७ दिवसात केसांची लांबी ३ ते ५ इंच वाढेल- केस मोठे, घनदाट आणि मजबूत बनविण्याचा अचूक उपाय

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर एक असा केसांच्या टोनरची माहिती शेअर करणार आहे जे तुमच्या केसांची गळती कायमसाठी थांबावेल. केस तुमचे वेगाने वाढू लागतील व त्याचबरोबर केस वयाच्या आधी पांढरे होतात ते होणार नाहीत. केस ४ पट वेगाने वाढतील. केसांचा रंग पण काळा होईल. चला तर मग बघूया हा जादुई उपाय काय आहे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूया. एकदम मोफत मिळणारी ही वस्तु आहे. तुम्ही बघून समजला असाल मी काय घेतले आहे ते.

मी इथे घेतली आहेत जास्वंदीची फुले. याला चाइना रोझ असेही म्हणतात. तुम्हाला ही फुले सहज कुठेही मिळू शकतील. तुम्ही यांची सुकवून पाऊडर करून ठेवू शकता. खूपच फायदेशीर आहे हा उपाय आपल्या केसांसाठी, आपल्या टाळूसाठी. हे आपल्या केसांची मुळे मजबूत बनविते, आपले केस गळणे थांबविते. केसांची मुळे जेव्हा
मजबूत असतील, तेव्हा आपल्या केसांची गळती थांबेल व केस घनदाट होतील. केसांचे गळणे थांबवितो हा उपाय.

जास्वंदीच्या फुलांमध्ये किंवा पानांमध्ये जे नैसर्गिक तेल असते, ते आपल्या स्काल्प्ला स्वस्थ ठेवते, केसांना पोषण देते, रक्ताभिसरण व्यवस्थित करते. त्यामुळे केसांच्या वाढीस
मदत होते. तर तुम्हाला २ ते ३ फुले घ्यायची आहेत. काही पाने घ्यायची आहेत. ही फुले २ ३ रंगाची येतात, सफेद, गुलाबी व लाल. परंतु, लाल जास्वंदीची फुले असतात ती केसांसाठी उत्तम आहेत. पूर्वीच्या जमान्यापासून ह्याचा उपयोग लोक करत आली आहेत. १ ते २ कळ्या घेऊ शकता.

बाजारात मिळणारी पाऊडर एवढी उपयोगी नसते. ताज्या फुलांमध्ये जास्त नैसर्गिक गुण असतात. १ ते २ वेळा उपयोग केल्यावर तुम्हाला त्याचा गुण दिसून येईल. हा हर्बल टोनर आपल्या केसांच्या सगळ्या समस्या नाहीशा करेल. आता आपण एका पातेल्यात १ ग्लास पाणी घेतले आहे. २ फुले व त्यांची पाने त्या पाण्यात टाकायची आहेत. ते गॅस वर ठेवा. हिरवीगार पाने पण टाकली आहेत. ६ ते ७ मिनिटे हे पाणी आपल्याला उकळायचे आहे. तुम्ही बघू शकता फुलांचा रंग बदलतो आहे. आपल्याला हे अजून उकळायचे आहे. याचा अर्क आता पाण्यात उतरतो आहे.

मोठ्या आचेवर ते उकळू नका, कारण नाहीतर पोषक तत्वे कमी होतात. म्हणून मंद आचेवर काम करायचे आहे. नंतर कोरफड घ्या जे विटमिन्स, मिनेरल्सचे भांडार आहे. यातील पोषक तत्वे केसांना बळकटी देतात. कंगव्याच्या साहयाने हे जेल मी दाखविते त्याप्रमाणे काढून घेऊ शकता. केसांसाठी एलोवीरा हे निसर्गाचे वरदान आहे. त्या टोनरमध्ये हे जेल मिसळायचे आहे. ते चांगले ढवळून घ्या.

आता तुमचा केसांचा टोनर तयार आहे. नंतर आठवड्यातून 3 वेळा हा टोनर तुमच्या केसांच्या मुळाशी लावायचा आहे. रात्रभर ठेवून द्या व सकाळी केस धुवून
टाका. केसांना चमकदारपणा येईल. तुम्ही हा बनवून ठेवू शकता. आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *