१ काडी २१ रोग बरे करते, गवत समजून फेकू नका, फायदे इतके की पायाखालची जमीन सरकून जाईल…

आज आपण अत्यंत महत्त्वाच्या वनस्पतीची माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे त्याचे आयुर्वेदिक उपाय पाहणार आहे. जिच्या वापराने केसांपासून नखांपर्यंत आपले सर्व प्रकारचे रोग दूर होतात. या वनस्पतीचे नाव आहे आघाडा. या वनस्पतीच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. याला हिंदीत अपमार्ग आणि इंग्लिशमध्ये अचिरांथिस अस्पेरा( Achyranthes Aspera) म्हणतात.

ज्यांना टक्कल पडली आहे किंवा टक्कल पडायला सुरुवात झाली आहे अशा व्यक्तींना याची पाने अत्यंत उपयुक्त आहेत. याची पाने भाजायची, वाटायची आणि मोहरीच्या तेलात मिक्स करून पेस्ट बनवायची. ज्या भागात केसगळती जास्त होते त्या भागावर लावायची. हा उपाय साधारणतः एक ते दोन महिने केल्यानंतर तुम्हाला परिणाम दिसून येईल.

मित्रांनो डोळ्यांसाठी ही अत्यंत उपयुक्त असून ज्या व्यक्तींना चष्मा लागलेला आहे किंवा मोती बिंदू झाला आहे अशा व्यक्तींनी याच्या मुळाची दोन ग्रॅम पावडर आणि दोन चमचे मध एकत्र करून एक मिश्रण बनवायचे. हे मिश्रण साधारणतः दोन दोन थेंब डोळ्यात टाकायचे. यामुळे मोतीबिंदू निघून जातो. चष्म्याचा नंबर पण कमी होतो.

एखाद्याला खुप खोकला झाला असेल किंवा दमा असेल किंवा श्वसन विकार असेल अशा व्यक्तींसाठी हे झाड अत्यंत उपयुक्त असून याची ही मुळं आहेत त्याची जी पावडर आहे व मध एकत्र घ्यायचा आणि समप्रमाणात घ्यायचा. एक चमचा पावडर घेतली तर एक चमचा मध घ्यायचा असे समप्रमाण घेऊन रोज सकाळी उपाशीपोटी खाल्लं तर त्याला खुप फायदा होतो.

दमा कमी होतो, त्याचप्रमाणे खोकला कमी होण्यासाठी मदत होते. तिसरा घटक आहे दातदुखी. ज्या व्यक्तींना दात दुखतात, दात हलतात किंवा हिरड्या दुखतात, हिरड्या संबंधी कुठलीही समस्या असेल अशा व्यक्तींनी याची जी खोडाची काडी आहे या काड्यांनी दात घासायचे आहेत. त्याचप्रमाणे मुळ, पान, फुल आणि फळ याचा काढा करून रोज सकाळी दुधासोबत घेतलं तर नक्की फायदा होतो.

याने दात घासल्यामुळे मजबूत, टणक होतात. एखाद्या व्यक्तीचे पोट दुखत असेल तर याच्या पंचअंगाचा काढा करून घेतला तर नक्कीच फायदा होतो. पंचअंग म्हणजे मुळ, खोड, पान, फुल आणि फळ हे सर्व अवयव समप्रमाणात घ्यायचे आणि काढा बनवायचा. ज्या माता भगिनींना मासिक पाळीमध्ये रक्त जास्त येते किंवा रक्तस्राव होतो किंवा पाणी व्यवस्थित येत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भधारणा होत नाही.

अशा स्त्रियांसाठी हे झाड वरदान आहे. याच्या मुळाची एक चमचा पावडर आणि दहा पाने एकत्र वाटायची आहेत, पेस्ट बनवायची. रोज सकाळी उपाशीपोटी दुधात याचे सेवन करायचे. हे सलग आपल्याला सात दिवस करायचे आहे. तुम्हाला गर्भधारणा राहण्यात मदत तर होईलच पण स्त्रियांना हाय ब्लिडिंग कमी होईल. जखम भरण्यासाठी ही पाने वाटायची आणि जखमेवर लावायची.

जखम लवकर भरून येते. हात, पाय, कंबरदुखी, पाठदुखी याने तुम्ही त्रस्त असाल तर आघाड्याची दहा बारा पाने वाटून मिश्रण बनवावे, ते गरम करावे व पंधरा दिवस त्यावर लेप द्यावा. तुम्ही पळायला लागाल. आपल्याला किंवा आपल्या घरातील व्यक्तीस कधीही ताप आला असेल अशा वेळेस याची दहा बारा पाने व पाच ते दहा मिरे व पाच ते दहा लसूण पाकळ्या यांची पेस्ट बनवा किंवा गोळ्या बनवा.

सकाळ संध्याकाळ त्या गोळ्या द्या ताप कमी होतो. काम करून थकवा आला असेल, अशक्तपणा आला असेल तर आघाडा अत्यंत उपयुक्त असून अशा व्यक्तींनी याच्या बिया भाजायच्या आणि वाटायच्या व बियांची पावडर व खडीसाखर समप्रमाणात घ्यायचं. रोज सकाळी एक चमचा दुधासोबत उपाशीपोटी घ्यायचं. तुमचा थकवा नाहीसा होतो, अंगात तरतरी येते.

वजन वाढल्यामुळे अनेकजण परेशान असतात. अशा व्यक्तींनी याच्या बिया व तांदुळ समप्रमाणात घ्यायचं आणि शिजवायच व त्याचं सकाळी आणि संध्याकाळीसेवन करायचे. यात फायबर खुप जास्त असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, भुक कमी लागते. परिणामी चरबी हळूहळू कमी व्हायला लागते. शेवटचा उपाय आहे साप, विंचु चावल्यासाठी.

मित्रांनो नेहमी तरुण राहण्यासाठी आघाड्याचा तुऱ्याचा उपयोग अत्यंत जुन्या काळापासून केला जातो. आघाड्याचे पाच तुरे एक ग्लास पाण्यात उकळावे, ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळवायचे. कोमट झाल्यानंतर रोज उपाशीपोटी पंधरा दिवस सेवन करायचे. याने रक्तातील विषारी द्रव्य बाहेर जातात, त्याचप्रमाणे आपल्या अंगात तरतरी येते आणि तुम्ही नेहमी तरुण दिसता. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *