ही पाने पाण्यात उकळा आणि केस धुवा, केस इतके वाढतील की ते कापावे लागतील…

मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांची समस्या काय आहे, तर केस गळणे, मग तो मुलगा असुदे की मुलगी. आपले केस इतके गळतात, की त्याची मोजदाद करताच येत नाही. अशा वेळी आपला आत्मविश्वास कमी होतो. तो वाढवण्यासाठी आपण केसांसाठी नवीन नवीन प्रकारचे शॅम्पू वापरुन बघतो, व आपल्या उरलेल्या केसांची पण हानी करून घेतो.

तुम्हीसुद्धहा जर अशा समस्येचे शिकार असाल, तर केस कापण्यापेक्षा एक उत्तम उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आमचा हा उपाय जर तुम्ही करून बघितलात तर, नक्की तुम्ही दुसरे कोणतेच तेल तुमच्या केसांसाठी वापरणार नाही. कारण हे तेल इतके जास्त परिणामकारक आहे, की एकदा वापरलेत की तुम्हाला त्याचा परिणाम तुमच्या केसांवर दिसायला सुरुवात होईल.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक रिकामी पातेली घ्यायची आहे. त्यात तुम्हाला २ ग्लास पाणी घ्यायचे आहे व १० ते १२ कडूनिंबाची पाने त्यात घालायची आहेत. हे तुम्हाला इतके उकळवायचे आहे, की पाणी अगदी थोडे म्हणजेच, फक्त १/४ राहील. त्यामुळे त्या पाण्यात कडुनिंबाचे सर्व गुणधर्म उतरतील.

नंतर त्यात तुम्हाला एक कांद्याचा रस घालायचा आहे. त्यासाठी तुम्हाला कांदा लाल रंगाचा घ्यायचा आहे, कारण त्यात सल्फर जास्त प्रमाणात असते जो आपल्या केसांची वाढ करतो. मान्य आहे, की हे तेल लावल्यामुळे आपल्या केसांना कांद्याचा अजब असा वास येतो, पण जर तुम्ही त्या कांद्याच्या वासाचा विचार करत राहिलात, तर तुमचे केस कधीही वाढू शकणार नाहीत. कारण हे तेल तुमच्या केसांना इतके लांब व दाट बनवते, की तुम्ही स्वत: हा परिणाम बघून हैराण व्हाल.

तर तुम्हाला एक लाल रांगचा कांदा घेऊन, तो किसायचा आहे आणि चाळणीने चाळून त्याचा रस काढायचा आहे. तो तुम्हाला कडुनिंबाच्या पाण्यात एकत्र करायचा आहे. कडुनिंबाच्या पाण्यात घालून तो स्प्रे बॉटल मध्ये भरून केसांना लावा किंवा एखाद्या कापसाने केसांना लावा. तुम्हाला कापूस बुडवून केसांना लावायचा आहे. स्प्रे करायचा असेल, तर केसांच्या मुळाशी, केसांवर, टोकापर्यंत स्प्रे मारायचा आहे.

नंतर हलक्या हाताने १० ते १५ मिनिटे केसांना मसाज करायचा आहे. नंतर हे तुमच्या केसांवर कमीत कमी १ तास ठेवून द्या. नंतर, कोणताही शॅम्पू वापरुन तुम्ही केस स्वछ धुवून टाकू शकता. असे तुम्हाला आठवड्यातून ३ दिवस करायचे आहे. तुम्ही स्वत:च नोंद कराल, की एकदाच्या वापरानंतर तुमच्या केसात नवीन चमक आली आहे, केसांचा पोत सुधारला आहे, पातळपणा कमी होऊन दाटपणा आला आहे.

केस गळणे थांबले आहे. तसेच, जे नवीन केस जे येत आहेत ते मजबूत येत आहेत. तुमचा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा. तुमच्या केसांसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत असाल, महागडी औषधे, शॅम्पू खरेदी करत असाल तर हे साधा सोपा उपाय करायला काय हरकत आहे. याची फायदे तुम्ही स्वत: नक्कीच अनुभवाल. चला तर मग, तुमच्यासाठी पुढच्या वेळेस काहीतरी नवीन घेऊन येतो. तोपर्यंत हा उपाय नक्की करून बघा. आपल्या केसांमुळे चेहर्‍याची सौन्दर्य पण वाढवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *