1 ग्लास पाणी प्या, पोटाची चरबी मेणासारखी वितळेल, फक्त 10 दिवसात पोटाची चर्बी कमी…

आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. परंतु वाजवी पेक्षा जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्यामुळे आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवणामुळे खाल्लेल्या जेवणाचे एनर्जीत रूपांतर न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबी मध्ये रूपांतर होत असते. जेव्हा आपले वजन वाढायला लागते तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठत जाते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो.

वेळीच उपाय न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो. पोटातील चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढली की रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हाय ब्लड प्रेशर आणि हृदयातील ब्लॉकेज यांसारख्या भयानक आजारांना तोंड फुटते. तर असे आजार होऊच नये आणि वाढलेले वजन व सुटलेलं पोट कमी व्हावे यासाठी अत्यंत प्रभावी असे फॅट कटर ड्रिंक पाहणार आहे.

या फॅट कटर ड्रिंकमुळे तुमची पोटावरील चरबी मेणासारखी वितळवून जाईल. हे ड्रिंक बनवण्याची पद्धत साधी आणि सोपी आहे. यासाठी पहिला घटक घेणार आहोत लिंबू. यासाठी आपल्याला एक लिंबु लागणार आहे. हे लिंबु खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचे आहे. पण हे लिंबु संपूर्ण खिसून घ्यायचे नाही. तर या लिंबाची फक्त साल खिसून घ्यायची आहे. लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन A, C पोटॅशियम, कॅल्शियम व फायबर यांसारखे पोषक घटक असतात.

लिंबूची साल ही वजन कमी करण्यासाठी लिंबु पाण्यापेक्षाही अधिक उपयुक्त असते. यानंतर दुसरा घटक घ्यायचा आहे आलं. आल्याचा साधारण एक इंच तुकडा घ्यायचा आहे व हा आल्याचा तुकडा सुद्धा खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचा आहे. आल्यामध्ये फेलोनिक असते, त्यामुळे अन्न पचनाच्या सर्व समस्या याने दूर होतात. आल्यामुळे रक्तातील चरबी अतिशय झपाट्याने कमी होते.

तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व रक्त पातळ करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. आता आपल्याला एक ग्लास पाणी उकळवून घ्यायचे आहे व पाणी उकळल्यानंतर ते एखाद्या भांड्यात काढून घ्यायचे आहे. या पाण्यामध्ये खिसलेल्या लिंबाची साल, खिसलेले आलं टाकायचे आहे. हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आणि या पाण्यावर झाकण ठेवायचे आहे.

हे पाणी साधारपणे पाच मिनिटं असेच झाकून ठेवायचे आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, गॅसवर पाणी उकळत असताना त्यामध्ये खिसलेले आले व लिंबु टाकायचे नाही म्हणजेच लिंबाला आणि आल्याला उष्णता द्यायची नाही. अतिप्रमानात उष्णता दिल्याने आल्यामध्ये व लिंबामध्ये जो वजन कमी करण्याचा गुणधर्म आहे तो निघून जातो. म्हणून उकळलेले पाणी गॅसवरून उकळवून खाली घेतल्यानंतरच त्यामध्ये हे पदार्थ टाकायचे आहेत.

आता हे पाणी कोमट झाल्यानंतर गाळून घ्यायचे आहे आणि यामध्ये ज्या लिंबाची साल खिसून घेतली होती ते लिंबु कापून पिळायचे आहे. तर अशाप्रकारे हे फॅट कटर ड्रिंक तयार झाले आहे. आता आपल्याला तीन लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत आणि या लसणाच्या पाकळ्यांचे चाकूच्या साहाय्याने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. हे लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे एक एक करून या फॅट कटर ड्रिंकसोबत घोट घोट करून गिळून घ्यायचे आहेत.

अगदी ज्याप्रमाणे आपण अलोपॅथिक गोळ्या घेतो त्याप्रमाणे हे लसणाचे तुकडे या फॅट कटर ड्रिंकसोबत गिळून घ्यायचे आहे. लसणामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होते आणि रक्तामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. तर असे फॅट कटर ड्रिंक लसणाच्या पकळ्यासोबत घेतल्याने तुमचे वजन अतिशय झपाट्याने कमी होते तसेच तुमच्या पोटावर साठलेली अतिरिक्त चरबी अगदी मेणासारखी वितळवून जाईल.

तर हे ड्रिंक तुम्हाला सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला दिवसातून फक्त एकदाच घ्यायचे आहे. हे ड्रिंक घेतल्यानंतर एक तास काहीही खाऊ नये. त्यानंतर तुम्ही तुमचा नाष्टा किंवा जेवण करू शकता. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पाहा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *