१ पान १० रोग बरे करते, केसांपासून नखा पर्यंत आळुच्या पानाचे फायदे…

आयुर्वेदावरचा विश्वास आपण वाढवला पाहिजे, आयुर्वेदामध्ये अशा काही गोष्टी आहेत दडलेल्या ज्या की आणखीही माहीत नाही. कारण आपण प्रयत्नच केला नाही आयुर्वेदाकडे जाण्याचा. तर आजची जी भाजी आहे ती अत्यंत उपयुक्त अशी भाजी आहे. अळूच्या पानाची भाजी ही हिरव्या पानाची भाजी असते आणि या अळूच्या पानाला हिंदीमध्ये आरबीचे पानं म्हणतात.

अळूच्या पानाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे बीपी कंट्रोल करते. पित्तक्षामक, पित्तामुळे अनेक आजार होतात पित्त कमी करण्याचे काम ही अळूची पाने करतात. तणाव कमी करण्याचे सुद्धा ही अळूची पान करतात. बीपी वाढण्याची दोन कारणे आहेत पित्त आणि तणाव.

अळूच्या पानाचे सेवन केल्याने तणाव कमी होतो आणि पित्त पण कमी होते आणि हे कमी झाल्यामुळे बीपी आपोआप कमी राहतो. पित्तामुळे भयंकर ऍसिडिटी होते. तर पित्त कमी झाल्यामुळे ऍसिडिटी कमी करण्याचे काम पण हे करत असते. म्हणजे अळूच्या पानाचे सेवन केल्याने ऍसिडिटी होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये व्हिटॅमिन A, B, C, कॅल्शियम हे सर्व उपलब्ध असते.

याच्यापासून बनवलेले पदार्थ चवदार आणि चविष्ट असतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. तुमच्या पोटात जर जळजळ करत असेल तर अर्ध्या पानाचा तुकडा त्याची एक काडी एक ग्लास पाण्यासोबत उकळायचे आणि या पाण्यात थोडंस तुप टाकून हे तीन दिवस प्यायचे. यामध्ये A व्हिटॅमिन असते ज्यामुळे आपल्या डोळ्याची दृष्टी आहे ती वाढते. डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात.

गुडघेदुखी कमी होते, कारण यामध्ये कॅल्शियम असते म्हणून गुडघेदुखी कमी होते. यामध्ये फायबर असते ते मेटाबॉलिजम ऍक्टिव्ह करून वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. म्हणजे फायबर असलेले घटक आपण सेवन केले तर आपले मेटाबॉलिजम ऍक्टिव्ह होते आणि मग आपले वजन कमी होण्यासाठी याचा फायदा होतो.

म्हणून वजन कमी करण्यासाठी अळूची पाने अत्यंत फायदेशीर आहेत. तुम्हाला जर जास्त दिवस जगायचं असेल तर आपल्या जेवणावर ध्यान दिलं पाहिजे. हिरव्या पानाच्या भाज्या आपल्या आहारात खुप महत्त्व देतात. कारण यात आयर्न, फायबर आणि पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. हिरवी पाने असलेल्या या भाज्या शिजवून खाव्यात.

यात खुप कमी कॅलरीज असतात आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे घटक जे वजन कमी करू इच्छितात त्यांच्यासाठी हे खुप गरजेचे आहे. या पानात व्हिटॅमिन C आणि पॉलीफिनॉलची मात्रा खुप असते. या भाज्या हृदयासाठी खुप उपयोगी असतात. पोटा संदर्भात काही समस्या असतील तर हे पानं शिजवून खावेत, पण योग्य प्रमाणात.

कोणतीही अतिप्रमाणात गोष्ट केली तर तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट नक्की आलाच. तुम्हाला जर खाल्लेल पचन होत नसेल, डायजेशन बिघडलं असेल तर अशा पानाची भाजी तुम्ही अवश्य करुन खाल्ली पाहिजे. बीपी कंट्रोल करण्याचे आणखी एक कारण आहे यामध्ये सोडीयम, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही तत्वे असतात. हे पान गुडघेदुखी, सांधेदुखी यासाठी सुद्धा खुप फायदेशीर आहे.

गुडघेदुखीसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. यासाठी याची पाने घ्यायची, पानावर तुप टाकायचं. थोडं गरम करायचं आणि कोमट झालं की गुडघ्यावर बांधायचं. यामुळे तुमचे जॉईंट पेन कमी होईल आणि गुडघेदुखी आहे ती पण कमी होईल. म्हणजे एवढे महत्वपूर्ण ही अळूची पाने आहेत. या पानाची भाजी करून खा, उकडून खा. कसही खा, पण कच्चं खाऊ नका. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *