हिरे मोती या पेक्षासुद्धा किंमती आहे हे झाड, ओळखा ही अद्धभूत व चमत्कारी औषधी वनस्पति झेंडू, कुठे मिळाली तर सोडू नका, उपयोग करा.

नमस्कार मित्रांनो, आपला भारत देश हा औषधी वनस्पति म्हणजेच जडीबुटीचा देश आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पति आढळतात ज्या आपल्या जवळपास असतात. ती वनस्पति रस्त्याच्या कडेला असुदे, नदीच्या नाल्याच्या किनारी असुदे, आपण नेहमीच या औषधी वनस्पतींना दुर्लक्षित करतो. याचे कारण म्हणजे आपल्याला माहीत नसते की त्यांचे नाव काय आहे, त्यांचे काय उपयोग आहेत.

मित्रांनो, अशीच एक वनस्पति आहे जिचे नाव तुम्हाला नाकीच माहीत असेल. कारण ही वनस्पति कुंडीत, घरासमोरील किंवा घराजवळच्या अंगणात लावतात व गच्चीत मोठ्या प्रमाणात लावली जाते. हो, आज आपण बोलत आहोत झेंडूबद्दल. झेंडू एक अतिशय सुंदर फूल असते जे आपल्या मनाला व हृदयाला आनंद देते, शांतता देते व हे फूल उत्तम स्वास्थ्य देणार आहे. ही फुले भारतातील गावांमध्ये पण होतात. मंदिराच्या परिसरात ही फुले मोठ्या प्रमाणात लावली जातात व आढळतात.

ही फुले लाल, पिवळ्या रंगाची व गेंदेदार असतात. देशामध्ये या झेंडूच्या फुलाला कितीतरी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे की, हजारा, कुल्तोरा, कल्गन, इत्यादि. जर तुम्हाला याचे कोणतेही अन्य नाव माहीत असेल, तर कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर कळवा. मित्रांनो, ही वनस्पति जितकी सुंदर आहे तितकीच ही आपल्या शरीरासाठी औषधी व फायदेशीर आहे. आयुर्वेदात नमूद केल्याप्रमाणे झेंडूचे अनेक औषधी गुण आहेत व ही एक जडीबुटी आहे. ह्या फुलामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम व अॅंटी- ओकसिडेंट्स असतात.

म्हणून त्याच्या फुलांचा उपयोग करून बनविलेल्या अर्कामुळे हृदयरोग, कॅन्सर यासारख्या आजारांना प्रतिबंध करतो. यामध्ये आढळणारे कैरोटीनाईड, ग्लायकोसाइड व गंध तेल हे आपले रूप निखारण्यात, चेहर्‍यावरील सुरकुत्या घालवून त्वचेला चमक देतात. तुम्ही याचा उपयोग करून कितीतरी प्रकारचे आजार ठीक करू शकता. जर तुम्हाला कुठेही जखम, घाव, फोड झाला असेल तर झेंडूची फुले वाटून तो लेप जर फोड, जखम, घाव यावर लावला, तर घाव भरतो.

जर कोणाला मधुमेह असेल व कुठेही फोड, जखम झाली असेल व खूप काळ ठीक होत नसेल, तर याची ताजी पाने वाटून त्यावर लावल्यावर घाव किंवा जखम ठीक होते. जर विंचवाने दंश केला असेल, वेदना जास्त प्रमाणात होत असतील, तर याची पाने वाटून जिथे दंश केला आहे, तिथे लावल्यामुळे वेदना कमी होतात. तसेच थोडीशी झेंडूची पाने मेणबत्तीच्या बरोबर गरम करून त्या मेणात मिसळली व ते थंड करून भेगा पाडलेल्या टाचांवर लावले तर खूप लाभ होतो.

त्याचबरोबर मूतखड्याची जर समस्या असेल, तर २० ते ३० मिलिग्राम झेंडूच्या पानांचा काढा बनवून दिवसातून २ वेळा काही दिवस सेवन केल्यामुळ मूत्राशयातील खडे विरघळतात व शरीरातून लघवीवाटे बाहेर निघून जातात. पण याचा प्रयोग करताना कोणत्यातरी जाणकार वैदयाची मदत घ्यावी. त्याचबरोबर जर तुम्हाला मूळव्याध ही समस्या असेल, तर याची पाने वाटून मूळव्याधीच्या मोडांवर लावल्यामुळे आराम मिळतो.

दातांमध्ये जर वेदना असतील, त मित्रांनो, याच्या पांनांपासून बनविलेल्या काढयाने गुळण्या केल्या तर दातांमधील वेदना कमी होते. आज आम्ही झेंडू या सुंदर व मनमोहक झाडाबद्दल तुम्हाला माहिती दिली. आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *