१० दिवस रोज ३ वेलच्या खाऊन बघा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल…

मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर खूप महत्वपूर्ण अशा विषयावर बोलणार आहे. वेलची तर आपण सगळेच खातो परंतु १० दिवस तुम्ही जर सतत २ ते ३ वेलची सेवन कराल, तर तुम्ही वेलचीचे फायदे बघून आश्चर्यचकित व्हाल. कितीतरी जीवघेण्या आजारांना हे छोटे छोटे वेलचीचे दाणे दूर करतात. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात पूर्ण वेळ वेलची असतेच. खाण्याचा स्वाद वाढवते व सुगंधाचा ठेवा आहे ही हिरवी वेलची व कितीतरी रोगांपासून आपली सुटका करते. तसे तर वेलची दोन प्रकारची असते.

ही आहे छोटी वेलची व दुसरी असते मोठी वेलची., ज्याचा वापर आपण जास्त करून भाज्यांमध्ये करतो. वेलची जर तुम्ही नियमित रोज खाल्ली, तर हृदयरोग एकदम ठीक होतो. हृदयरोगाची समस्या होत नाही इतकी जास्त ही वेलची फायदेशीर आहे. ज्याचे हृदयाचे ठोके जास्त असतात त्यांनी रोज एका वेलचीचे सेवन जरूर केले पाहिजे. वेलची खाण्याचा कोणताही दुष्परिणाम नाही. गुणांचे भांडार आहे हिरवी वेलची.

वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मैग्ंनेशियम, पोटॅशियम, विटामीन सी, विटामीन बी६ असते, तसेच ही आपल्या शरीराला निरोगी ठेवते. वेलची खाल्ल्यामुळे आपले यकृत स्वस्थ राहाते. जे लोक वजन कमी करू इछितात, त्यांनी वेलचीचे सेवन जरूर केले पाहिजे. चरबी वेगाने कमी करते वेलचीचे पाणी. कशा प्रकारे तयार करायचे आहे, ते मी तुम्हाला विडियोत पुढे सांगणार आहे. तर अशा प्रकारे ४ ते ५ वेलची दाणे मी वेगळे केले आहेत व साले टाकू नका, ती नेहमी चहाच्या पाण्यात याचा उपयोग करा.

खूप चांगला सुगंध चहाला येतो. आपल्याला इथे वापरायचे आहेत वेलचीचे दाणे. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी पण वेलची खूपच फायदेशीर आहे. तुम्ही बघितले असेल, की काही व्यक्तींच्या तोंडाला दुर्गंध येतो, पायरीया ही समस्या असते, त्यांनी १ वेलची रोज खाल्ली पाहिजे त्यामुळे तोंडाचा वास कमी होतो. वेलची आपली पचनक्रिया सुधारते, चयापचयक्रिया सुधारते. आपण काहीही खाल्ले तर ते आपल्याला सहज पचते व ते चरबीत रूपांतर होत नाही.

वेलचीच्या सेवनाने तणाव दूर होतो. वेलचीचे दूध प्यायल्यामुळे झोप चांगली येते. ज्यांना प्रवासात उलटी होते, जीव घाबरतो त्यांच्यासाठी वेलचीचे सेवन जरूर केले पाहिजे. पित्ताचा त्रास पण वेलचीच्या सेवनाने दूर होतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम वेलची करते. १ ग्लास दुधात जर २ वेलची टाकून उकळून जर ते दूध घेतले, तर सांधेदुखीपासून आराम मिळतो. वेलचीचे पाणी प्यायल्यामुळे उचकी थांबते.

सर्दी, खोकला, कफ, अस्थमा या सर्वांवर वेलची उपयोगी आहे. वेलची खाल्ल्यामुळे आपल्या केसांची गळती कमी होते. केसांची मुळे मजबूत होतात. त्वचेवर चांगली चमक येते. बद्धकोष्टता ही समस्या असेल, तर ती दूर होते. जर सकाळी सेवन करण्यास वेळ नसेल, तर तुम्ही रात्री झोपताना पण २ वेलची खाऊ शकता. वजन कमी करायचे असेल, तर काही वेलचीचे दाणे काढून घ्या व १ ग्लास पाण्यात उकळत ठेवा.

हे पाणी जर सकाळी तुम्ही गरम गरम रिकाम्या पोटी सेवन केले, तर शरीरातील चरबी मेणबत्तीप्रमाणे विटाळून जाईल. घसा दुखत असेल, तर ठीक होतो. घामामुळे शरीरास जो दुर्गंध येतो, तो वेलचीचे पाणी प्यायल्यामुळे दूर होतो. मूत्रपिंडाची सफाई वेलची करते. ज्यांना रात्री स्वस्थ झोप येत नाही, त्यांनी रात्री हे वेलचीचे पाणी जरूर सेवन करावे. सकाळी तुम्हाला स्फूर्ति जाणवेल. वजन कमी करण्यासाठी गरम गरम वेलचीचे पाणी सेवन करावे.

कोणतेही वजन कमी करण्याचे पेय हे गरम गरम प्यावे त्याचा जास्त फायदा होतो. दिसायला छोटी असलेली ही वेलची खूपच फायदेमंद आहे. १ ग्लास दुधात २ ते ३ वेलची कुटून त्यात टाका व ते दूध गाळून घ्या व गरम गरम सेवन करा. अशा या बहुगुणी वेलचीचा तुम्ही जरूर उपयोग करून बघा. विडियो आवडला असेल तर जरूर लाइक व शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *