधून रात्रभर तसाच ठेवायचा.

सकाळी तुमची सूज असलं ती उतरते आणि खुप आराम मिळतो. दुसरा उपाय गुडघ्यासाठी करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोहरीचे तेल, हिंग, लसूण आणि काळं मीठ. या पदार्थांच्या मदतीने हा उपाय करणार आहोत. यासाठी पाच ग्रॅम काळं मीठ घ्यायचं, पाच ग्रॅम हिंग पावडर घ्यायची, लसूण घ्यायचा आणि हे एकत्र कुटायचे. हे मिश्रण एकत्र करायचे , एकत्र केल्यानंतर मोहरीच्या तेलात एक मिनिटं गरम करून घ्यायचं.

गरम केलेलं मिश्रण जे ही तयार होईल त्या मिश्रणाचा लेप कोमट झाल्यानंतर त्या गुढघ्यावरती किंवा सांध्यावरती लावायचा आहे. लावल्याच्या नंतर पांढरा कपडा घ्यायचा आणि पुर्ण पॅक बांधून घ्यायचे आणि रात्रभर तसच ठेवायचे. या ही उपायाने तुमची गुढघेदुखीला लगेच आराम मिळतो. असे हे दिव्य उपाय आहेत. शरीरात आहाराचे प्रमाण योग्य ठेवा आणि तुमची सांधेदुखी गुडघेदुखी कमी करा. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *