३ दिवस सकाळी रिकाम्या पोटी ही पाने खा, तुम्हाला म्हातारपण येऊ देणार नाहीत, कंबरदुखी, अंगदुखी, खाज, खरूज, नायटा संपुष्टात येईल..

नमस्कार, मित्रांनो केवळ ३ दिवस तुम्ही रिकाम्या पोटी ही पाने खाल्ली, तर तुमच्या शरीरात वृद्धत्व लवकर येणार नाही तसेच कंबरदुखी, अंगदुखी, खाज खरूज, नायटा ही समस्या मूळापासून समाप्त होईल व केस मूळापासून काळे व घनदाट होतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला इथे घ्यायची आहेत तुळशीची पाने. जास्त करून आपल्या सगळ्यांच्याच घरात तुळशीचे झाड किंवा रोप असतेच. त्याचे खूपच औषधी असे गुणधर्म आहेत. औषधी गुणांचे भंडार आहे हे तुळशीचे रोप.

तुळशीची मुळे असुदे, पाने असुदेत किंवा बिया ज्याला “मंजिरी” म्हणून आपण ओळखतो, किंवा काडी असुदे, खूप जास्त प्रमाणात औषधांमध्ये या सगळ्याचा उपयोग केला जातो. आयुर्वेदामध्ये तुळशीच्या पानांचा व पानांच्या रसाचे खूप जास्त महत्व आहे. म्हणून औषधे तयार करण्यासाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. चला तर मग आता मी तुम्हाला सांगणार आहे, की तुळशीच्या पानांचा उपयोग कशा प्रकारे केला पाहिजे, केव्हा केले पाहिजे व कोणत्या आजारांवर तुळशीचे सेवन फायदेमंद आहे.

तुळस जेव्हा तुम्ही तोडून घ्याल, तेव्हा प्रथम ती स्वछ धुवून घ्या. त्यानंतर त्याचा उपयोग करा. आपल्या चेहर्याेची सुंदरता असुदे, केसांची समस्या असो, सगळ्या समस्या दूर करते तुळस. केस गळण्याची समस्या मूळापासून समाप्त होईल, जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुळशीच्या पानांचा वापर कराल तर. अॅंटी-सेप्टिक, अॅंटी-फंगल असते त्यामुळे काही वेळेस आपल्या केसात उवाच्या खाजेमुळे जी जखम होते ती ठीक करण्यात तुळशीच्या पानांचा वाटा आहे, एखाद्या मलमाप्रमाणे काम करतात तुळशीची पाने. कशा प्रकारे वापर करायचा आहे ते आपण आता बघूया.

काही कोवळी पाने धुवून घ्या. नंतर खलबत्त्यात टाकून कुटून त्याचा गळून रस काढा किंवा तुम्ही पेस्ट पण वापरू शकता. तुळशीची पानांचा अनेक आजारांमध्ये उपयोग केला जातो, केस गळणे, चेहर्याणवर डाग, मुरूमे असतील तर याचा रस लावल्यामुळे चेहर्याोवर चमक येते. तुळशीची पाने कधीही चावून खाल्ली जात नाहीत कारण त्यामध्ये मर्करी म्हणजेच पारा असतो तो आपल्या दातांवर वाईट परिणाम करतो. म्हणून तुळशीची पाने चावून न खाता, कोवळी पाने पाण्याबरोबर गिळून टाका किंवा दहयात मिसळून बारीक तुकडे करून खाऊ शकता.

आपले पचन चांगले होते, वजन कमी करायचे असेल तर तुळशीची पाने जरूर सेवन करा. मी १/२ चमचा पाणी घालून पेस्ट तयार केली आहे. ताज्या पानांमध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. म्हणून ताजी पानेच घ्या. ही पेस्ट जर तुम्ही कोणत्याही त्वचारोगावर लावली, म्हणजेच, खाज, खरूज, नायटा तर त्वचारोग मूळापासून नाहीसा होतो कारण तुळस अॅंटी-सेप्टिक, अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्मानेयुक्त आहे. कोणताही जंतुसंसर्ग दूर करण्याचे काम तुळस करते.

केसांवर लावताना तुळशीचा रस तसाच न लावता त्यामध्ये आवळा तेल, नारळ तेल, जे तेल असेल ते १ चमचा पेस्ट मध्ये मिसळून लावा. केस काळे, मजबूत होतील, कोंडा होणार नाही. १ तास केसांवर ठेवून नंतर केस स्वछ धुवून टाका. काही पाने त्यात तुम्ही कडूनिंबाची घालू शकता. काही लोक कडूनिंबाची पाऊडर पाने सुकवून तयार करून ठेवतात. ७ ते ८ पाने स्वछ धुवून ती कुटून घ्या. चेहर्यासवर पण हे तुम्ही लावू शकता. आमची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *