हे पान जाळा, झुरळ, डास खल्लास, कायमचे गायब, परत दिसणार नाही !

आपण नेहमी घरातील कान्या – कोपऱ्यामध्ये झुरळ सारखे अनेक किटाणू पाहत असतो त्यामुळे आपण चिंतीत सुद्धा राहतो. एवढेच नाही तर घरामध्ये होणारे मच्छर डासयामुळे अनेक आजार सुद्धा निर्माण होतात. त्याला आपण आपल्याला वाटत असल्या तरी थांबवू शकत नाही. घरातील सर्व समस्या म्हणजे घरातील उंदीर डास,झुरळ आणि माश्या ज्यांना टाळले जाऊ शकत नाही.या सगळ्या गोष्टी मानवाच्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, या उपायामुळे तुम्हाला सगळ्या समस्येपासून सुटका मिळेल.

झुरळांना कसे पळवावे अधिकतर महिला झुरळंपासून त्रस्त असतात आणि त्यांना घाबरत सुद्धा असतात. झुरळांना घरातून पळवण्यासाठी तुम्ही लसून कांदा आणि काळी मिरची यांना बरोबर मात्रेमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवा. आता तुम्हाला या पेस्टला एका बॉटलमध्ये टाका आणि ज्या जागेवर अधिक प्रमाणात झुरळ असतात अशा ठिकाणी ती पेस्ट टाका. जर तुम्ही या उपायांचा काहीकाळ नियमितपणे करत असाल तर लवकरच तुम्हाला झुरळांच्या समस्येपासून मुक्तता मिळेल.

हे पान जाळा, झुरळे आणि डास कायमचे खल्लास करा. जर आपल्या घरामध्ये झुरळ असतील किंवा डास झाले असतील तर ते घालवण्यासाठी एक सुंदर उपाय सांगणार आहोत.हा उपाय केल्याबरोबरच डास निघून जातील व झुरळ देखील नाहीशे होतील. यासाठी आपल्याला तेजपान म्हणजेच तमालपत्र लागणार आहे. तेजपान मध्ये ‘यू कोलिस्ट्रोल’ नावाचा एक तेलकट घटक असतो.आणि या पदार्थांमुळे घरामध्ये कसलेही किडे होत नाहीत.

दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे “कापूर” व “राईचे तेल”. राईच्या तेलामध्ये बॅटेरियल गुण असतात.यामुळे कोणत्याही प्रकारचे कीटक असतील तर नाहीसे होण्यास मदत होते. हे राईचे तेल त्या तेजपत्राला लावायचे आहे. आणि तुमच्याकडे मातीचा दिवा असेल तर तो घ्या आणि त्यावर तेल लावलेले तेजपान ठेवायचे आहे. या नंतर कापूर घेऊन त्याची पावडर करून त्या पानावर टाकायची आहे.

साधारणः दोन कापूरवड्या घ्या. आणि अलगद जाळून द्यायचे आहे. हे जळत जाईल आणि याच्या वासामुळे अगदी सहजतेने आपल्या घरातील जे डास आहेत किंवा कुठल्याही प्रकारचे कीटक पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. याप्रमाणे जर तुम्ही दररोज १५ दिवस करत गेलात तर तुमच्या घरातील डास व झुरळ पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल. हा धूर करताना खिडक्या व दार बंद करायचे आहे.

जर डास चावत असतील तर तुम्ही कापूर आणि तेल मिक्स करून अंगाला लावून झोपला तर तुम्हाला डास चावणार नाही किंवा जवळ देखील येणार नाही. मित्र-मैत्रिणींनो नक्कीच करू बघा. तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *