हा 1 तुकडा करेल तुमचे फुप्फुस संपूर्ण स्वच्छ, छातीतील कफ जळून जाईल…

आपण आज असा एक उपाय पाहणार आहे ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसाची शंभर टक्के स्वच्छता होईल आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता दहा पटींनी अधिक वाढेल. त्याचबरोबर सर्दी, खोकला आणि छातीमधील कफ पूर्णपणे निघून जाईल आणि श्वास घेण्यास अडचण येत असेल तर ते पूर्णपणे बंद होईल.

आताच्या बदलत्या हवामानामुळे विषाणूंचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे घशात खवखवणे, घसा दुखणे अशा घशा संदर्भातील समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर छातीत कफ साचून छाती भरल्यासारखे वाटत राहणे यांसारख्या समस्याही तोंड वर काढत आहेत. हा उपाय करण्याची पद्धत साधी आणि सोपी आहे. हा उपाय करण्यासाठी पहिला घटक घेणार आहोत आलं.

आल्यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात व ते आरोग्यवर्धक असते. आल्यामध्ये फेनोलीक असते त्यामुळे अपचनाची समस्या दूर होते. आलं हे वेदनाक्षामक आणि ताप कमी करणारे असते. ते असे आले एक ते दीड इंच घेऊन त्या आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. यानंतर दुसरा घटक घेणार आहोत गुळ. गुळ हा ऊर्जेचे भांडार आहे.

शरीरामध्ये कफ दोष झाला असल्यास आजही घरातील जुनी माणसे गुळ खाण्याचा सल्ला देतात. अशा या गुळाचा एक खडा खलबत्त्यातबारीक करून घ्यायचा आहे. तिसरा घटक घेणार आहोत काळ्या मिरीचे चुर्ण. काळ्या मिरीमध्ये अँटीबॅक्टरीयल गुणधर्म असतात. यामुळे घशातील जंतूंचा नायनाट होतो. तर ही काळी मिरी मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे.

जेणेकरून काळ्या मिरीची बारीक पावडर तयार होईल. तर अशा काळ्या मिरीचे एक चिमूटभर चूर्ण यामध्ये टाकायचे आहे. यानंतर चौथा घटक घेणार आहोत हळद. हळद ही अँटीइनफ्लेमेंटरी, अँटीऍलर्जीक, अँटीऑक्सिडंट या गुणांनी परिपूर्ण असते. हळद ही आयुर्वेदातील अँटीबायोटिक म्हणून ओळखली जाते. हळद ही पाव चमचा यामध्ये टाकायची आहे.

तर हे चारही घटक एकजीव करून घ्यायचे आहेत. हे चारही घटक एकजीव झाल्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि गॅसवर ठेवायची आहे. यानंतर शेवटचा आणि पाचवा घटक घ्यायचा आहे तुप. तर असे एक चमचा तुप या कढई मध्ये टाकायचे आहे व ते गरम करायला ठेवायचे आहे. आता हे एकजीव केलेले मिश्रण या तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे.

हे तळून घेतल्यानंतर आपले हे औषध तयार होईल. तुपामध्ये तळल्यानंतर हे उपयुक्त असे रसायन तयार होते. आता हे आल्याचे तुकडे दिवसभरात कधीही खायचे आहेत. याला विशिष्ट अशी वेळमर्यादा नाही. हे आल्याचे तुकडे तीन ते चार वेळा चघळून खाऊ शकता. एकाच वेळेस तीन ते चार या प्रमाणामध्ये खायचे आहेत.

ज्याप्रमाणे आपण आवळा सुपारी खातो अगदी त्याचप्रमाणे हे तुकडे चघळून चावून खायचे आहेत. तर असा साधा उपाय तुमच्या घशा संदर्भातील सर्व तक्रारी नाहीशा करेल. त्याचप्रमाणे श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा घशात इन्फेक्शन झाले असेल तर ते या उपायामुळे पूर्णपणे बरे होईल. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *