१ चमचा तांदूळ असे वापरा, तुमच्या चेहऱ्यापुढे चंद्रही फिका पडेल, काळे डाग टॅन वांग गायब..

या जगात प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसण्याचा मोह आहे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम, सौंदर्यप्रसाधने वापरतो. त्यामुळे सुरवातीला चांगला परिणाम मिळतो मात्र जेव्हा आपण त्याचा वापर करणे बंद करतो, तेव्हा पूर्वीपेक्षा त्वच्या ज्यास्त काळी पडते. चेहऱ्यावर पिंपल्स येतात कधी कधी आहार योग्य नसल्याने ही पिंपल्स येतात.

आपण जेव्हा ती पिंपल्स फोडतो, तेव्हा त्याची लस इतर भागाला लागते व पिंपल्स मोठ्या प्रमाणात वाढतात आणि चेहरा खराब होतो. हे होऊ नये म्हणून मी आज एक तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहे. मित्रांनो उपायांसाठी लागणारे सदर घटक आपल्या घरामध्येच उपलब्ध होतील. त्यासाठी पहिला घटक आपल्याला लागणार आहे “तांदळाचे पीठ ” हे तांदळाचे पीठ गिरणीतून आणले असेल तरी चालेल किंवा मिक्सर वर तुम्ही घरच्या घरी बनवले तरी चालेल.

ह्या उपायांसाठी आपल्याला तांदळाचे पीठ एक चमचा घ्यायचे आहे. तांदळाचे पीठ त्वचेला नवीन चमक देते. डेड स्किन, काळे डाग मुळापासून कमी करते त्याच प्रमाणे उन्हामुळे जे त्वचेवर काळे डाग तयार होतात. ते कमी करण्यासाठी मदत होते, हे पीठ साधारणता तुम्हाला एक चमचा घ्यायचे आहे.

ह्यात दुसरा पदार्थ प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतो तो म्हणजे ” दही ” हे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असते आणि त्वच्या मुलायम ठेवण्यासाठी त्याच प्रमाणे त्वचेमध्ये ओलसर पण टिकवून ठेवण्यासाठी दही अत्यंत उपयुक्त आहे. दही पण आपल्याला साधारण एक चमचा घ्यायचे आहे. ह्यात तिसरा जो पदार्थ आहे तो प्रत्येकाच्या किचन मध्ये उपलब्ध असतो तो म्हणजे ‘टोमॅटो.’

आपल्याला ह्या उपायांसाठी टोमॅटो बारीक करून त्यातून दोन चमचे त्याचा रस आपल्याला ह्या उपायांसाठी लागणार आहे. ह्यासाठी तुम्ही मिक्सर चा वापर करू शकता. साधारण आपल्याला दोन चमचे टोमॅटो चा रस लागणार आहे. टोमॅटो काळे डाग, सुरतुक्या, ब्लैक हेड्स, व्हाइट हेड्स आणि वांग कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे टोमॅटो ने त्वच्या गुलाबी बनवते व चेहऱ्यावरील सुरतुक्या कमी करते.

मित्रांनो ह्या नंतर आपल्या शेवटचा पदार्थ लागणार आहे तो ही आपल्या प्रत्येकाच्या किचन मध्ये असतो तो म्हणजे “लिंबू ” बघा लिंबूची ज्या लोकांना ऍलर्जी आहे किंवा ज्या लोकांना लिंबूचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी ह्या उपायासाठी लिंबू वापरायचा नाही आहे. ह्या पूर्वी सांगितलेले तीन घटक वापरूनच ही पेस्ट तयार करायची आहे. पण ज्या लोकांना लिंबूचा प्रॉब्लेम नाही ते लोक लिंबू वापरू शकतात.

लिंबूचा रस चेहऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो चेहऱ्यावर साचलेला जो मळ आहे, काळे डाग आहेत, धूळ आहे, हे काढण्याचे काम लिंबूचा रस किंवा लिंबाचा रस करतो. तुमच्या चेहऱ्यावर जर काळे डाग पडले असतील तर लिंबूचा रस आणि खायचा सोडा एकत्र करून ते तुम्ही त्या काळ्या डागाला सलग महिनाभर लावले तर काळे डाग मुळापासून कमी होतात. आपल्याला हा लिंबूचा रस साधारण एक चमचा लागणार आहे.

सुरवातीला एक वाटीमध्ये एक चमचा आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे यानंतर आपल्याला दुसरा घटक यामध्ये दही घ्यायचं आहे. दही आपल्याला ह्यामध्ये एक चमचा घ्यायचं आहे ते एकजीव होई पर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जर तुम्हाला दही मिळाले नाही तर तुम्ही कच्चे दूध हे दह्याच्या ठिकाणी वापरू शकता. ह्यामध्ये आपल्याला तिसरा घटक वापरायचा आहे टोमॅटो चा रस हा रस आपल्याला दोन चमचे वापरायचा आहे.

हा उपाय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकता. ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. मित्रांनो हा उपाय तुम्हाला सलग पंधरा दिवस करायचा आहे. पंधरा दिवसा नंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल . ह्या नंतर ह्या मिश्रणामध्ये तुम्हाला शेवटचा घटक घालायचा आहे, तो म्हणजे लिंबू रस हा रस आपल्याला ह्या मिश्रामध्ये एक चमचा घ्यालायचा आहे.

हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर कॉटन च्या साह्याने चेहऱ्याला हळुवार मॉलिश करायचं आहे. हा उपाय तुम्ही दिवसात कधी ही करू शकता किंवा संध्याकाळी लावून वीस मिनिटांनी धुवू शकता. ह्या उपायाचा रिझल्ट खूप चांगला आहे एकदा करून बघा. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *