हातांना व पायांना सतत येणाऱ्या मुंग्या, बधीरपणा, व्हिटॅमिन बीची कमतरता यासाठी रामबाण उपाय…

तुम्हाला नेहमी चेहऱ्यावर पोळ्या येतात का? तुमचे वय कमी असताना तुमचे केस पांढरे झाले आहेत का? केस खुप गळतायेत का? तर या सर्व गोष्टींचे एक कारण असू शकते ती म्हणजे तुमच्या शरीरात वाढलेली उष्णता. ज्या व्यक्तींच्या अंगात उष्णता आहे त्यांच्या डोळ्याची जळजळ होते, अंगावर खाज येते हातापायाची तळव्याची त्याचप्रमाणे संध्याकाळी झोपताना अवयवांची आग होते.

पोट आखडणे, हातपाय कंप पावणे, लघवी करताना जळजळ होते, गळा नेहमी सुखलेला राहणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या शरीरात घडत असतील तर नक्कीच तुम्हाला उष्णता आहे.

आजचा उपाय हा सर्व घरातील वस्तूंचा असून यातील लागणारे सर्व घटक घरामध्ये उपलब्ध आहेत. या उपायाने नुसतीच उष्णता कमी होत नाही तर प्रतिकार क्षमता वाढते. पचनसंस्था चांगली सुधारते, सर्व खाल्लेले पचते. सकाळी चांगल्याप्रकारे पोट साफ होते. तोंडाचा वास कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीपी आणि शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते. या उपायासाठी पहिला घटक लागणार आहे धने.

कोथिंबीरच्या बिया असतात त्यांना धने म्हणतात. हे धने आपल्या घरात सहज उपलब्ध होतात. आपल्याला अख्खे म्हणजे न फोडलेले धने लागणार आहेत. धन्यामध्ये कॉपर, फायबर, व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. किडनीच्या सर्व समस्या हे धने दूर करतात. हे साधारणतः एक चमचा लागणार आहे. यानंतर दुसरा घटक आहे जिरे. या देखील व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. मॅग्नेशियम आणि झिंक हे देखील भरपूर प्रमाणात मिळतात.

हे देखील उष्णता कमी करण्यासाठी, तसेच शरीरातील इतर रोगांसाठी उपयुक्त असून स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तिसरा घटक लागणार आहे ती म्हणजे खडीसाखर. साखर आणि खडीसाखर हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. खडीसाखर ही थंड स्वरूपाची असते आणि उष्णता कमी करण्यासाठी सर्व जे उपाय केले जातात त्यामध्ये खडीसाखर नियमित वापरली जाते. याची बारीक पावडर करून वापरायची आहे.

यामध्ये चौथा घटक लागणार आहे किसमिस किंवा काळे मनुके. दोन्ही असेल तरी चालेल. साधारण दहा मनुके लागणार आहेत. मनुके देखील थंड प्रवृत्तीचे असतात. शरीरातील उष्णता कमी करतात, शरीराला शक्ती प्रदान करतात. एखाद्या व्यक्तीचे वजन कमी असेल तर ते वाढवण्यासाठी उपयुक्त होतात आणि वजन वाढलेले असेल तर कमी करण्यासाठी होतो. सुरुवातीला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. या एक ग्लास पाण्यामध्ये अख्खे धने एक चमचा वापरायचे आहेत.

जर तुमच्याकडे अख्खे धने नसतील तर धने पावडर देखील वापरु शकता. त्यानंतर एक चमचा जिरे यामध्ये टाकायचे आहे. जिरे नसतील तर जिरे पावडर वापरू शकता. यामध्ये तिसरा घटक टाकायचा आहे मनुके. ज्या व्यक्तींना शुगर आहे त्यांनी मनुके नाही वापरले तरी चालतील. त्यांनी फक्त सुरुवातीचे दोन घटक म्हणजे धने आणि जिरे हेच वापरू शकता.

हे मनुके दहा या मिश्रणात टाकायचे आहेत आणि हे मिश्रण संध्याकाळी भिजू घालायचे आहे. सकाळी हे मिश्रण गाळून घ्या. यात असलेले मनुके तसेच बाजूला काढा आणि ते चावून चावून खा किंवा चुरडून या मिश्रणात मिक्स करून देखील पिऊ शकता. म्हणजे पहिले मनुके चावून खाऊ खा, त्यानंतर हे गाळून घेतलेले पाणी त्यामध्ये तुमच्या चवीनुसार अर्धा ते एक चमचा खडीसाखर टाकायची आहे.

हे मिश्रण उपाशीपोटी घ्यायचे आहे. यावरती अर्धा तास कुठलाही पदार्थ खायचा नाही. अर्ध्या तासानंतर तुम्ही नाष्टा किंवा जेवण करू शकता. हे म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्व व्यक्ती करू शकतात. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. फक्त ज्यांना मधुमेह, डायबेटिस आहे त्यांनी शक्यतो मनुके, खडीसाखर घेणे टाळले पाहिजे.

यामुळे तुमचे पोट साफ होईल, उष्णता कमी होईल. हा उपाय साधारणतः पंधरा दिवस ते एक महिना करायचा आहे. याचे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल . अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *