वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय…७ दिवसांत १५ किलो वजन कमी…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो स्त्री असो किंव्हा पुरुष असो वजन खूप वाढलेले असेल आणि विविध उपाय करून देखील तुमचं वजन कमी होत नसेल. पोट सुटलेले असेल, थायरॉईड चा त्रास असेल, शरीरावर कुठेही चरबी वाढलेली असेल तर आम्ही तुम्हाला एक वजन कमी करण्यासाठी काढा सांगणार आहे ज्या मुले तुम्हाला 100% फरक पडेल.

हा उपाय आताच डिलिव्हरी झालेल्या माता बहिणींना सुद्धा करता येणार आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. डिलिव्हरी झालेल्या माता बहिणीचं पोट डिलिव्हरी झाल्यानंतर लुज होत तसेच पोटाचा घेर वाढतो. तर हे सर्व पूर्ववत होण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयोगी आहे. आम्ही जो तुम्हाला काढा सांगणार आहे तो बनवण्यासाठी घरातीलच वस्तू लागणार आहेत. चला तर पाहुयात हा वजन कमी करणारा काढा कसा बनवायचा…

मित्रांनो हा उपाय करण्याची पद्धत अत्यंत साधी व सोपी आहे. आपण एक लिटर पाणी घ्यायच आहे. ते पाणी आपण गरम करत ठेवायचे आहे. म्हणजे हा वजन कमी करण्याचा काढा सकाळी एकदाच बनवून ठेवायचा आहे. यासाठी पहिला घटक आपल्याला लागणार आहे दालचिनी. दालचिनी हा मसाल्यातीलच एक पदार्थ आहे. शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त असते. त्याचबरोबर याने BP चा त्रास ही कमी होतो. या मुळे इन्स्टंट एनर्जी सुद्धा मिळते. दालचिनी मुळे पोटाभोवती साठलेली अतिरिक्त चरबी लगेच कमी होते. त्या मुळे आपण पूर्ण दालचिनी चा एक तुकडा या पाण्यामध्ये टाकणार आहोत.

या नंतर दुसरा घटक आपण घेणार आहोत धने… उष्णतेचे विकार, पित्ताचे विकार, धन्यामुळे नाहीसे होतात. असेच आम पचनासाठी धने अत्यंत महत्वपूर्ण असतात. धने हृदयास अत्यंत चांगले असतात. यामुळे पोटातील जंत सुद्धा नष्ट होतात. असे हे उपयुक्त धने एक चमचा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आपल्याला हे धने चुरगळुन पाण्यामध्ये टाकायचे आहेत.

तिसरा जो घटक आपल्याला या मध्ये लागणार आहे जिरे.. जिरे हे अत्यंत पाचक असतात. तसेच जिऱ्यामुळे पोटातील वायू बाहेर पडतो. ऍसिडिटी, बदकोष्टता याने नाहीसे होते. शरीरातील टोकंक्सिन म्हणजे विषारी द्रव्य या मुळे बाहेर पडतात. असे हे जिरे एक चमचा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे. चौथा जो घटक आपल्याला लागणार आहे ईलायची… ईलायची ही फॅट बर्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. ईलायची मुळे पचन क्रिया सुधारते. ईलायचीला मसाल्यांची राणी असे देखील म्हणतात. तर अशी दोन ईलायची आपल्याला फोडून पाण्यामध्ये टाकायची आहे.

आपल्याला जो पाचवा घटक लागणार आहे तो आहे तेजपत्ता..तेजपत्ता वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे केस गळती थांबवण्यासाठी उपयुक्त असते. तेजपत्ता मध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतो. व्हिटामिन A, व्हिटामिन B, व्हिटामिन C, कॅल्शियम अश्या सर्व घटकांना तेजपत्ता समृद्ध असतो. असे हे दोन तेजपत्ता आपल्याला तुकडे करून पाण्यामध्ये टाकायचे आहे.

असे हे पाचही घटक पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे पाणी पंधरा मिनिटे उकळून घ्यायचे आहे. हे पाणी उकळत असताना त्या वरती झाकण ठेवायचे आहे. पंधरा मिनिटे हे मिश्रण उकळून घेतल्यानंतर त्याला गाळून घ्यायचे आहे. हा काढा गाळून घेतल्यानंतर याचे तीन भाग करायचे आहेत. एक भाग हा सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे. त्यानंतर एक तास तुम्ही काहीही खायचं नाही. या नंतर तुम्ही काहीही खाऊ शकता.

दुपारच्या जेवणानंतर एक तासानंतर तुम्हाला यामधील दुसरा भाग प्यायचं आहे. हा दुसरा भाग पीत असताना तो साधारण गरम करून घ्यायचा आहे. आणि जो तिसरा भाग आहे तो संदयाकाळ च्या जेवणानंतर एक तासाने घ्यायचा आहे. हा भाग पीत असताना याला नॉर्मल गरम करून घ्यायचे आहे. असा हा काढा दिवसातून तीन वेळा तुम्हाला प्यायचा आहे. हा काढा बनविल्यानंतर तो फ्रीज मध्ये ठेवायचा नाही.

हा काढा घेतल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या दिवसापासूनच फरक पडलेला जाणवेल. तुमची चरबी 100% कमी होईल. हा काढा तुम्ही वजन कमी होई पर्यंत घेऊ शकता. याने कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही. हा काढा कोणीही घेऊ शकतो. फक्त गरोदर मातांनी हा काढा घेऊ नये. तर मित्रांनो असा हा वजन कमी करणारा काढा तुम्ही अवश्य करून पाहा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *