ह्या तीन गोष्टींमुळे तुमच्याकडे पैसा कधीच टिकणार नाही, आर्य चाणक्य…

मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट करतो. कारण पैसा जीवनाला आवश्यक आहे. कारण पैशामुळे आपण चांगले शिक्षण घेऊ शकतो, स्वतःसाठी चांगले घर घेऊ शकतो, आपण आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवू शकतो, थोडक्यात आपण पैशाने चांगल्या सुख सुविधा मिळवू शकतो. जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर होईल. पण आज अस दिसून येत की माणसे पैसे कमवतात पण त्यांना ते नेहमी कमीच पडतात. थोडक्यात कितीही पैसे कमावले ते कमीच… ते टिकत नाहीत. आर्य चाणक्यानी पैसे घरात न टिकण्याचे तीन कारणे सांगितली आहेत. चला तर मग बघुयात काय आहेत ती तीन कारणे..?

पहिले की कारण मूर्ख लोकांचा सन्मान.. चाणक्य सांगतात ज्या घरात मूर्ख लोकांचा सन्मान केला जातो तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. इथे मूर्ख म्हणजे त्यांना अज्ञानी म्हणायचे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आपण बघतो बुवा, बाबा, जी लोक असतात ते भोळ्या लोकांचा फायदा उठवतात. त्यांना महागड्या गोष्टी करायला लावतात. जसे की तुम्ही या खड्याची अंगठी घाला. तुमचं घर योग्य दिशेला नाही, त्याची मोड तोड करावी लागेल वैगेरे वैगेरे.. अश्या लोकांचे सगळे पैसे इथेच खर्च होतात. तसे पाहायला गेले तर या बुवा, बाबांच्याकडे काहीही ज्ञान नसते. ते फक्त फालतू गोष्टी करायला सांगतात. त्याच्या मागे सुद्धा काही तरी फालतू कारणे सांगतात.

ज्याला शास्त्रीय आधार नसतो. पण अश्या लोकांची जी लोक पूजा करतात त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. पण ज्या घरात ज्ञानी व्यक्तीचा सन्मान होतो म्हणजे ज्या व्यक्तीला खर्च ज्ञान आहे, जो योग्य मार्गदर्शन करतो, जो फालतू भानगडी तुमच्या मागे लावत नाही, ते घर नेहमी प्रगती पथावर असते. अश्या घरातील लोक नोकरी किंव्हा धंदा करत असतील तर त्यांच्या क्षेत्रातील टॉप जी लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतात. अश्या प्रकारे त्यांची प्रगती होत जाते. आणि लक्ष्मी त्यांच्या घरीच येतेच आणि तिथे कायम वास करते.

दुसरे कारण धन धान्याची नासाडी… चाणक्य सांगतात ज्या घरात धन धान्याचा संचय केला जातो तिथे कष्टाची किंमत आहे. आणि तिथे लक्ष्मी नेहमीच वास करते. चाणक्याने त्यांच्या काळात धन धान्य सांगितले. पण आजच्या काळात आपण गुंतवणूक म्हणू शकतो. ज्या व्यक्तीला सेविंग ची किंमत नाही ज्यांचा फक्त पैसे उडवण्यावर भर असतो. त्यांचं म्हणणं असत की उद्याच कोणी बघितलं आहे. आजच मज्जा मारून घ्या. आणि अशी वाक्य वापरून तो काय करतो जेवढे पैसे कमावले ते सर्व उधळतो.

पण अश्या लोकांच्या जीवनात अचानक काही संकटे ओढवले तर अश्या वेळेस यांच्याकडे काहीही गुंतवणूक नसते. आणि मग लोक कर्ज काढतात, लोकांकडे पैसे मागतात अश्या लोकांकडे लक्ष्मी कधीच टिकत नाही. म्हणजे शहाणे असतात त्यांना माहिती असते की आपल्यावर कधीही आपत्ती येऊ शकते. अश्या वेळेस त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे कामाला येतात. आणि येणाऱ्या आपत्तीला ते शांत पणे सामोरी जातात.

तिसरे कारण ज्या घरामध्ये पतीपत्नी मध्ये भांडणे होत असतात. चाणक्य सांगतात ज्या घरात पतीपत्नी सामजस्याने राहतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांचा आधर करतात, एकमेकांची आवडी निवडी जपतात, अश्या घरात लक्ष्मी कायम वास करते.  पण ज्या घरात पतीपत्नी कायम भांडत असतात, एकमेकांना टोमणे मारत असतात, छोट्या छोट्या गोष्टी वरून घटस्फोटाच्या गोष्टी करतात, अश्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. अश्या वेळे दोघे आनंद बाहेर शोधतात. नवरा दारूच्या आहारी जातो. आणि बायको महागड्या गोष्टींच्या मागे जाते.

कारण आपले जीवन हे आनंदासाठी चालले आहे. आणि घरात आनंद भेटत नसल्यामुळे दोघे पण आनंद बाहेर शोधतात. आणि मग या मुळे त्यांचे सगळे पैसे तिथेच खर्च होतात. अश्या वागणुकीमुळे मुलांच्यावर संस्कार सुद्धा चांगले होत नाहीत. त्या मुळे अश्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही.  त्यामुळे जर तुमच्या घरात लक्ष्मी पैसा टिकवायचा असेल तर नवरा बायकोने एकमेकांचे मने समजून घेतली पाहिजेत. समाधानी राहिले पाहिजे. तरच लक्ष्मी तुमच्या घरात टिकेल. तर ह्या गोष्टी तुम्ही करू नका तुमच्या घरात कधीही पैसे टिकणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *