५ मिनिटात काळ्या मानेपासून मिळवा मुक्तता, जाणून घ्या सर्वोत्तम घरगुती उपाय….

प्रत्येक व्यक्ति ही आपल्या चेहर्‍याला सुंदर बनविण्यासाठी खूप प्रयत्न करीत असते. वेगवेगळे उपाय करून बघत असते. ते घरगुती उपचार आणि फेस पैक यांचा वापर करतात, ज्यामुळे त्यांचा चेहरा चमकदार बनेल. परंतु, या सगळ्यात कितीतरी लोक आपल्या मानेकडे दुर्लक्ष करतात. तुम्हाला सांगतो, मानेचे चमकदार होणे, हे ही तितकेच आवश्यक आहे, जेवढे चेहरा चमकदार होणे.

म्हणून, आपल्याला आपली मान स्वछ आणि चमकदार बनविण्यासाठी पण प्रयत्न केले पाहिजेत. तुम्हीच विचार करा, की चेहरा सुंदर आहे, पण मान काळी असेल, तर ते कसे दिसेल? ते खूपच वाईट दिसेल. तुम्ही ही गोष्ट स्वत: समजू शकता, जर तुमचा चेहरा चमकदार असेल, तर हे आवश्यक आहे, की तुमची मान पण चमकदार पाहिजे. म्हणूनच, तुम्ही तुमच्या मानेच्या साफसफाई कडे जरूर लक्ष द्या.

प्रदूषण आणि धूळ, माती यामुळे आपली मान काळी पडते. आज आम्ही तुम्हाला, या लेखाद्वारे, काळी मान साफ स्वछ आणि चमकदार काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची काळी मान चमकदार बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया, काळी मान चमकदार करण्याचे काही घरगुती उपाय:

बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. मात्र मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या त्वचेवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये. अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो. एका बाऊलमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता. या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाकून याला मिक्स करा. नारळाच्या तेलाने त्वचेवरील घाण निघून जाते आणि रंध्रे स्वच्छ होतात.

लिंबू आणि मधाचे मिश्रण: तुम्हाला सांगू इच्छितो, की लिंबू आणि मध यांचे मिश्रण आंघोळीच्या अर्धा तास आधी मानेला लावून ठेवा आणि आंघोळ करताना मान स्वछ धुवून टाका. जर तुम्ही असे केलेत, तर मानेचे काळेपण नाहीसे होईल व सुरकुत्यांची समस्येचे पण निवारण होईल. कच्चा पपई: तुमच्या माहितीसाठी, कच्चा पपई ही त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतो. तुम्ही पपई वाटून त्यात गुलाबपाणी आणि एक चमचा दही मिसळा. नंतर, तो लेप तुम्ही मानेवर लावा. तुम्हाला हा उपाय फक्त आठवड्यातून एक वेळा करायचा आहे. यामुळे तुमच्या मानेचा काळपटपणा निघून जाईल.

बेकिंग सोडा: तुम्हाला सांगतो, बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मानेचा काळपटपणा दूर करू शकता. यासाठी, तुम्हाला बेकिंग सोड्यात थोडेसे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करायची आहे. ती तुमच्या मानेवर लावा. थोडा वेळ ठेवा. नंतर, पाण्याने धुवा. हा प्रयोग तुम्ही थोडे थोडे दिवसानी केलात, तर तुम्हाला फरक पडलेला दिसेल.

ओटमील: तुम्ही ओट्स चांगल्या तर्‍हेने बारीक करून त्याची पाऊडर, टोमॅटोचा रस आणि मध यात मिसळून घ्या. ह्या तयार पेस्टचा उपयोग तुम्हाला आठवड्यातून दोनदा करायचा आहे. यामुळे, तुमच्या मानेची सफाई होईल आणि तुम्हाला स्वत:ला फरक नक्कीच जाणवेल.

बटाट्याचा रस:- तुमच्या माहितीसाठी सांगतो, कि लिंबाप्रमाणे बटाटा हा सुद्धहा नैसर्गिक ब्लीचचे काम करतो. त्यात असलेले तत्व हे त्वचेचा रंग चमकदार करण्यास मदत करतात. बटाटा सोलून त्याचा रस थोड्या वेळासाठी जर मानेवर लावलात, तर तुम्हाला तुमच्या मानेच्या रंगात नक्कीच फरक जाणवेल.

या पैकी कोणत्याही एका उपायाचा वापर तुम्ही दररोज ५ मिनिटे करू शकता, नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *